*महाविद्यालयीन शैक्षणिक समाजसेवक (College Social teacher) ही काळाची गरज*
लेखक
डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे
(9860659246)
jahole1974@gmail.com
*समाजसेवक* हा शब्द आपण समाजाचा सेवक म्हणून जाणून आहे पण शैक्षणिक समाजसेवक हे ऐकायला जरा वेगळ आहे पण याचा सरळ अर्थ शिक्षणाकरिता शिक्षणक्षेत्राबाहेरील व्यक्ती जो शैक्षणीक कार्य करील तो.
विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ महाविद्यालयातूनच होत नाही. घरांतील वातावरणाचाही त्यांच्या विकासशील मनांवर परिणाम होत असतो. विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार करताना या दोन्ही ठिकाणी एकमेकांशी सहकार्य करायला हवे, एकमेकांना पूरक व्हावयाला हवे. विषयांच्या ज्ञान देणाऱ्या सर्वच शिक्षकांना हे कार्य करता येईल, असे नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता विशेष सेवकांची नियुक्ती केली गेली पाहिजे.
समाजसेवेचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींची या कार्याकरिता नेमणूक केली पाहिजे. महाविद्यालयीन जीवनातील विद्यार्थ्यांच्या समस्यांचे मूळ अनेकवेळा त्यांच्या कौटुंबिक जीवनांत आढळते. आजूबाजूच्या वातावरणाचाही त्यांच्या संस्कारक्षम मनावर बरावाईट परिणाम होतो. घरचे वातावरण योग्य असूनही वाईट संगतीमुळे विद्यार्थ्यांची वर्तणूक बिघडते. या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या समस्या शैक्षणिक समाजसेवकांच्या नजरेस आणणे हा यातील एक कामाचा भाग पाहिजे .
समस्यांचे निराकरण करण्याकरिता समाजसेवकांनी विद्यार्थ्यांबद्दल कॉलेजमध्ये उपलब्ध असणारी माहिती एकत्रित करून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन व त्यांच्या पालकांशी चर्चा करून आवश्यक ती माहिती दिली पाहिजे शिक्षकांना व पालकांना विद्यार्थ्यांबद्दल माहिती पुरवून विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निदान करण्यात आले पाहिजे . विद्यार्थ्यांशी वैयक्तिक चर्चा करून आवश्यकतेप्रमाणे मानसोपचारतज्ज्ञ किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडे धाडण्यात आले पाहिजे . निदानाच्या आधारावर विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले पाहिजे , विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्यात आले पाहिजे . त्यानुसार शैक्षणिक उपक्रमात, घरातील वातावरणात योग्य ते फेरफार करण्यात आले पाहिजे.
शिक्षणसंस्था व पालक यांच्यामध्ये दुवा म्हणून महत्त्वाचे कार्य करणाऱ्या या समाजसेवकांना घरी भेटणारे शिक्षक (social Teachers) असेही संबोधण्यात आले पाहिजे.
वर्गात, वर्गाबाहेर, क्रीडांगणावर, आपल्या सहकाऱ्यांबरोबर विद्यार्थ्याच्या वर्तणुकीकडे लक्ष देऊन प्रशासकांना व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या समस्यांचा अर्थ समजावून देण्याचे कार्य हे शिक्षक करतील. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत समस्यांचे निराकरण करून त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता या शिक्षकांचा उपयोग होईल. असमाधानकारक शैक्षणिक प्रगती, अनियमितपणा, समाजविन्मुखता, आक्रमक वृत्ती वगैरे प्रवृत्ती वेळीच रोखता येऊ शकते. या शिक्षकांची नेमणूक अगदी कॉलेज सुरू होण्याआधीच व्हायला पाहिजे.
अनुपरीक्षण (Follow-up)
शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाच्या उपक्रमांपैकी एक प्रमुख कार्य म्हणून अनुपरीक्षणाचा उल्लेख करावयाला हवा. मार्गदर्शनाच्या प्रभावीपणाचे मूल्यमापन करण्यासाठी, त्याचप्रमाणे मार्गदर्शन मिळालेल्या व्यक्तींच्या प्रगतीची तपासणी करण्यासाठी हे तंत्र उपयोगी पडते. आपल्या रोग्यांचा आजार बरा झाल्यानंतर ज्याप्रमाणे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतात, योग्य औषधोपचार सुचवितात, त्याप्रमाणेच मार्गदर्शकानेही आपल्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीची चौकशी करायला हवी. आवश्यकतेप्रमाणे योग्य नवीन उपाययोजना करावयाला भाग पाडले पाहिजे
माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*
*माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव* लेखक - डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे (PhD) संध्याकाळची वेळ होती कुंभमेळ्याच्या बातम्या बघत होतो. आणि मनात एक विचार आला की आपण महाकुंभ प्रयाग राज येथे जायला पाहिजे आणि माझी कित्येक वर्षाची इच्छा पण होती की कुंभमेळा बघायला पाहिजे. तिथे साधू संत महात्मे यांचे दर्शन घ्यायला पाहिजे. ठरलं!! कुंभ मेळयाला जायचे . आता तीन पर्याय होते , बस ,रेल्वे, आणि विमान . पण बस आणि रेल्वे ने दोन दिवस जायला व दोन दिवस यायला म्हणजे चार दिवस गेले असते. मग मी मित्रांना व आमच्या घरच्यांना विचारले पण काहीतरी अडचणी समोर आल्या आणी त्यांचे रद्द झाले .मग मी ठरविले की विमानाने जायचे व यायचे आणि त्याप्रमाणे मी आखणी केली की पुणे ते काशी व काशी ते प्रयाग राज आणि प्रयाग राज ते पुणे असा मार्ग होता. पण डायरेक्ट फ्लाईट नव्हती. म्हणून कनेक्टिंग फ्लाईट बुक केली. पुणे ते हैद्राबाद व हैद्राबाद ते काशी असा प्रवास झाला. काशी वाराणाशी विमानतळावरून आय आय टी बी एच यू मध्ये आमच्या मित्रांनी गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सोय केली होती. त्याप्रमाणे मी तिथे पोहोचलो अतिशय भव्य द...
Comments
Post a Comment