" देवशयनी , आषाढी एकादशी" लेखक :   डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे  हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात – शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील. त्यातील सर्वात महत्त्वाची एकादशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशी, जिला देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी किंवा हरि शयनी एकादशी असे म्हटले जाते. हिंदू धर्मात मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपतात आणि चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या कालावधीत चातुर्मास सुरू होतो, ज्यामध्ये धार्मिक व्रते, जप-तप, संयमाचे पालन केले जाते. या चार महिन्यांत शुभकार्य टाळली जातात, कारण विष्णू निद्राधीन असतात. असे म्हणतात की भगवान रुद्र कारभार सांभाळतात . आणि यामुळेच अतिशय शिस्तीत जीवन जगत राहणे हाच एक पर्याय असतो . या काळात नैसर्गिक संकटे , पुर , आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात कारण सगळी कडे पाऊस पडत असतो आणि वातावरण दमट असते . सूर्यनारायणाचा  दर्शन फार कमी वेळा होते. आणि त्यामुळे वातावरणात सूक्ष्म जीव, किटाणू ,विषाणू असतात . त्यामुळे उपवास सांगितला आहे. तसेच अन्न ,पाणी ,वस्त्र, निवारा याबद्दल विशेष लक्ष देऊन अ...
Posts
Showing posts from July, 2025