नवनिर्मिती ,संशोधन, इन्कुबॅशन संकल्पना

*नवनिर्मिती ,संशोधन, इन्कुबॅशन संकल्पना* *लेखक - डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे* एक आटपाट नगर होते त्या नगरात राम व श्याम हे दोन मित्र राहत होते. दोघे ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. दोघेही अतिशय हुशार आणि मेहनती प्रामाणिक कष्टाळू होते. त्यांना नेहमी वाटायचे की आपल्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाचं फायदा हे सामान्य लोकांना , समाजाला, देशाला व्हायला पाहिजे . म्हणून ते नेहमी नवनवीन प्रयोग,रचना, आयडिया शोधायचे आणि त्यावर विचार करायचे . त्यांच्या सुपीक डोक्यातून असंख्य अश्या आयडिया उत्पन्न व्हायच्या आणि मग ते त्यावर चर्चा करायचे आणि विसरून जायचे . तो सोमवारचा दिवस होता सरांचे thermodynamic चे लेक्चर होते . आज विद्यार्थी पण वेगळ्या मनस्थितीत होते. त्यांनी सरांना विनंती केली की आज आम्हाला इतर विषयांवर व्याख्यान द्या. सरांनी पण विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन बोलायला सुरुवात केली., मुलांनो आज मी तुम्हाला innovation incubation and linkage या विषयावर चर्चा करणार आहे. मुलांनो , अतिशय महत्वाचा विषय आहे,मला माहिती आहे की तुमच्याजवळ प्रचंड अशी कल्पनाशक्ती ,रचना मांडणी, आयडिया आहेत पण त्या चे काय करायचे . फक्त कल्पनाच. आणि यावर मला एक संस्कृत श्लोक आठवतो ," उत्पदंतेच विलियंतेच दरिद्रानां मनोरथः याचा अर्थ धन ,अर्थ नसलेल्या माणसाचे मनोरथ कल्पना ,विचार उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात. बरे का मुलांनो हे जरी खरं असलं तरी भारत सरकारने संशोधनासाठी नवनवीन योजना राबविल्या आहेत . त्यापैकी अटल innovation मिशन आहे त्यामध्ये अटल इनोव्हेशन मिशन (AIM), NITI आयोग हा देशातील नाविन्यपूर्ण आणि उद्योजकतेच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी भारत सरकारचा प्रमुख उपक्रम आहे आणि 2016 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती. या दिशेने AIM ने समस्या सोडवणाऱ्या नाविन्यपूर्ण निर्मितीची खात्री करण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारला आहे. शाळांमध्ये मानसिकता आणि विद्यापीठे, संशोधन संस्था, खाजगी आणि एमएसएमई क्षेत्रात उद्योजकतेची परिसंस्था निर्माण करणे. AIM च्या सर्व उपक्रमांचे सध्या रीअल-टाइम MIS सिस्टीम आणि डायनॅमिक डॅशबोर्ड वापरून देखरेख आणि व्यवस्थापित केले जाते. एआयएम सध्या सतत सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी तृतीय पक्ष एजन्सीद्वारे त्यांच्या कार्यक्रमांचे पुनरावलोकन करत आहे. अटल टिंकरिंग लॅब्स - शालेय स्तरावर AIM ने अटल टिंकरिंग लॅब (ATL) कार्यक्रम सुरू केला आहे. ATL ही एक अत्याधुनिक जागा आहे जी एका शाळेत स्थापण्यात आली आहे ज्याच्या उद्देशाने तरुणांच्या मनात जिज्ञासा आणि नाविन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने, देशभरात इयत्ता 6 वी ते 12 वी दरम्यान 21 व्या शतकातील इंटरनेट ऑफ थिंग्ज, 3D प्रिंटिंग, यांसारख्या उपकरणे आणि तंत्रज्ञानाद्वारे. जलद प्रोटोटाइपिंग