होलचक्र - *जमाव नियंत्रित करणारे तंत्र*
 *होलचक्र - *जमाव  नियंत्रित करणारे तंत्र* कोरोना चा काळ होता. लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडत होती. आणि आपली व आपल्या कुटुंबाची भूक भागविण्यासाठी काही लोक प्राण हातावर घेऊन काम शोधायला किंवा बाजारात ; नाही तर पब्लिक परिवहन मध्ये जात होती.  त्याचवेळेस सरकारंने आदेश दिले की गर्दी करू नका. एकमेकांना स्पर्श करू नका. साथीचे आजार वाढत आहे.  पण काय करणार?  पोटात असलेला भुकेचा गोळा शांत राहू देत नव्हता.  लोकांची अशांतता  मात्र ते बघून अतिशय बेचैन झालो.  काय करायचे ? कसे करायचे? परमेश्वराला शरण जाऊन  प्रत्येक जण प्रार्थना करत होते की परमेश्वरा तू जर आहेस तर लोकांचे प्राण वाचव . लोकांना या संकटातून बाहेर काढ. आणि त्यासाठी काहीतरी आश्चर्य दाखव.  बाहेर सगळं बंद . स्मशान शांतता.! कुणी कोणाच्या घरी येत जात नव्हते. मी पण माझ्या घरात बंद होतो. घरामध्ये पौराणिक ऐतिहासिक ग्रंथ आहेत त्याचे वाचन करत होतो.  जीव तोडून या लोकांसाठी काहीतरी मदत करता येईल काय म्हणून प्रयत्न करीत होतो यावेळी महाभारत ,भागवत आणि भगवत गीता या ग्रंथांचे वाचन करीत होतो तेव्हा असे ...