अंधश्रद्धेचा बळी (एक सत्य कथा)
*सत्य कथा* अंधश्रद्धेचा बळी (एक सत्यघटनेवर आधारित) लेखक डॉ. जि.आ.होले. पुणे @ All right reserved एक छोटेसे टुमदार गाव होते त्या गावात रामजी नावाचा एक गृहस्थ आपल्या पत्नी मालतीसोबत राहत होता. शेती व पूरक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.बरेच वर्ष लग्नाला होवून सुद्धा त्याला मुलबाळ झालं नाही मग त्यांनी देवाला नवस ,पूजा, साकळ टाकून व मोठ्या डॉक्टरांकडे जाऊन प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. पण भगवंताची लीला व कर्मधर्मसंयोगाने दहा वर्षांनी त्यांना मुलगा झाला . दोघा पतिपत्नीला अतिशय आनंद झाला त्याचे नाव आनंद ठेवले .आनंद अतिशय सुखात आनंदात मोठा होऊ लागला शिक्षणातपण तो हुशार होता , उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन वडिलांच्या सल्ल्यानुसार त्याने आपला शेती उद्योग सांभाळायला सुरवात केली . आनंदात दिवस जात होते आणि आई वडिलांना चिंता पडली कि आपला आनंद मोठा झाला त्याचे लग्न करावं लागेल मग त्यांनी शेजारच्या गावातील मित्र वसंत पाटील यांची कन्या रेवतीशी त्याचा विवाह अतिशय थाटामाटात लावून दिला. आनंद आणि रेवती अतिशय आनंदात होते . दिवसाम...