साधने, रोबोटिक्स, लघु इलेक्ट्रॉनिक्स, स्वतः करा किट्स आणि बरेच काही. ATL आणि जवळपासच्या समुदायातील मुलांमध्ये समस्या सोडवणाऱ्या नाविन्यपूर्ण मानसिकतेला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे. आजपर्यंत, AIM ने देशभरातील शाळांमध्ये 10,000 अटल टिंकरिंग लॅबची स्थापना केली आहे. अटल उष्मायन केंद्रे - भारतातील स्टार्टअप्स आणि उद्योजकांची इकोसिस्टम तयार करणे *अटल इनक्युबेशन सेंटर्स किंवा AICs* हे AIM द्वारे देशातील तरुण नवोन्मेषकांमध्ये नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी विद्यापीठे, संस्था आणि कॉर्पोरेट्समध्ये स्थापित केलेले बिझनेस इनक्यूबेटर आहेत. या अटल इनक्युबेशन सेंटर्सचे उद्दिष्ट जागतिक दर्जाच्या नावीन्यपूर्णतेला चालना देणे आणि गतिमान उद्योजकांना समर्थन देणे आहे, ज्यांना स्केलेबल आणि टिकाऊ उद्योग उभारायचे आहेत. AIM ने संपूर्ण भारतात 72 AICs यशस्वीरित्या कार्यान्वित केले आहेत. हे AIC तांत्रिक सुविधा, संसाधन-आधारित समर्थन, मार्गदर्शन, निधी समर्थन, भागीदारी आणि नेटवर्किंग, सह-कार्य करण्याची जागा आणि प्रयोगशाळा सुविधा प्रदान करून स्टार्टअप सक्षम करतात. 3500+ स्टार्टअप्स या AIC मध्ये उष्मायनात आहेत आणि त्यांनी इकोसिस्टममध्ये 32000 हून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. सुमारे 1000+ स्टार्टअप्समध्ये महिला नेत्या आणि संस्थापक आहेत. AICs हेल्थटीच, फिनटेक, एडटेक, स्पेस आणि ड्रोन टेक, एआर/व्हीआर, फूड प्रोसेसिंग, टुरिझम यासारख्या विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सना समर्थन देते. अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्स - भारतातील सेवा न मिळालेल्या आणि सेवा नसलेल्या प्रदेशांना सेवा देत आहेत अटल न्यू इंडिया चॅलेंजेस - राष्ट्रीय प्रभावासह उत्पादन आणि सेवा नवकल्पना. अश्या प्रकारचे विविध उपक्रम राबवून भारत सरकार नवीन उद्योगांना प्रोत्साहन देऊन भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मुलांनो ही झाली माहिती. आता तुम्ही तुमच्या आयडिया प्रत्यक्षात कश्या पद्धतीने आणायच्या ते सांगतो . उदा. राम आणि श्याम जवळ एक नवीन आयडिया आहे की त्या आयडिया जर प्रत्यक्षात आणली तर त्यामुळे समाजाचा देशाचा आर्थिक विकास तर होणारच आहे पण बऱ्याच गरजू विद्यार्थ्यांना रोजगार संधी पण मिळणार आहे. मग राम श्याम नी काय काय करायचे innovation आणि incubation सेंटर कुठे कुठे आहे त्याचा तपास करायचा . व त्यांच्या वेबसाईट वर जाऊन आपल्या कल्पना ,आयडिया तिथे नोद करायच्या आहेत. त्यानंतर IIC चे mentors त्या आयडिया ची strength deployment बघतील नंतर त्या applicant ला लिखित स्वरुपात interview kinva presentation साठी बोलावतील . बरं कां राम श्याम तुम्हाला तिथे incubation सेंटर बद्दल माहिती सांगतील. मी पण तुम्हाला incubation सेंटर बद्दल माहिती सांगतो. आपण असे एकले असेल की premature बाळ जन्माला आले. मग त्या बाळाला डॉक्टर्स incubation सेंटर मध्ये ठेवतात . म्हणजेच काय त्याला तिथे सुरक्षित वातावरणात ठेऊन त्याच्यावर लक्ष ठेऊन मार्गदर्शन करून वाढवतात आणि ते बाळ mature झाले की त्याला बाहेर काढतात. त्याच प्रमाणे pramature idea ह्या incubation सेंटर मध्ये ठेऊन त्या आयडिया ला mature करतात. व नंतर त्यांना बाहेर काढतात. बरे का ! मुलांनो incubation सेंटर चे चार प्रकार असतात.