*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*
*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*
डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे
( नोट - कृपया हे माझे वैयक्तिक विचार आहे याचा कुणाशीही संबंध नाही. )
होय, सरकारची विफलता ही कशी? याचे उत्तर लेख वाचल्यावर मिळेल.
पुण्यातली हुंडाबळी ची बातमी ऐकली आणि व्यतीत झालो. शिक्षित आणि प्रगत असलेल्या समाज्यात असल्या वाईट घटना ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मुलं मुली उच्च शिक्षित आहे. दोन्हीही कमावते आहेत आणि मग हा उच्च नीच प्रकार येतो कुठे?
उलट आज परिस्थिती अशी आहे की मुलीला मुलांपेक्षा पगार जास्त असतो. मग हुंडा आला कसा? मागणाऱ्यालाही आणि देणाऱ्यालाही लाज वाटली पाहिजे. की आपण काय करतो आहे ?
पूर्वीच्या काळी अश्या बऱ्याच घटना घडल्या होत्या. कारण मुलगी शिक्षित किंवा कमवती नव्हती. मुलिंजवळ दोनच पर्याय होते ते म्हणजे सासर आणि माहेर. त्यामुळे सासरची मंडळी छळ करीत होते. मुलीच्या वडिलांनी मुलगीपण द्यायची , वरून हुंडापण द्यायचा अशी मूर्खपणाची चालीरीती परंपरा सुरू होती. त्यामुळे मुलीला वाटायचे एकदा लग्न झाले की माहेर संपले . आणि आई वडील पण तिला सांगायचे की आम्ही कन्यादान केले त्यामुळे तुझा आमच्याशी कुठलाही संबंध राहिला नाही. तू परक्या घराशी संबंधित आहे. आणि तिथे गेल्यावर सासू, सासरे , नणंद, जाऊ, दिर हे त्यांच्या तिथल्या घराचं त्यांचं वर्चस्व दाखविण्यासाठी प्रयत्नशील असायचे . त्याकरिता ते वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून नवी नवरी की जिला पुरेसे माहेरचे प्रेमपण मिळाले नाही अश्या परिस्थितीत हा नवा सासर्वास भोगावयास मिळायचा . अतिशय केविलवाणी परिस्थिती त्या मुलीची व्हायची. त्यात जर नावरोबा चांगले समजूतदार असले तर ठीक नाही तर बिचारीला अन्याय म्हणजे अन्यायच सहन करावा लागायचा. काय करणार? कोणाला सांगणार? माहेरी जाऊन पण काय? माहेरच्यांना भार कश्याला द्यायचं? आधीच माहेरची परिस्थिती गरिबीची त्यात परत हा त्रास त्यामुळे बिचारी अन्याय सहन करायची.
त्यात सासरचे तिला माहेरून हे आण , ते आण असे भिकारी सारखे मागायचे . आणि मागणी पूर्ण झाली नाही तर मग छळ करायचे .
छळाचे प्रकार पण विविध असायचे . जसे उपाशी ठेवणे , शारीरिक मानसिक अत्याचार करणे , कामाचा अतिरिक्त भार देणे, अत्यंत विकृत आणि राक्षसी अत्याचार करणे. मग त्यावेळेस त्यांची बुद्धी ही संपूर्ण भ्रष्ट झालेली. कुठल्याही धर्म देव पाप पुण्य याचे भान नाही. अत्यंत क्रूरपणे द्वेष ,लोभी बुद्धीने अत्याचार करणे एवढेच त्यांना दिसायचे . आणि कुणी जर त्यांना विरोध केला तर त्यालाही उलट बोलणे किंवा त्यावर उलट प्रहार करणे . अश्या दानवी प्रकृतीने ते लोक समाजात वावरत होते. आणि प्रतिष्ठितपणाचा आव आणून समाजाला वेगळे चित्र दाखवत राहायचे. त्याकाळी मुलगी ही कमविण्यासाठी व स्वतः ची सुरक्षा करण्यास असमर्थ असल्यामुळे तिला नवऱ्याकडे पाठविले जायचे की जेणे करून तिचे पुढील आयुष्य सुरक्षित आनंददायक राहील.
*कन्यादान* हा शब्दच चुकीचा आहे . कन्या कोणती वस्तू नाही की तुम्ही तिला दान करतात. आणि तिला वस्तू समजुन दान करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? कन्यादान म्हणणारी संस्कृतीच मान्य नाही. बरे मग पुत्रदान का नाही?
पण आता काळ बदलला आहे. *मुलगी शिकलेली आहे* .
स्व रक्षण करण्यास समर्थ आहे. स्वतः कमावती असून आत्मनिर्भर आहे. स्वतंत्र विचारसरणीची आहे . स्वतःचा चांगला वाईट निर्णय घेण्याची क्षमता आहे. मग तरीही अश्या दुदैवी घटना का घडतात? याचा अर्थ कुठे तरी कमी आहे?
बरे मग कायदे ,सुव्यवस्था आहे. सरकार, पोलिस , न्यायव्यवस्था आहे. तरी पण या नराधमाना धाक ,दहशत का नाही? पोलिस यंत्रणा व त्यांचे गुप्तहेर खाते किंवा त्यांचे खबरी, पोलिस मित्र हे काय करतात? शेजारी पाजारी , नातेवाईक ,मित्रमंडळी, काय करतात ? मेल्यानंतर बातमी सांगण्यापेक्षा आधी का नाही सांगत? पोलिसांचे खबरी जर प्रत्येक विभागात कार्यरत असतात तर त्यांना ह्या अनैतिक बाबींची माहिती का मिळत नाही? याचा अर्थ सुव्यवस्था ढासळली गेली आहे. शांतता ,सुव्यवस्था ,मूलभूत गरजा ,शिक्षण, सुरक्षा हे सरकारचे कर्तव्य असते. आणि अशी एक जरी घटना घडली तर जबाबदार कोण?
आपण रामराज्य म्हणतो .पण राम राज्यात शांतता सुव्यवस्था नियम कार्य कर्तव्य जबाबदारी होती. प्रेम ,आनंद ,शांती ,सुख ,धन, संपत्ती,मूलभूत गरजा, अधिकार होता. त्यामुळे लोक सुखी आनंदी होती. याचा अर्थ म्हणजे राम राज्यात अशी व्यवस्था होती की प्रजेची कुठलीही समस्या ही राजाला व त्यांच्या अधिकाऱ्यांना माहिती व्हायची व ते त्याचे निराकरण करायचे . अशी व्यवस्था होती की प्रत्येक कुटुंब व त्यातील सदस्य यांचा संपूर्ण इतिहास , भूगोल हा ग्रामअधिकाऱ्याला माहिती असायचा.
*आपला उद्देश हाच की रामराज्य बनवू या?*
धन्यवाद
Comments
Post a Comment