*हास्य व्यंग*😃😀👻 *NEP ,NBA, NAAC  वातावरणचे परिणाम* डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे   रविवारचा दिवस होता ,श्याम ,सकाळी गॅलरीमध्ये निवांत बसून चहाचा घोट घेत घेत वर्तमानपत्र तर कधी समोरच्या ग्राउंड वर खेळणारी मुलं आणि फिरणारी ,व्यायाम करणारी माणसं बघत  आनंद घेत होतो . तोच त्याच्या बायकोचे शब्द कानावर आले ," अहो , काय बसलाय ? भाजी पाला  व किराणा सामान घेऊन या! बायकोचे शब्द कानावर पडले आणि श्याम भानावर आला. पण आज काल सगळी कडे NBA,NAAC, NEP चे वातावरण असल्यामुळे श्यामच्या डोक्यात तेच विचार होते त्याने लगेच बायकोला म्हटले , मला बजेट दे. आणि याचे outcome , short term goal, and authenticity  सांग . आणि याच्यामध्ये गरजेची व सध्या गरज नसलेली वस्तू सांग. यातील कोअर म्हणजे घरात किती वस्तू आहे. Multidisciplinary म्हणजे या वस्तू अलग अलग कोणत्या ठिकाणाहून आणायच्या  आणि interdisciplinary म्हणजे किती वस्तू अदला बदल करून घेता येईल याची यादी दे. आणि बाजारात जाऊन स्थानिक भाषा का राष्ट्रीय भाषा का आतंरराष्ट्रीय भाषा वापरायची ते पण सांग ?   झालं श्यामच्या बायकोचं डोकं फिरले. सकाळचा त्...
Posts
Showing posts from February, 2023