लोकनेता/नगरसेवक कसा असावा?

राष्ट्रहितासाठी अतिशय महत्वाचे

 

Dr Jitendra Atmaram Hole Pune  

( या लेखातील विचार हे लेखकाचे खाजगी विचार आहेत कोणीही अर्थाचा अनर्थ करू नये. कोणत्याही व्यक्तीशी संबंधित नाही . आणि विनंती आहे की लेखातील मजकूर जसा आहे तसाच पुढे फॉरवर्ड करावा. )

आपले व आपल्या विभागाचे / राष्ट्राचे / नगराचे भविष्य म्हणजे लोकनेता/ नगरसेवक निवड

 

लोकनेता/ नगरसेवकची निवड ही सामान्य नागरिकाच्या मतांच्या आधारावर होणार असते . पण आपण लोकनेता/ नगरसेवक निवडताना काही महत्वाची बाबींचा विचार करायला पाहिजे.

आपण सुरवातीला नगरसेवक / लोकनेता कसा असावा याबद्दल विविध धर्म ग्रंथाचा संदर्भ घेऊन संकलित केलेली नाही ती अशी :चाणक्यनीती नुसार  लोकनेता/नगरसेवकाने व्यवहारकौशल्य व धोरणात्मक दूरदृष्टी ठेवावी. कृष्णनीती नुसार  नगरसेवकाने सेवाभाव, न्यायप्रियता व लोकसंग्रह साधावा.विदुरनीती नुसार नगरसेवकाने सत्यनिष्ठा, धर्मनिष्ठा व प्रजेसाठी त्यागभाव ठेवावा.

धर्मशास्त्रानुसार नुसार   नगरसेवक धर्मपालक व प्रजासुरक्षक असावा.

अर्थशास्त्रानुसार नगरसेवक पारदर्शक, न्यायप्रिय व विकासाभिमुख असावा.

तसेच पुराणानुसार नगरसेवक / लोकनेता  म्हणजे समाज, ग्राम किंवा नगराचे कल्याण साधणारा अधिकारी किंवा सेवक असावा . त्याचे कार्य धार्मिक, सामाजिक, प्रशासनिक व नागरिकांच्या हितासाठी ठरवलेले आहे. अठरा पुराणामधून घेतलेल्या संदर्भानुसार लोकनेता / नगरसेवक बद्दल असणाऱ्या अपेक्षित कार्यक्षमता  आणि  त्याचे कार्य :

1. विष्णु पुराण नगर सेवकाने नगरातील नियम, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि धर्मपालनाची दक्षता घ्यावी.

2. ब्रम्ह पुराणगरीब व असहाय लोकांची मदत करणे, नगरात संतोष निर्माण करणे.

3. विष्णु पुराणनगरात धार्मिक उत्सव, यज्ञ आणि समाजकल्याण कार्यांचे आयोजन करणे.

4. देवी भागवत पुराण नगरातील स्त्री व बालकांचे रक्षण, शिक्षणाची सोय करणे.

5. शिव पुराण नगरातील धार्मिक स्थळे, मंदिरांची देखभाल व पूजा व्यवस्थापन करणे.

6. भागवत पुराण नगरात सामाजिक न्याय राखणे व चोरटे, अपकार करणाऱ्यांवर योग्य उपाय करणे.

7. गरुड पुराण नगरातील आरोग्य व स्वच्छतेवर लक्ष ठेवणे, रुग्णालय व औषधालय व्यवस्था.

8. नारद पुराण (संशोधन) नगरात नियम मोडणाऱ्यांवर दंडाचे प्रावधान करणे.

9. लिंग पुराण धार्मिक विधी, अनुष्ठान व नगरातील परंपरागत सणांचे आयोजन.

10. मार्कंडेय पुराणनगरातील कृषी, जलसिंचन आणि बाजार व्यवस्थापनाची जबाबदारी.

11. स्कंद पुराण नगरातील शिक्षण व संस्कृतीचे संवर्धन करणे.

12. वामन पुराण नगरातील प्रशासनिक न्यायालय व स्थानिक विवादांचे निराकरण.

13. कुर्म पुराण नगरातील व्यापार, कर व आर्थिक व्यवस्थापन.

14.मत्स्य पुराण नगरातील सार्वजनिक सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन.

15. अग्नि पुराण नगरातील अग्नि सुरक्षा, शस्त्रसंचय व संरक्षण.

16. वराह पुराण नगरातील गरीब व वंचितांसाठी कल्याणकारी योजना राबवणे.

17. नारद पुराण नगरातील माहिती संकलन व शासनापर्यंत पोहचवणे.

18. भविष्य पुराणनगरात ज्ञान, कला व विज्ञानाचे संवर्धन करणे.

याचा सारांश लोकनेता / नगरसेवक कार्य केवळ प्रशासानापुरते मर्यादित नाही , तो धार्मिक ,सामजिक ,आर्थिक, शैक्षणिक  व सांस्कृतिक दृष्टीने नगराचा/ विभागाचा/ राष्ट्राचा विकास, उत्कर्ष,कल्याण साधतो.

