*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*
 *हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची  विफलता* डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे  ( नोट - कृपया हे माझे वैयक्तिक विचार आहे याचा कुणाशीही संबंध नाही. ) होय,  सरकारची विफलता ही कशी? याचे उत्तर लेख वाचल्यावर मिळेल.  पुण्यातली हुंडाबळी ची बातमी ऐकली आणि व्यतीत झालो. शिक्षित आणि प्रगत असलेल्या समाज्यात असल्या वाईट घटना ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.  मुलं मुली उच्च शिक्षित आहे. दोन्हीही कमावते आहेत आणि मग हा उच्च नीच प्रकार येतो कुठे?    उलट आज परिस्थिती अशी आहे की मुलीला मुलांपेक्षा पगार जास्त असतो.  मग हुंडा आला कसा? मागणाऱ्यालाही आणि देणाऱ्यालाही लाज वाटली पाहिजे. की आपण काय करतो आहे ?  पूर्वीच्या काळी अश्या बऱ्याच घटना घडल्या होत्या. कारण मुलगी शिक्षित किंवा कमवती नव्हती.  मुलिंजवळ दोनच पर्याय होते ते म्हणजे सासर आणि माहेर.  त्यामुळे सासरची मंडळी  छळ करीत होते. मुलीच्या वडिलांनी मुलगीपण द्यायची , वरून हुंडापण द्यायचा अशी मूर्खपणाची चालीरीती परंपरा सुरू होती. त्यामुळे मुलीला वाटायचे एकदा लग्न झाले की माहेर संपले . आणि आई वडील ...