*महाविद्यालयीन शैक्षणिक समाजसेवक (College  Social teacher) ही काळाची गरज*  लेखक   डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे   (9860659246)  jahole1974@gmail.com  *समाजसेवक* हा शब्द आपण समाजाचा सेवक म्हणून जाणून आहे पण शैक्षणिक समाजसेवक हे ऐकायला जरा वेगळ आहे पण याचा सरळ अर्थ शिक्षणाकरिता शिक्षणक्षेत्राबाहेरील व्यक्ती जो शैक्षणीक कार्य करील तो.    विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ महाविद्यालयातूनच होत नाही. घरांतील वातावरणाचाही त्यांच्या विकासशील मनांवर परिणाम होत असतो. विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार करताना या दोन्ही ठिकाणी एकमेकांशी सहकार्य करायला हवे, एकमेकांना पूरक व्हावयाला हवे. विषयांच्या ज्ञान देणाऱ्या सर्वच शिक्षकांना हे कार्य करता येईल, असे नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता विशेष सेवकांची नियुक्ती केली गेली पाहिजे.  समाजसेवेचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींची या कार्याकरिता नेमणूक केली पाहिजे. महाविद्यालयीन जीवनातील विद्यार्थ्यांच्या समस्यांचे मूळ अनेकवेळा त्यांच्या कौटुंबिक जीवनांत आढळते. आजूबाजूच्या वातावरणाचाही...
Posts
Showing posts from September, 2024