 

आता वरील ग्रंथांच्या संदर्भानुसार ज्याची आपण निवड करणार आहे त्याला आपल्या समाजाबद्दल लोकांबद्दल , तिथल्या पंच महाभुत म्हणजे , जमीन, पाणी, हवा,                      (Environment) , अग्नी ( वातवणातील तापमान, दाब) आणि आकाश ( म्हणजे आकाशात होणारे बदल व त्यामुळे होणारे परिणाम) ह्या गोष्टींचा अभ्यास  आहे का?  

 

आपल्याला हसू येईल की काय अपेक्षा की  लोकनेता/ नगरसेवकाला पंचमहाभूतांचे ज्ञान पाहिजे ?

 पण मित्रांनो हसण्यावर नेऊ नका . माझा उद्देश हाच आहे की त्याला तिथल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा माहिती , अभ्यास पाहिजे. 

 

मूल्य शिक्षण त्याला अवगत पाहिजे . परत इथे कठीण शब्द मूल्यशिक्षण म्हणजे त्याला प्रामाणिकता, विनम्रता कर्तव्य दक्षता ,कष्टाळू पण, चिकाटी , प्रेमळ ता , उदारता ,सहिष्णूता , सेवाभाव, सर्वधर्मजाती समानता इ. असे गुण अंगीभूत हवेत.

 

त्याच्याजवळ दूरदृष्टी, विचारक्षमता , कल्पना रचना चुतुरता , व्यवस्थापनता , आणि महत्वाचे म्हणजे विश्वासप्राप्तता . 

*सर्व जण हिताय व सर्व जण सुखाय* हि भावना व्यक्त करून काही माफक अपेक्षा

 

राजकारणात, समाजकारणात आहेत याचा अर्थ समाज जागृती, प्रबोधन समाजकार्य विकास या भावनेने .राष्ट्रातील/ विभागातील/ नगरातील/गावातील वंचित लोकांसाठी ,गरीब ,असहारा,वृध्द, अनाथ,अपंग,निराधार लोकांसाठी व त्यांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा देण्यासाठी, नागरिकांचा मानसिक, शारीरिक, अध्यात्मिक विकास करण्यासाठी. राष्ट्र/ विभाग/ नगर/ गाव हे कुटुंब व नगरातील/ गावातील/ विभागातील प्रत्येक व्यक्ती सभासद. त्यांचा विकास करण्याची जबाबदारी प्रमुखाची. प्रत्येक नागरिक सुख , समाधान, शांती ऐश्वर्य समृध्दी पूर्वक जगण्याची जबाबदारी प्रमुखाची. न्याय, सुरक्षा,मूलभूत. सुविधांची जबाबदारी प्रमुखाची.

 

राष्ट्र उत्कर्ष/ विभाग / नगरविकास होण्यासाठी अपेक्षा पुढीप्रमाणे. 

आदर्श नगरासाठी कार्य

१) मूलभूत सुविधां( अन्न सुरक्षा, वस्त्र,निवारा)

२)मूलभूत शिक्षणाची सुविधा

३)सार्वजनिक वाचनालय

४)मूलभूत आरोग्य सुविधा

५)सुंदर अत्याधुनिक सार्वजनिक बगीचा 

६)शेती तक्रार व सल्ला, संशोधन कार्यालय

७)न्याय व तक्रार निवारण केंद्र

८) आत्मनिर्भर ग्राम केंद्र

९) योग ,व्यायाम ,खेळ सुविधा

१०)रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मदत केंद्र

११) रस्ते ,लाईट, दुतर्फा झाडं ,वृक्ष संवर्धन

१२)नागरिक मदत केंद्र

१३) कन्या व महिला सबलीकणासाठी कार्य

१४) गरीब, अशिक्षित,असहरा,अनाथ, वृध्द लोकांसाठी कार्य 

१५) आपत्ती व्यवस्थापन व निवारण केंद्र.

१६)शेती पूरक व्यवसाय व इतर व्यवसाय प्रोत्साहन, संवर्धन व संरक्षण केंद्र

१७)साक्षरता केंद्र

१८) डिजिटल अवेयरनेस व मार्गदर्शन केंद्र

१९)शेती भाव व इतर व्यवसाय हमी भाव 

२०) हुशार विद्यार्थी , विशेष कार्य करणारी नागरिक प्रोत्साहन पुरस्कार

२१) संस्कार केंद्र

२२)भारतीय संविधान अभ्यास केंद्र

२३) अर्थ वाढि करता योजना

२४)शेजारी गांव/नगर मित्र संवर्धन योजना

२५) नगरविकास वार्षिक प्लान

 

वरील कार्य पूर्णत्वाचा विचार आणि अभ्यास करणाऱ्याला च मतदान करावे व निवडून आणावे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*

जर जीवनच नसेल तर कसले कार्य आणि काय?