अंधश्रद्धेचा बळी (एक सत्य कथा)
*सत्य कथा*
अंधश्रद्धेचा बळी
(एक सत्यघटनेवर आधारित)
लेखक
डॉ. जि.आ.होले. पुणे
@ All right reserved
एक छोटेसे टुमदार गाव होते त्या गावात रामजी नावाचा एक गृहस्थ आपल्या पत्नी मालतीसोबत राहत होता. शेती व पूरक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.बरेच वर्ष लग्नाला होवून सुद्धा त्याला मुलबाळ झालं नाही मग त्यांनी देवाला नवस ,पूजा, साकळ टाकून व मोठ्या डॉक्टरांकडे जाऊन प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. पण भगवंताची लीला व कर्मधर्मसंयोगाने दहा वर्षांनी त्यांना मुलगा झाला . दोघा पतिपत्नीला अतिशय आनंद झाला त्याचे नाव आनंद ठेवले .आनंद अतिशय सुखात आनंदात मोठा होऊ लागला शिक्षणातपण तो हुशार होता , उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन वडिलांच्या सल्ल्यानुसार त्याने आपला शेती उद्योग सांभाळायला सुरवात केली . आनंदात दिवस जात होते आणि आई वडिलांना चिंता पडली कि आपला आनंद मोठा झाला त्याचे लग्न करावं लागेल मग त्यांनी शेजारच्या गावातील मित्र वसंत पाटील यांची कन्या रेवतीशी त्याचा विवाह अतिशय थाटामाटात लावून दिला. आनंद आणि रेवती अतिशय आनंदात होते . दिवसामागून दिवस जात होते संसार गाड चालू होते. पण लग्नाला सात वर्ष होऊनसुद्धा घरात पाळणा काही हालत नव्हता. घरात चिमुकल्यांची किलबिल काही गुंजत नव्हती त्यामुळे दोन्ही अतिशय दुःखी कष्टी होते.आनंदचे आई वडील तर नेहमी याच चिंतेत राहायचे की आपल्याला वंशाचा दिवा कधी येणार . ते नेहमी पूजाअर्चा, दानधर्म, तीर्थक्षेत्र, बुवा, ब्राम्हण ,भगत ,भोपे, देवी सगळ्या प्रकारचे उपाय करून बघितले पण काही उपयोग झाला नाही. घरामध्ये अतिशय दुःखाचं वातावरण होते. आनंदाची आई तर नेहमी सुनेला रेवतीला टोमणे ,चिडून त्रासून काहीबाही बोलायची , रेवती बिचारी सर्व निमूटपणे सहन करायची.एक दिवस आनंदच्या आईने घरातील सर्वांना बोलावले व सांगितले की आनंदच्या दुसरा विवाह गावातील हरी पाटीलच्या दुसऱ्या मुलीशी म्हणजे रेणुकाशी पक्का केला आहे. मग तिने सगळ्यांशी मन वळवून आनंदचा दुसरा विवाह संपन्न केला. आता आनंदाचा दोन बायकांसह संसार सुरू झाला. काही काळ लोटला , रेणुकेला पण काही मुलबाळ होत नव्हते. पण देवाची कृपया रेणुका गर्भवती राहिली.आणि दुधात साखर पदवी तशी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आनंदची पहिली पत्नी रेवतीसुद्धा गर्भवती राहिली.
