*हास्य व्यंग*😃😀👻
*NEP ,NBA, NAAC वातावरणचे परिणाम*
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
रविवारचा दिवस होता ,श्याम ,सकाळी गॅलरीमध्ये निवांत बसून चहाचा घोट घेत घेत वर्तमानपत्र तर कधी समोरच्या ग्राउंड वर खेळणारी मुलं आणि फिरणारी ,व्यायाम करणारी माणसं बघत आनंद घेत होतो . तोच त्याच्या बायकोचे शब्द कानावर आले ," अहो , काय बसलाय ? भाजी पाला व किराणा सामान घेऊन या! बायकोचे शब्द कानावर पडले आणि श्याम भानावर आला.
पण आज काल सगळी कडे NBA,NAAC, NEP चे वातावरण असल्यामुळे श्यामच्या डोक्यात तेच विचार होते त्याने लगेच बायकोला म्हटले , मला बजेट दे. आणि याचे outcome , short term goal, and authenticity सांग . आणि याच्यामध्ये गरजेची व सध्या गरज नसलेली वस्तू सांग. यातील कोअर म्हणजे घरात किती वस्तू आहे. Multidisciplinary म्हणजे या वस्तू अलग अलग कोणत्या ठिकाणाहून आणायच्या आणि interdisciplinary म्हणजे किती वस्तू अदला बदल करून घेता येईल याची यादी दे. आणि बाजारात जाऊन स्थानिक भाषा का राष्ट्रीय भाषा का आतंरराष्ट्रीय भाषा वापरायची ते पण सांग ?
झालं श्यामच्या बायकोचं डोकं फिरले. सकाळचा त्याचा चांगलाच कार्यक्रमच झाला. व तिने त्याच्या वडिलांना सांगितलं की हे काय काहीतरी बडबड करताय.
श्याम चे वडील आले त्यांनी त्याला बघितलं आणि म्हणाले की, जा, माझी औषधी घेऊन ये. तोच श्याम त्यांना म्हणाल की बजेट आणि त्याची लेव्हल द्या . आणि feasibility , significance द्या. त्यांनी दोन क्षण त्याच्याकडे बघितले आणि त्याच्या पत्नीला म्हणले , अग सूनबाई ! आज याला डॉक्टर कडे घेऊन जा.आणि ते तावतावत निघून गेले.
श्याम मात्र शांत होत . तोच त्याची मुलगी आली. पप्पा शाळेची visit जात आहे तर मला पैसे द्या .परत श्यामच्या डोक्यातला NBA जागरूक झाला. आणि त्याने तिला म्हटलं याचे outcome सांग. आणि bloom texonomy चा अभ्यास करून किती लेव्हल satisfy होत आहे ते सांग.आणि ही visit products based education की problem based education च्या आधारे जात आहे की STEM ( science, Technology, Engineering, Mathematics) या आधारावर जात आहे आणि याचा learning outcomes काय असेल? हे ऐकून ती पण तावातावाने बडबडत निघून गेली.
पण श्यामला काही समजले नाही की हे लोक एवढे त्राग्या त्राग्याने का निघून गेले?
श्याम आपला नेहमीप्रमाणे घरात आला आणि टीव्ही बघत बसला तोच परत त्याच्या बायकोचा आवाज आला , अहो! तुमच्या भाच्याचं लग्न आहे तर आपल्याला काही वस्तू आणि कपडे खरेदी करायचं आहे .
झालं ! परत श्यामच्या अंगात भूत संचारल आणि तो परत वरीलप्रमाणे बडबडू लागला. लग्नाचा बजेट किती असेल तसेच पूर्ण प्लॅन, execution, , activities, work plan, MoU with relatives and friends याचं सविस्तर proposal किंवा रिपोर्ट सादर कर. त्याव्यतिरिक्त त्याने तिला विचारले आपल्या सोबत किती multiple entry आणि multiple exit राहतील. काही बँक क्रेडिट घ्यावं लागेल का? तिला याचा अर्थ समजला नाही पण या वेळेस मात्र तिने न रागवत शांतपणे त्याच्या मनाची बुद्धीचा विचार करून विचारले याचा अर्थ काय ?
तेव्हा श्यामने तिला शांतपणे सांगितले लग्नामध्ये एकाच वेळी किती लोक येणार ? आणि किती लोक लगेच परत जाणार. ?
हा पुढचा लग्नाचा वेळेचा प्रश्न व संदर्भहीन प्रश्न ऐकून तिने त्याला परत चहा दिला. व ती आपल्या कामात गुंग झाली.
पण श्यामच्या डोक्यात हे एवढं भिणल होत की त्याच्याशी जो कोणी बोलेल त्याला तो असेच कोड्यात बोलू लागलो .
मग एवढा वेळ शांत पणे बघत असलेले श्यामच्या वडील म्हणाले ; जा ! मंदिरात जाऊन ये!
त्याच क्षणी श्यामच्या डोक्यात विचार आले की काही प्रश्न विचारू पण तो शांत राहला आणि त्याने गुपचूप मंदिराची वाट धरली.
Comments
Post a Comment