*संशोधनं केंद्र व संशोधक विद्यार्थी यांच्यासाठी  अनमोल ,अमूल्य माहिती*


( लेखक 

डॉ जितेंद्र आत्माराम होले,

अधिष्ठाता ,संशोधन विभाग,

जे एस पी एम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे ) 


दुपारची वेळ होती संशोधन केंद्राचे संशोधक सहा महिन्याच्या प्रगती सादर करण्यासाठी जमा झालेली होती . प्रगती सादर केल्यानंतर बराच मोकळा वेळ होता. मग चर्चा ,गप्पा गोष्टी सुरू झाल्या. मुलांना संशोधन पत्र लिहिण्याविषयी व पब्लिष्ड करण्याविषयी बऱ्याच शंका ,प्रश्न होते. त्यामध्ये खूप महत्वपूर्ण माहिती संकलित झाली.  त्यामध्ये प्रामुख्याने काही महत्वाचे मुद्दे असतात ते पुढील प्रमाणे 


*मुख्य इंडेक्सिंग डाटाबेस*  

१) Scopus : Scopus source list 

२) Web of science- Master  Journal list 

३) Google scholar 

४) IEEE Xplore ,ACM digital Library 


आता याच्यामध्ये  पेपर है क्वालिटी जर्नल व conference मध्ये published झाले  हे कसे कळणार तर त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे 


सर्व प्रथम - Impact Factor (IF) –  Journal Citation Reports (JCR) वरून जर्नल चा high impact factor बघावा 


रिसर्च  पेपर चा निर्देशांक (Impact Factor) 1.0 पेक्षा जास्त असल्यास ती चांगली मानली जाते.


आता संशोधक मित्रानो , 

*संशोधन पेपरचा क्वारटाईल (Quartile) कसा तपासायचा?*


संशोधन पत्रिका (Journal) किती प्रतिष्ठित आहे हे तपासण्यासाठी **Scopus आणि Web of Science** सारख्या डेटाबेसमध्ये त्याचा  क्वारटाईल (Q1, Q2, Q3, Q4) तपासला जातो.


 उच्च दर्जाच्या संशोधनासाठी  Q1 आणि Q2  पत्रिका सर्वोत्तम मानल्या जातात.  


Scopus Quartile (Q1, Q2, Q3, Q4) कसा तपासायचा?


पद्धत 1: SCImago Journal Rank (SJR) द्वारे 

1. [SCImago Journal Rank (SJR)](https://www.scimagojr.com/) वेबसाइटला भेट द्या.  

2. Journal Rankings  पर्यायावर क्लिक करा.  

3. शोध बारमध्ये  पत्रिकेचे नाव टाका 

4. रिसर्च पेपर च्या  Q1, Q2, Q3, Q4 रँकिंग तपासावे.  


*Q1 (सर्वोत्तम गुणवत्ता)* – उच्च प्रभाव असलेली आंतरराष्ट्रीय पत्रिका.  

*Q2 (मध्यम-उच्च गुणवत्ता)* – चांगली पत्रिका, पण Q1 पेक्षा थोडी कमी.  

*Q3 (मध्यम गुणवत्ता)* – सरासरी संशोधन पत्रिका.  

*Q4 (कमी गुणवत्ता)* – सर्वात कमी प्रभाव असलेली पत्रिका.  

 

आता  Web of Science (WoS) Quartile कसा तपासायचा? 

*पद्धत 2: Journal Citation Reports (JCR) द्वारे* 

1. [Clarivate Journal Citation Reports (JCR)](https://jcr.clarivate.com/) ला भेट द्या.  

2. पत्रिकेचे नाव शोधा.  

3. Journal Impact Factor (JIF) आणि Quartile (Q1-Q4) तपासावे.

एक महत्वाची बाब म्हणजे *खोट्या किंवा Predatory Journals पासून सावध राहा*  Beall’s List ([https://beallslist.net/](https://beallslist.net/)) तपासा.  


 Scopus मध्ये रिसर्च पेपर समाविष्ट आहे का ते कसे तपासायचे?

1. [Scopus Source List](https://www.scopus.com/sources.uri) ला भेट द्या.  

2. पत्रिकेचे नाव टाका आणि शोधा  

3. जर पत्रिका सूचीबद्ध असेल, तर ती  Scopus-Indexed  आहे.


शेवटी महत्वाचे म्हणजे Scopus च्या website  वरून हा पेपर Scopus list मध्ये आहे हे समजते व 

Web of Science च्या website वरून पेपर हा Science Citation Index Expanded (SCIE) , Social Science Citation Index (SSCI) , Arts and Humanities citation index(AHCI), Emerging source Citation Index ( ESCI) 

मध्ये आहे काय हे कळते.

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*