१) preincubation २) corporate incubation ३) Physical incubation ४) virtual incubation. मुलांनो आता अतिशय काळजीपू्वक ऐका ! Innovation incubation सेंटर च्या पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. १) Preincubation - या मध्ये आयडिया ते prototype पर्यंत चा प्रवास असतो. २) incubation - या मध्ये prototype ते प्रॉडक्ट डेव्हलपमेंट पर्यन्त चां प्रवास असतो. या करिता लागणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन हे सेंटर करीत असते त्यामध्ये टेक्निकल mentorship, financial services, space requirements etc. ३) स्टार्ट अप - यामध्ये पूर्वी जो प्रॉडक्ट तयार झालेला आहे त्याला मार्केट मध्ये आणयासाठी मार्गदर्शन त्यामधे बिझिनेस नेटवर्क , venture capital मार्गदर्शन , टेक्निकल ,finanace guidance , registration government schemes authentication अश्या विविध प्रकारचे मार्गदर्शन केले जाते. व single person company किंवा त्यापेक्षा अधिक लोकांची कंपनी स्थापन करून उद्योग व्यवसाय निर्माण केला जातो. पण त्या मध्ये एक अट असते की तुमची company ही MSME च्या अंतर्गत यायला पाहिले . आता MSME म्हणजे Micra Small Medium Enterprises. याची माहिती तुम्ही इंटरनेट द्वारा घेऊ शकतात. ४) Accelerator - यामध्ये जे तुमचे statup सुरू आहे त्यामध्ये अधिक नवनवीन संशोधनं ,scale up , growth होण्यासाठी जे काही सर्व्हिसेस आहेत उदा. Finanace , technical, business development ideas , network, marketing, government schemes , authentication facilities etc. या अश्या अनेक प्रकारचे मार्गदर्शन केले जाते. तसेच मुलांनो आपल्या नवीन आयडिया ह्या पेटंट , copyright करण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन केले जाते. म्हणजेच काय *नवीन कल्पना ते prototype ते product ते पेटंट ते स्टार्ट अप ते Accelerator* अश्या सर्वांगिण विकासासाठी सरकार प्रयत्न करीत असते त्याचा फायदा आपण केला पाहिजे . यामुळे आपल्या स्वतः च्या विकासासोबत देशाचा पण विकास होतो. समजले काय मुलांनो जर कुणाला काही प्रश्न,शंका असली तर मला विचारा. प्रश्न१) स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर म्हणजे काय? उत्तर - स्टार्टअप इनक्यूबेटर किंवा उष्मायन केंद्र ही एक विशेष संस्था किंवा जागा आहे जी उद्योजक आणि सुरुवातीच्या टप्प्यातील उद्योगांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात विकसित आणि समर्थन देण्यासाठी तयार केली जाते . या सुविधा विविध साधने, सेवा आणि सहाय्यक सेटिंग देतात ज्यामुळे व्यवसाय वाढण्यास आणि अधिक जलद विकास करण्यात मदत होते. प्रश्न२) इनक्यूबेटरचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर - एक इनक्यूबेटर लहान मुलांसाठी त्यांच्या महत्वाच्या अवयवांचा विकास होत असताना त्यांना