Posts

Showing posts from May, 2024
*व्यावसायिक शिक्षणाचे - यश आणि अपयश* *डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे* (*अभियांत्रिकी शिक्षणात यशस्वी होण्यासाठी मार्ग एकच* ) संध्याकाळची वेळ होती, प्रसन्न वातावरण होते. राम श्याम हे दोन मित्र अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यासाठी पुण्यात आलेले होते . दोघेही नोकरी बद्दल चर्चा करीत होते. राम नी पेपर मध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झाली ती दाखवली . ती जागा हो पोलीस भरती,बँक ,पोस्ट, जिल्हा परिषद लिपिक भरती या साठी होती. दोघंही आनंदानी एकमेकांशी बोलू लागले की आपण एवढा अभ्यास केलेला आहे . यातील एक परीक्षा तर आपण सहज पास करू व मस्त सरकारी नोकरी करू. दोघंही आनंदानी अर्ज कसा करायचा यावर विचार करू लागले . तिथेच शेजारी बसलेले सेवानिवृत्त अभियंता त्याचं सर्व बोलणं ऐकत होते. त्यांनी राम श्याम ला विचारलं की तुम्ही इंजिनिअर आहात का? दोघांनी अतिशय अभिमानाने सांगितले , हो , आम्ही इंजिनिअर आहोत. आम्ही अभियांत्रिकीचा चार वर्षाचा कोर्स पूर्ण केला आहे. मग त्या साहेबांनी त्यांना काही प्रश्न विचारलं की तुमचे शिक्षण कुठे ,कसे ,कशात ,कधी केव्हा झालेले आहे? राम श्याम नी पण त्याचे उत्तर दिले...