झालं घरात आनंदी आनंद झाला. मोठ्या होशिने दोन्हीं सूनांचे लाड ,डोहाळे पुरवले गेले .पण दोन्ही सूनाना मुलीच झाल्या. सासू सासऱ्याना दुःख झाले त्यांना वंशाचा दिवा हवा होता म्हणून ते नाराज होते. दिवस ,काळ जात होता. कालांतराने दोन्ही सूना गर्भवती राहिल्या पुन्हा घरात आनंदी आनंद झाला. परंतु सासू बाई कुठल्याही प्रकारची रिस्क, धोका घ्यायला तयार नव्हत्या म्हणून त्यांनी वंशाचा दिवा होण्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न केले मग तिला कुणीतरी सांगितले की मठात जा तिथे ते बाबा साधू , मठाधिपती आहेत ते तुला मार्ग सांगतील मग ते सर्व मठात गेले आणि
बाबांना दोन्हीं सुनांना दाखविले गेले , बाबांनी पण मुलगा होण्यासाठी काही तोडगे दिले .सासूचा आनंद गगनात मावत नव्हता म्हणून तिने आनंदच्या भरात मठाधिपतीला वचन दिलं की दोघा मध्ये जर एक मुलगी झाली तर मी तुम्हाला सेवेकरिता मठात दान करीन .ते ऐकून आनंद, रेवती, रेणुका अतिशय चिंतेत पडले पण ईश्वराची ईच्छा अशी मनाची समज करून घरी आले.कालांतराने रेणुकेला मुलगी व रेवातीला मुलगा झाला . मुलाचे नाव सफल व मुलीचे नाव सीता ठेवले .घरामध्ये अतिशय प्रसन्नते चे आनंदचे वातावरण झाले.घरात लहान मुलांचा किलबिलाट सुरू झाला . लहान मुलांचं मस्ती भांडण खेळ शिक्षण सुरू झाले . मुलं सुद्धा अतिशय सुंदर हुशार आज्ञाधारक होते. घरातील सर्व मंडळी खुशीत होती. पण सर्वांना चिंता एकच की सासूबाईंनी केलेला नवस सीतेला मठात देण्यात येईल. सीतेच्या आई वडिलांना रात्रंदिवस तीच चिंता वाटत होती पण काय करणार? इकडे छोटी सितापण खूप हुशार आणि सुंदर होती तिच्या बाल क्रीडा बघून अतिशय आनंद होत होता.सीता आपल्या भावंडांसोबत, आपल्या शेजारच्या मित्र मैत्रिणीसोबत खूप खेळ खेळायची खूप खूप मजा करायची. दुकानातून गोळ्या बिस्कीट आणून भावंडां सोबत खायची. खूप खूप हिंडायची, मस्ती करायची, मजेत आनंदात दिवस जात होते. पण सीतेला एक गोष्ट खपायची की काही शेजारच्या बायका तिला म्हणायच्या की बाई खेळून घे, मजा करून घे, खूप खाऊन घे मग तुला का पुढे खेळता येईल? तुला आयुष्यभर सेवाच करायची आहे . अशा प्रकारच्या गोष्टी बायका करायच्या पण तिच्या काही ते लक्ष्यात येत नसायच किवा लहान असल्यामुळे तिला समजत नव्हतं . पण जशी जशी ती मोठी होऊ लागली तिला कळायला लागलं आणि तिला शेजारी पाजारी नातेवाईक, मित्र मैत्रिणीचे टोमणे बोलणे लक्षात यायला लागले. आणि ती प्रचंड दुःखी कष्टी व्हायला लागली. ती तिच्या आई जवळ जाऊन अतिशय कळकळीने दीनवाणी विनंती करायची की आपलं घर , गाव सोडून ती कुठेच जाणार नाही. आपल्याच घरी राहायचं खूप शिक्षण करायचं आहे. मोठं व्हायचं आहे. पण तिच्या भावनेला काहीच किंमत नव्हती.आई वडील आबा आजी काहीच बोलत नसत. कुणालाही काहीच वाटत नव्हते ती बिचारी अतिशय दुःखात दिवसभर विचार करत बसायची की माझा काय गुन्हा आहे? मी असे काय कुणाचे वाईट केले? की मी कुणाला काय दुखविले ? की माझ्याशी असे का वागतात काहीच कळत नव्हते. दिवस दिवस भर रडायची परंतु कुणालाच दया येत नव्हती . शेवटी लहान बाळच ती! मुलं बाहेर खेळायला आले की ती सर्व विसरून खेळायला निघून जायची. आता तर ती घरात आईला कामात सुद्धा मदत करायला लागली होती.
कधी कधी विचार करताना ती रात्रीच्या अंधारात ओक्सा बोक्सी रात्रभर रडत असे पण दुभाग्य एकही सतीचा लाल तिचे दुःख दूर करू शकत नव्हता. बिचारी असहाय काय करणार? परमेश्वराची प्रार्थना विनवणी करायची. ईश्वरा जवळ दया क्षमा याचना वारंवार करायची पण परमेश्वरालाही तिची दया येत नव्हती.
