नवनिर्मिती ,संशोधन, इन्कुबॅशन संकल्पना
*नवनिर्मिती ,संशोधन, इन्कुबॅशन संकल्पना*  *लेखक - डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे*  एक आटपाट नगर होते त्या नगरात राम व श्याम हे दोन मित्र राहत होते. दोघे ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. दोघेही अतिशय हुशार आणि मेहनती प्रामाणिक कष्टाळू होते. त्यांना नेहमी वाटायचे की आपल्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाचं फायदा हे सामान्य लोकांना , समाजाला, देशाला व्हायला पाहिजे . म्हणून ते नेहमी नवनवीन प्रयोग,रचना, आयडिया शोधायचे आणि त्यावर विचार करायचे . त्यांच्या सुपीक डोक्यातून असंख्य अश्या आयडिया उत्पन्न व्हायच्या आणि मग ते त्यावर चर्चा करायचे आणि विसरून जायचे .  तो सोमवारचा दिवस होता सरांचे thermodynamic चे लेक्चर होते . आज विद्यार्थी पण वेगळ्या मनस्थितीत होते. त्यांनी सरांना विनंती केली की आज आम्हाला इतर विषयांवर व्याख्यान द्या.  सरांनी पण विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन बोलायला सुरुवात केली., मुलांनो आज मी तुम्हाला innovation incubation and linkage या विषयावर चर्चा करणार आहे.  मुलांनो , अतिशय महत्वाचा विषय आहे,मला माहिती आहे की तुमच्याजवळ प्रचंड अशी कल्पनाशक्ती ,रचना मांडणी, आयडिया आहेत पण  त्या चे क...