*व्यावसायिक शिक्षणाचे - यश आणि अपयश*
*डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे*
(*अभियांत्रिकी शिक्षणात यशस्वी होण्यासाठी मार्ग एकच* )
संध्याकाळची वेळ होती, प्रसन्न वातावरण होते. राम श्याम हे दोन मित्र अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यासाठी पुण्यात आलेले होते . दोघेही नोकरी बद्दल चर्चा करीत होते. राम नी पेपर मध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झाली ती दाखवली . ती जागा हो पोलीस भरती,बँक ,पोस्ट, जिल्हा परिषद लिपिक भरती या साठी होती. दोघंही आनंदानी एकमेकांशी बोलू लागले की आपण एवढा अभ्यास केलेला आहे . यातील एक परीक्षा तर आपण सहज पास करू व मस्त सरकारी नोकरी करू. दोघंही आनंदानी अर्ज कसा करायचा यावर विचार करू लागले .
तिथेच शेजारी बसलेले सेवानिवृत्त अभियंता त्याचं सर्व बोलणं ऐकत
होते. त्यांनी राम श्याम ला विचारलं की तुम्ही इंजिनिअर आहात का? दोघांनी अतिशय अभिमानाने सांगितले ,
हो , आम्ही इंजिनिअर आहोत. आम्ही अभियांत्रिकीचा चार वर्षाचा कोर्स पूर्ण केला आहे. मग त्या साहेबांनी त्यांना काही प्रश्न विचारलं की तुमचे शिक्षण कुठे ,कसे ,कशात ,कधी केव्हा झालेले आहे?
राम श्याम नी पण त्याचे उत्तर दिले. तेव्हा ते गृहस्थ त्यांच्याशी बोलू लागले , ते म्हणाले मी काय सांगतो ते नीट ऐका . ऐकणार का? कृपया माझे विचार ऐकून घ्या व त्यावर नंतर तुम्ही चिंतन व मनन करा.
ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. अभियंते आणि डॉक्टर हे व्यावसायिक शिक्षण घेतलेले असतात . जर आपण मेकँनिकल अभियंत्याचा विचार केला तर सकाळच्या ब्रश पासून ते झोपण्यापर्यंतच्या सगळ्या वस्तू ह्या मेकॅनिकल इंजिनिअर तयार करतो म्हणजे त्याच्या शिक्षणात सर्व मशीन व त्यांचे अवयव , लिंकेज असतात. आणि त्याच्यातच असलेले थर्मल , डिझाईन,उत्पादन, मटेरियल मेटँलरजी , , इंडस्ट्रीयल असे विविध प्रकारचे शिक्षण असते . तसेच ई & टिसी चा विचार केला तर सर्व इलेक्ट्रॉनिक पार्टस व पद्धत अभ्यासली गेली असते. तसेच कॉम्प्युटर आणि आय टी अभियंत्याचे तर सर्व विश्वच त्यांचे आहे तसेच सिव्हिल इंजिनिअर नी तर घर , रस्ते, , बिल्डिंग पर्यावरण, कन्स्ट्रक्शन , स्ट्रक्चर याचा अभ्यास केलेला असतो .
पण मग प्रश्न महत्वाचा असा आहे की हे सर्व शिकलेला अभियंता यातील फक्त एक क्षेत्र निवडू शकता नाही का? का त्याला इतर पदाकरीता अर्ज करण्याची गरज भासते? वरील पैकी कोणतेही एक क्षेत्र निवडून नोकरी किंवा व्यवसाय करू शकतो .
पण याचे उत्तर एकच आहे वरील सर्व विषय जर अभियांत्रिकी मध्ये असले तरी त्या अभियंत्यांना तयार करताना कुठे तरी उणीव झालेली आहे. म्हणजे त्याला त्या विषयाचे ज्ञान ग्रहण करणे अति आवश्यक असते .
विषयाचा सखोल अभ्यास केला तर अभियंत्याचा विश्वास दृढ होतो आणि तो आपल्या व्यावसायिक शिक्षणाचा उपयोग करून आपला चरितार्थ चालवितोच पण देश, समाज कार्य करीत असतो. मग इथे प्रश्न आहे चूक कोणाची आहे?
शिक्षणपद्धतीची, प्रवेश पद्धतीची, परिक्षापद्धती ची., की अपयश हे शिक्षकाचे ,पालकांचे , विद्यार्थ्यांचे, समजाचे, विद्यापीठाचे, राज्यस्तरावरील, देश पातळीवरील कार्य करणाऱ्या व्यक्तींचे, संस्थांचे, किंवा सरकारचे ह्या सर्वांच बाबींचे आकलन व मूल्यांकन करणे गरजेचे आहे.
