होलचक्र - *जमाव नियंत्रित करणारे तंत्र*
*होलचक्र - *जमाव नियंत्रित करणारे तंत्र*
कोरोना चा काळ होता. लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडत होती. आणि आपली व आपल्या कुटुंबाची भूक भागविण्यासाठी काही लोक प्राण हातावर घेऊन काम शोधायला किंवा बाजारात ; नाही तर पब्लिक परिवहन मध्ये जात होती.
त्याचवेळेस सरकारंने आदेश दिले की गर्दी करू नका. एकमेकांना स्पर्श करू नका. साथीचे आजार वाढत आहे.
पण काय करणार? पोटात असलेला भुकेचा गोळा शांत राहू देत नव्हता.
लोकांची अशांतता मात्र ते बघून अतिशय बेचैन झालो.
काय करायचे ? कसे करायचे? परमेश्वराला शरण जाऊन प्रत्येक जण प्रार्थना करत होते की परमेश्वरा तू जर आहेस तर लोकांचे प्राण वाचव . लोकांना या संकटातून बाहेर काढ. आणि त्यासाठी काहीतरी आश्चर्य दाखव.
बाहेर सगळं बंद . स्मशान शांतता.! कुणी कोणाच्या घरी येत जात नव्हते. मी पण माझ्या घरात बंद होतो. घरामध्ये पौराणिक ऐतिहासिक ग्रंथ आहेत त्याचे वाचन करत होतो. जीव तोडून या लोकांसाठी काहीतरी मदत करता येईल काय म्हणून प्रयत्न करीत होतो यावेळी महाभारत ,भागवत आणि भगवत गीता या ग्रंथांचे वाचन करीत होतो तेव्हा असे लक्षात आले की महाभारतांत द्रोणाचार्य यांनी चक्रव्यूहची रचना केली आणि त्या चक्रव्यूह मध्ये कोणीही जाऊ शकत नव्हता. किंवा त्यात आत जाण्यास फक्त एकच मार्ग होता. मग माझे विचार चक्र सुरू झाले की याचा आपण लोकांची गर्दी कंट्रोल करण्या साठी करू शकतो काय? मग मी साध्या कागदावर ग्रंथांमध्ये सांगितल्या प्रमाणे चक्रव्यूह चा नकाशा तयार केला. आणि गर्दी कशी कंट्रोल करायची यावर विचार करत होतो . दोन कच्चे नकाशे तयार केले. एक नकाशा हा पूर्ण गाव कसे चक्रव्यूह च्या माध्यमातून नाकाबंदी करता येईल व दुसरा नकाशा रुग्णालय कसे नाकाबंदी केली जाईल याच्यावर होता.
झाले ! मी फेसबुकला शेअर केला लोकांचे रिस्पॉन्स येऊ लागले. पण सकारात्मक नव्हते म्हणून मी तिसरा प्लॅन तयार केला की गाव आणि रुग्णालय पेक्षा वैयक्तिक माणूस कसा कंट्रोल करायला पाहिजे. आणि मग ठरविल्या प्रमाणे नकाशा तयार केला.पण तो नकाशा कच्चा होता त्याला ऑटोकॅड मध्ये तयार करायचं नंतर कटिया / अन्सिस मध्ये अन्यालिसीस करायचे म्हणजे मोठे दिव्यच होत . पण परमेश्वराच्या कृपेने मित्रांची साथ मिळाली आणि हे करू सिद्ध झाले. मी छोटस प्रपोजल तयार केले आणि फंड मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि बऱ्याच ठिकाणी अर्ज केले त्याचा काहीच रिप्लाय आला नाही म्हणून मी पुणे विद्यापीठात अर्ज केला तिथून पण मला नकार आला. काय करायचं सुचत नव्हतं. माझा पगार पण बंद होता. माझ्या जवळ काही रकम सेविंग मध्ये होते त्याचा वापर करून तो फायनल नकाशा तयार केला . पण कोणाचा काहीच रिस्पॉन्स नव्हता मग मी विचार केला याचे ३D प्रिंटिंग तंत्रज्ञानामध्ये मॉडेल तयार करायचे आणि ठरविल्या प्रमाणे ते मॉडेल तयार केले.आणि त्या मॉडेल चे नाव ठेवले *होलचक्र*.
मी अतिशय आनंदात होतो व लोकांना मॉडेल दाखवू लागलो पण लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. लोक सरकारी आदेशानुसार दूर दूर जाऊ लागले. मी तोंडावर डबल मास्क घालून बाहेर पडू लाग लो पण प्रतिसाद कमी होता. माझे मॉडेल सर्व मान्य करण्यासाठी राजकारणी मंडळींना भेटलो. अधिकाऱ्याला समाजसेवकला, डॉक्टरला , इंजिनियरला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भेटलो पण संमिश्र प्रतिसाद व प्रतिक्रिया मिळाल्या. मी काही प्राध्यापक शास्त्रज्ञ ,संशोधक यांना हात जोडून विनंती करत होतो की तुम्ही याच्यावर विचार करा पण काहींनी याला सकारात्मक घेतले तर काहींनी नकारात्मक. दारोदारी जाऊन सुद्धा मॉडेल घरातच शोभेची वस्तू म्हणून डौलाने उभे राहिले . पण मला अभिमान आहे की काही तरी वेगळे नवीन करण्यासाठी वेळ खर्च केला.
धन्यवाद
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
Dean(R&D) RSCOE Pune
BOS SPPU Pune
President BSM Pune Mahanagar
Comments
Post a Comment