*संशोधनं केंद्र व संशोधक विद्यार्थी यांच्यासाठी  अनमोल ,अमूल्य माहिती* ( लेखक  डॉ जितेंद्र आत्माराम होले, अधिष्ठाता ,संशोधन विभाग, जे एस पी एम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे )  दुपारची वेळ होती संशोधन केंद्राचे संशोधक सहा महिन्याच्या प्रगती सादर करण्यासाठी जमा झालेली होती . प्रगती सादर केल्यानंतर बराच मोकळा वेळ होता. मग चर्चा ,गप्पा गोष्टी सुरू झाल्या. मुलांना संशोधन पत्र लिहिण्याविषयी व पब्लिष्ड करण्याविषयी बऱ्याच शंका ,प्रश्न होते. त्यामध्ये खूप महत्वपूर्ण माहिती संकलित झाली.  त्यामध्ये प्रामुख्याने काही महत्वाचे मुद्दे असतात ते पुढील प्रमाणे  *मुख्य इंडेक्सिंग डाटाबेस*   १) Scopus : Scopus source list  २) Web of science- Master  Journal list  ३) Google scholar  ४) IEEE Xplore ,ACM digital Library  आता याच्यामध्ये  पेपर है क्वालिटी जर्नल व conference मध्ये published झाले  हे कसे कळणार तर त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे  सर्व प्रथम - Impact Factor (IF) –  Journal Citation Reports (JCR) वरून जर्न...
Posts
Showing posts from February, 2025
माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*
- Get link
- X
- Other Apps
 *माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव* लेखक - डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे (PhD)  संध्याकाळची वेळ होती कुंभमेळ्याच्या बातम्या बघत होतो. आणि मनात एक विचार आला की आपण महाकुंभ प्रयाग राज येथे जायला पाहिजे आणि माझी  कित्येक वर्षाची इच्छा पण होती की कुंभमेळा बघायला पाहिजे. तिथे साधू संत महात्मे यांचे दर्शन घ्यायला पाहिजे. ठरलं!!  कुंभ मेळयाला जायचे . आता तीन पर्याय होते , बस ,रेल्वे, आणि विमान . पण बस आणि रेल्वे ने दोन दिवस जायला व दोन दिवस यायला म्हणजे चार दिवस गेले असते. मग मी मित्रांना व  आमच्या घरच्यांना विचारले पण काहीतरी अडचणी  समोर आल्या आणी त्यांचे रद्द झाले .मग मी ठरविले की विमानाने जायचे व यायचे आणि त्याप्रमाणे मी आखणी केली की पुणे ते काशी व काशी ते प्रयाग राज आणि प्रयाग राज ते पुणे असा मार्ग होता. पण डायरेक्ट फ्लाईट नव्हती. म्हणून कनेक्टिंग फ्लाईट बुक केली. पुणे ते हैद्राबाद व हैद्राबाद ते काशी असा प्रवास झाला. काशी वाराणाशी विमानतळावरून  आय आय  टी बी एच यू मध्ये आमच्या मित्रांनी गेस्ट हाऊस मध्ये  राहण्याची सोय केली होती. त्याप्रमाणे मी तिथे पोहोचलो अतिशय भव्य द...