तसेच डॉक्टर, वैद्य या व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना पर्याय भरपूर असतात . आरोग्य ह्या मानवी जीवनातील सर्वात महत्वाच्या विषयासंबंधी शिक्षण झालेलं असतं. मग इथे असे काय घडले की त्यांना दुसऱ्या विषयांच्या नोकरी करीतां अर्ज करावे लागतात.
अतिशय गंभीर आणि मार्मिक विषय आहे.
अरे बाबांनो जगातील प्रत्येक व्यक्ती हा डॉक्टर आणि अभियंत्याला अवलंबून असतो . मी तर शेवटचं सांगतो की अभियंत्याशिवय हे जगचं चालू शकत नाही.
समाजातील सर्वात महत्वाचा घटक हा डॉक्टर ,इंजिनिअर आहे.
तुम्ही म्हणाल, आम्ही इंजिनिअर आहोत पण माझा तुम्हाला सांगणे आहे की, तुम्ही आतापर्यंत बऱ्याच विषयांचा अभ्यास केला आहे, तुम्ही फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केले आहे.फक्त परीक्षार्थी झालात.
पण बाळांनो , तुम्ही त्यानंतर त्या विषयांचा सखोल अभ्यास , आकलन केले आहे का? की या विषयामध्ये मला कोणकोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात . किंवा या विषयामुळे मी कोणकोणते व्यवसाय, प्रॉडक्ट , स्टार्ट अप ,संशोधन, नवनिर्मिती करू शकतो. इतके विषय अभ्यासले पण त्या विषयांचा मला व सामान्य लोकांना , समाजाला किती टक्के उपयोग होऊ शकतो.
माझे तर स्पष्ट मत आहे की *अभियांत्रिकीचा प्रत्येक विषय म्हणजे सोन्याचा खजाना आहे . परमेश्वराने एकत्र केलेले पुस्तक रुपी वरदान आहे.* कुणी त्याचा कसा ,कुठे ,केव्हा, कधी, उपयोग करायचा हा त्याचा वैय्यक्तिक प्रश्न आहे. पण मुलांनो विचार करा इतर कुठे दुसरीकडे जाण्यापेक्षा स्वतः चार वर्ष मेहनत करून मिळविलेल्या ज्ञानाचा वापर करून आपल्या जीवनात आनंद समाधान कीर्ती आणि यश संपादन करून आपल्या आई वडील समाजाचे देशाचे नाव उज्ज्वल होईल असे कार्य करावे व पुढील पिढी साठी उज्ज्वल सुखी , सुरक्षित, आनंदित भविष्य निर्माण करावं. एवढे बोलून ते गृहस्थ आपल्या मार्गाने निघून गेले . आणि राम श्याम पण विचारात गुंतून गेले .
माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*
*माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव* लेखक - डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे (PhD) संध्याकाळची वेळ होती कुंभमेळ्याच्या बातम्या बघत होतो. आणि मनात एक विचार आला की आपण महाकुंभ प्रयाग राज येथे जायला पाहिजे आणि माझी कित्येक वर्षाची इच्छा पण होती की कुंभमेळा बघायला पाहिजे. तिथे साधू संत महात्मे यांचे दर्शन घ्यायला पाहिजे. ठरलं!! कुंभ मेळयाला जायचे . आता तीन पर्याय होते , बस ,रेल्वे, आणि विमान . पण बस आणि रेल्वे ने दोन दिवस जायला व दोन दिवस यायला म्हणजे चार दिवस गेले असते. मग मी मित्रांना व आमच्या घरच्यांना विचारले पण काहीतरी अडचणी समोर आल्या आणी त्यांचे रद्द झाले .मग मी ठरविले की विमानाने जायचे व यायचे आणि त्याप्रमाणे मी आखणी केली की पुणे ते काशी व काशी ते प्रयाग राज आणि प्रयाग राज ते पुणे असा मार्ग होता. पण डायरेक्ट फ्लाईट नव्हती. म्हणून कनेक्टिंग फ्लाईट बुक केली. पुणे ते हैद्राबाद व हैद्राबाद ते काशी असा प्रवास झाला. काशी वाराणाशी विमानतळावरून आय आय टी बी एच यू मध्ये आमच्या मित्रांनी गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सोय केली होती. त्याप्रमाणे मी तिथे पोहोचलो अतिशय भव्य द...
Comments
Post a Comment