प्रत्येक राजकारणी व्यक्ती व निवडणूक उमेदवार यांच्या विजयाचं रहस्य *मानसिक बदल हेच राजकारणातील रहस्य*

 *मानसिक बदल हेच राजकारणातील रहस्य*


लेखक: प्रा.डॉ. जितेंद्र आत्माराम होले

( नोट: ह्या लेखातील विचार हे लेखाचे वैयक्तिक विचार आहेत. लेखक हे शिक्षक आहेत राजकारणी नाहीत . या लेखाला मनोरंजन म्हणून वाचावे याचा विपर्यास करू नये ही नम्र विनंती)


पुण्यातील विविध रंगी वातावरणात अनेक प्रकारचे लोक आयुष्यात आले.राजकीय, समाजसेवक देश सेवक ,गोसेवक, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, शेतकरी, नोकरपेशी. ई. पण प्रत्येकाच्या विचारधारा वेगवेगळ्या . राजकारणी सोडला तर प्रत्येकाची technique ही पेश्याला मिळतीजुळती म्हणजे आपल्या कर्तव्याला मिळतीजुळती. पण राजकारणी लोकांचं मात्र वेगळचं. त्यांच्या जवळ poly म्हणजे many टिक्स म्हणजे techniques  आहे. विविध/ अनेक प्रकारच्या  techniques वापरून सत्ता उपभोगत रहायचं. किंवा विरोधी राहून सत्तासंघर्ष करून काम करीत रहायचं. विविध प्रकारच्या लोकांशी संवाद, संपर्क साधून त्यांच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने कार्य करणे. लोकांच्या सुख दुःखात त्यांना मदत करणे . वैयक्तिक, सामाजिक, स्तरावर मदत करणे . लोकांचा आर्थिक, शैक्षणिक ,मानसिक, शारीरिक, आणि सर्वांगीण विकास/ प्रगती करीत आपला हेतू साध्य करणे, यामधील सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या मानसिकतेवर राज्य करणे . मानसिकतेत बदल घडवून आणणे. हाच मानसिक बदल हा निवडणुकीत अत्यंत उपयोगी असते. आता विचार करा हा बदल कसा घडवता येतो.

पण माझ्या मित्रांनो राजकारणी लोक हा बदल साम दाम दंड भेद,स्त्री या माध्यमातून घडवून आणतात.

सुरवातीला वैयक्तिक मानसिक बदल व नंतर ग्रुप चा मानसिक बदल नंतर एरिया चा मानसिक बदल व शेवटी आपल्या मतदार संघातील लोकांचा मानसिक बदल घडविण्यात येत असते. आणि ज्याला है शक्य होते त्याचा विजय हा नक्कीच होत असतो.

आता आपण वैयक्तिक मानसिक बदल काय असतो त्याचा विचार करू. वैयक्तिक माणसाला सुख दुःखात मदत करणे मग ही मदत तो वर सांगितलेल्या साम दाम दंड भेद स्त्री याचा वापर करून त्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणू शकतो.

आता असं ग्रुप मानसिक बदल बद्द्दल विचार करू. हा मानसिक बदल हा सं दाम आणि भेद या माध्यमातून करीत असतो म्हणजे त्या ग्रुप ला पार्टी , खेळच साहित्य ,ग्रुप यात्रा ई.

यानंतर एरिया मानसिक बदल हा दाम व भेद च्या माध्यमातून होत असतो. उदा. एरिया मध्ये सवलत ,लोकांनां उपयोगी असे वास्तू , विविध प्रकारचे प्रोग्राम , समजमंदीरे , जातीनिहाय मदत व मार्गदर्शन , वयानुसार आकर्षक भेटवस्तू , स्री पुरुष निहाय एकत्रित मदत अश्या प्रकारच्या पद्धतीने मानसिक बदल घडविण्यात येत असतो.

आता मतदार संघातील लोकांचा मानसिक बदल बद्दल विचार करू.

हा बदल सर्वात महत्त्वाचा  असतो.यामध्ये वरील प्रकारची सर्व नीती वापरून विरोधी पक्षाच्या लोकांची मानसिकता बदलण्या चा प्रयत्न असतो .एवढेच नाही तर लोकांमध्ये positive व निगेटिव्ह मानसिक बदल घडविण्यात येत असते. यात वाचकांना लक्षात येईल की positive मानसिक बदल हा कोणामध्ये व निगेटिव्ह मानसिक बदल कोणामध्ये .

मतदार संघामध्ये ,शैक्षणिक संकुल, व्यवसाय सुविधा, मार्केट, दळण वळण साधने व सुविधा, दवाखाने ,/ हॉस्पिटल, व्यायामशाळा, योग ध्यान धारणा केंद्र, आध्यातिम केंद्र, विकास आराखडा , सहकारी/ खाजगी/ सरकारी/ कारखाने , शेती विषयक संशोधन व मदत केंद्र. व सर्वात महत्वाचे म्हणजे जमीन, पाणी ,हवा, वातावरण यांना पोषक असे वातावरण तयार करणे . व याचा वापर हा निवडणूक प्रचारासाठी करणे . 

अश्या प्रकारच्या कार्याचा अवलंब करून लोकांचा मानसिक बदल घडविण्यात यश मिळत असते. बरेच लोक ज्योतिष शास्त्राचा आधार घेत असतात पण याला शास्त्रीय आधार नाही. 

याचा सारांश म्हणजे मानसिक बदल हेच विजयचे रहस्य आहे.

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*