राहण्यासाठी सुरक्षित, नियंत्रित जागा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. साध्या बासीनेटच्या विपरीत, इनक्यूबेटर एक वातावरण प्रदान करते जे आदर्श तापमान तसेच ऑक्सिजन, आर्द्रता आणि प्रकाश यांचे परिपूर्ण प्रमाण प्रदान करण्यासाठी समायोजित केले जाऊ शकते त्याच प्रमाणे बाल स्वरूपातील कल्पना ही परिपूर्ण वातावरण देऊन उद्योग समूहात रूपांतरित करणे . प्रश्न३) इनक्यूबेटरची भूमिका काय आहे? उत्तर - बिझनेस इनक्यूबेटर अशा संस्था आहेत ज्या उद्योजकांना त्यांचे व्यवसाय विकसित करण्यासाठी, विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात मदत करतात . स्टार्ट-अप आणि सुरुवातीच्या टप्प्यातील कंपन्यांच्या वाढ आणि यशाला गती देण्यासाठी या संस्था आहेत. प्रश्न४) स्टार्टअपला इनक्यूबेटरची गरज का असते? उत्तर - स्टार्टअप इनक्यूबेटर्सचे उद्दिष्ट नवीन कंपन्या स्थापन करणे आणि नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, उद्योजकांनी त्यांच्या व्यावसायिक प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गृहीत धरले पाहिजेत असे खर्च आणि जोखीम कमी करणे. या संस्था खाजगी, विद्यापीठ किंवा सरकारी संस्था असू शकतात. प्रश्न ५) इनक्यूबेटर चांगले का आहेत? उत्तर - उष्मायन कार्यक्रम तुम्हाला व्यवस्थापन आणि मार्गदर्शन, बाजार संसाधनांमध्ये प्रवेश, नेटवर्किंग संधी आणि व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण प्रदान करतात . कोणत्याही सुरुवातीच्या टप्प्यातील उद्योजकासाठी ते महत्त्वाचे का आहे ते येथे आहे प्रश्न ६) उष्मायनाचे फायदे काय आहेत? उत्तर - उष्मायन का? उष्मायन प्रक्रिया उद्योजकांना भांडवल टिकवून ठेवण्यास आणि त्यांच्या व्यवसायाच्या वाढीला गती देण्यासाठी बाह्य समर्थन मिळविण्यास अनुमती देते . बिझनेस इनक्युबेशनद्वारे, एंटरप्राइझ सेंटर प्रत्येक उद्योजकाचे वेगळेपण कॅप्चर करते आणि व्यवसायाची क्षमता वाढवण्यासाठी समर्थन आणि सानुकूलित सेवा ऑफर करते. प्रश्न ७) स्टार्टअप इनक्यूबेटर किती काळ आहे? उत्तर - स्टार्टअप कंपन्यांच्या गरजा आणि उपलब्ध संसाधनांवर अवलंबून, इनक्यूबेटर प्रोग्रामची ठराविक लांबी कालांतराने बदलत असते. सुरुवातीचे इनक्यूबेटर कार्यक्रम दोन ते तीन वर्षे चालले, परंतु स्टार्टअप लँडस्केप बदलले आणि अधिक स्पर्धात्मक बनले, कार्यक्रम सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कमी झाले. प्रश्न ८) स्टार्टअपमध्ये बूटस्ट्रॅप म्हणजे काय? उत्तर - बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय? बूटस्ट्रॅपिंग ही गुंतवणूक आकर्षित न करता किंवा कमीत कमी बाह्य भांडवलासह सुरवातीपासून व्यवसाय तयार करण्याची प्रक्रिया आहे. इक्विटी शेअर न करता किंवा बँकांकडून मोठ्या रकमेचे कर्ज न घेता मालकाच्या खर्चावर संसाधने खरेदी करून आणि वापरून लहान व्यवसायांना वित्तपुरवठा करण्याचा हा एक मार्ग आहे. आतापर्यंत शांतपने ऐकत असलेले मुले उद्योग दुनियेच्या स्वप्नातून सत्यात आले . आणि चहा नाष्टा करण्यासाठी चर्चा करीत कॅन्टीन मध्ये निघून गेले.

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*