शेवटी तो दिवस उगवला . रात्रीपासूनच घरामध्ये नातेवाईक आले होते .प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता शेजारची मंगला काकू, विमल बहीण , वत्सला काकू अश्या अनेक बायका सितेशी गोड गोड बोलत होत्या तिची अतिशय प्रेमाने विचारपूस करीत होत्या तिच्या खाण्याच्या आवडी निवडी बद्दल विचारीत होत्या . पण सीतेच्या मनात शंका आली की तिचीच चौकशी का करताय ? .तिने संपूर्ण रात्र विचारात घालवली . सकाळ झाली घरातली सगळी मंडळी लवकर उठून तयार झाली . आजी आजोबा आई वडील यांनी नवीन कपडे घातले होते . सीतेला सुद्धा नवीन कपडे घातले . तिची तयारी करण्यासाठी शेजारच्या बायका काकू आणि बहिणी होत्या.अतिशय सुंदर फुलांनी तिला सजवल गेले. घरासमोर मांडव टाकला गेला. वाजंत्री वाले घरासमोर वाजवायला लागले . आणि मग मठातील मठाधिपती मोठ्या थाटामाटात आपल्या पाच अनुयायी सोबत आले त्यांचे अतिशय भव्य दिव्य स्वागत केले गेले. त्याच्यासाठी आसन तयार केले होते त्या आसनावर ते बसले आणि सीतेला त्यांच्या समोर आणण्यात आले सीतेला आतापर्यंतच्या सर्व हालचाली बघून लक्षात आले की आज तिला मठाला देणार. ...
प्रचंड वेदनांनी तिचे काळीज कळवळल . ती जोरानी रडू लागले. पण तिच्या रडण्याकडे कुणाचेच लक्ष नाही तिला जबरदस्तीने आसनावर बसवलं गेले मठाधिपती ने तिच्या आई वडिलांना सुद्धा समोर बसविले व महाराज काहीतरी मंत्र बोलू लागला. बाहेर जोरजोराने वाजा वाजत होता. थोड्यावेळाने महाराजांनी तिच्या आई वडील दोघांच्या हातात पाणी देउन तिला मठाला अर्पण करतो असे वाक्य बोलायला लावले.
सीतेच्या मनाचा कोणीही विचार करीत नव्हता ती भांबावली गेली होती आणि प्रचंड दुःखाने ती तिच्या आजी आजोबा कडे गेली पण त्यांनी बघतले सुद्धा नाही . ती आई वडील दोघांच्या पायावर पडली व पाय पकडून विनंती करू लागली की मला सोडु नका मला मोठं व्हायचं . स्वप्नांच्या दुनियेत जगत नाव सफल व्हायचं पण दुर्भाग्य !!! आता सीता आईला काकुळतीने म्हणू लागले:
जीवन दे ग माय मला जीवन दे ग माय !
दया माझी तुला का नाही येत ग माय!
खेळ खेळायच नाचायचं ग माय!
आनंदी आनंद वाटून हसायचं ग माय !
काम करून नाव तुझे मोठे करीन ग माय!
इवलस माझ पोटग तुझ नाय कमी होणार माय !
बाशी कुशी भाकरी खाऊन पोट भरीन ग माय!
घरामधी करून काम तुला सुख देईल ग माय!
कोपऱ्या मध्ये झावर टाकून निजेल ग माय!
शेतीमधल काम करून मी पोट भरिन ग माय!
शाळे मधी जाऊन तुझे नाव काढीन ग माय!
शिकून मोठी शाळे मंधी शिकवीन ग माय!
अपराध माझा काय झाले ते सांग ग माय!
तिथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तींकडे मोठ्या आशेने ती गेली व दीनवाणी होऊन विनंती करू लागली की मला वाचवा, मला नाही जायचं, मला सोडवा , पण कोणालाच दया आली नाही. नंतर तिला वाजत गाजत बाहेर आणले आणि शेवटचा प्रयत्न म्हणून सीतेने गावातील जमलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीचे पाय पकडले पण त्यांनी सुद्धा तिला धुडकारले व त्यांनी सांगितले की तुला देवाला अर्पण केलेले आहे आम्ही जर या भांडणात पडलो तर देव कोपिल व सर्व गावावर संकट येईल म्हणून तुला तिथे जावेच लागेल. तिची शेवटची आशा पण मावळली. ती काहीही करू शकत नव्हतं . शेवटी तिला मठाधिपतीच्या गाडीत कोंबाण्यात आले. आणि तिच्या एकाकी रुक्ष दुसऱ्या जीवन प्रवासाला सुरवात झाली.
Comments
Post a Comment