Posts

Showing posts from October, 2022
 सावधान 🔥 पंचमहाभूत शास्त्र अभ्यासक्रमात समाविष्ट व्हायलाच पाहिजे🔥 🌴🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 "वसुधैव कुटुंबकम्" म्हणजे संपूर्ण पृथ्वी आपले कुटुंब आहे तर कुटुंबाची काळजी करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.  *Panchamahabhuta science needs time*  Dr. Jitendra Atmaram Hole Pune @All right reserved Don't copy and published without permission. Respected gentleman,  If we want to protect ourselves from future epidemics and other diseases, it is very important to get to the root of them. This means that everything in this world is made up of particles / molecules. If each of them has a different structure, then there is a great need to study those fine particles. There are five elements in the Panchmahabhutas, namely, water element, sky element, earth element, fire element, air element. If we study them very subtly and scientifically, we can be protected from many future ones.  The climate is changing. Sometimes high temperature, sometimes low temperature, every object has a ki...

दिवाळी आणि नरकासुर वध

*दिवाळी व नरकासुर वध* *@जितेंद्र आत्माराम होले पुणे* आज दि. २४/१/२०२२ दिवाळीच्या दिवशी सकाळी आमच्या बिल्डिंग मधील मुले खेळत होती . मी त्यांना सहज विचारलं आज काय आहे? त्यांचं उत्तर लगेच आले की दिवाळी आहे. मी त्यांना परत प्रश्न केला की दिवाळी का साजरी करतात ? तर त्यांच्यापैकी कोणीही बोलला नाही कारण त्यांना काही माहितीच नव्हते. मी त्यांना परत परत विचारू लागलो पण आता ते कंटाळले आणि त्यांनीच मला स्पष्ट सांगितले की तुम्हीच आम्हाला सांगा . तोच त्या मुलांपैकी एक मुलगा म्हणाला याचा संबंध रामायणाशी आहे. लगेच दुसरा म्हटला अरे महाभारताशी संबंध आहे. पण कोणालाच काही माहिती नव्हते . तिथेच अजून आमच्या बिल्डिंग मधील सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले दोन मान्यवर आले. पण त्यांना सुद्धा माहिती नाही. मग मुलांच्या विनंतीस मान राखून त्यांना मी सांगू लागलो. दिवाळीचा संबंध हा रामायण महाभारत या दोघांशी आहे. रामायण मध्ये रावणाला मारून राम ,सीता, लक्ष्मण आणि सर्व मान्यवर ज्या दिवशी अयोध्येत आले त्या दिवशी दिवाळी साजरी केली . दिपोस्तव आनंदोत्सव साजरा करण्यात आला घरे ,आंगण सजविण्यात आले. नवीन वस्त्र घालू...

लहानपणीची दिवाळी

लहानपणीची दिवाळी डॉ जितेंद्र आत्माराम होले, पुणे आमचं गाव जळगाव जिल्यातील रोझोदा , छोटंसं टुमदार निसर्गानं संपूर्ण वैभव भरभरून दिलेलं. वातावरण अतिशय सुंदर,प्रसन्न, आल्हाददायक, वातावरणात गारवा ,मंद, मंद हवा, पंचमहाभूतांचे संपूर्ण कृपा गावावर त्यातच परीक्षा संपलेल्या आणि दिवाळीचं सुटी लागलेले त्यामुळे आम्ही अतिशय आनंदी . आमच्या घरातील वातावरण अतिशय प्रसन्न आल्हाददायक. वडील शिक्षक असल्यामुळे नेहमीच कामात व्यस्त असतं. आई, तिच्या मैत्रिणी आणि शेजारच्या काही बायकांची दिवाळी फराळ , कपडे, शोभेच्या वस्तु, कंदील, दिवे, घर सफाई करता लागणाऱ्या वस्तू व इत्यादी. अश्या अनेक कामाची यादी व नियामन करण्यात मग्न . ह्या महिला मंडळाची मीटिंग असायची. नंतर मग सर्व महिला ह्या एकत्रितपणे बाजारात जायच्या कमीत कमी एक वस्तूसाठी तीन ते चार दुकान बघून जिथे स्वस्त मिळेल तिथे दुकानदारावर दबाव टाकायचं व शेवटी दुकानदार कंटाळून वस्तूचा भाव महत कमी करायचा. आणि मग महिलावर्ग च्या चेहऱ्यावर युद्ध जिंकल्याचा भाव असायचा अश्या रीतीने सगळी खरेदी केल्यानंतर घरी आनंदाने, प्रसन्नतेने जायच्या. नंतर मग सगळ्या महिला एकत्रित येऊ...
 *महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 लागू करण्याच्या धोरणांची रूपरेषा* @डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रथम, धोरणाचा आत्मा आणि हेतू यांची अंमलबजावणी ही सर्वात गंभीर बाब असेल.  दुसरे, धोरणात्मक उपक्रम टप्प्याटप्प्याने अंमलात आणणे महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक पॉलिसी पॉइंटमध्ये अनेक पायऱ्या असतात, ज्यापैकी प्रत्येकाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी मागील पायरी आवश्यक असते. तिसरे, धोरणात्मक मुद्द्यांचा इष्टतम क्रम सुनिश्चित करण्यासाठी प्राधान्यक्रम महत्त्वाचे असेल आणि सर्वात गंभीर आणि तातडीच्या कृती प्रथम हाती घेतल्या जातील, ज्यामुळे एक मजबूत आधार सक्षम होईल. चौथे, अंमलबजावणीतील सर्वसमावेशकता महत्त्वाची असेल; हे धोरण एकमेकांशी जोडलेले आणि सर्वसमावेशक असल्याने, केवळ पूर्ण अंमलबजावणी, आणि तुकड्या तुकड्यांमध्ये नाही, हे सुनिश्चित करेल की इच्छित उद्दिष्टे साध्य होतील.  पाचवे, शिक्षण हा समवर्ती विषय असल्याने, त्यासाठी काळजीपूर्वक नियोजन, संयुक्त देखरेख आणि केंद्र आणि राज्ये यांच्यात सहकार्यात्मक अंमलबजावणी आवश्यक आह...

*शोध धोम्य ऋषी आश्रमाचा*

 *शोध धोम्य ऋषी आश्रमाचा* @डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे 9860659246 @copyright कृपया हे माझे वैयक्तिक विचार आहे याचा संबंध कुठल्याही अन्य धार्मिक बाबिशी लावू नये.  आज दि. 15ऑक्टंबर 2022 या दिवशी आम्ही थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर ता. सातारा येथे गेलो होतो. सुंदर अश्या वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून प्रसन्न मनाने आम्ही वाईच्या दिशेने निघालो.  मी पूर्वी ऐकलेले होते की सातारा जिल्ह्यात धोम्या ऋषीचा आश्रम आहे. पण मला कोणीच जास्त रिस्पॉन्स दिला नाही. पण काही वर्षापासून मी बऱ्याच लोकांस विचारले पण त्यांनी सांगितले की आम्हाला एवढं माहिती आहे तिथे शंकराच आणि नृसिंहच मंदिर आहे. पण जास्त माहिती मिळतच नव्हती. पण आता मी ठरवूनच टाकलं की आज कितीही अडचणी आल्या तर आपण मंदिर शोधून काढू.  माझ्या  पत्नीनीही संमती दर्शवली. त्यामुळे मला आणखी स्फुरण चढले.आणि मी गाडी वाई शहरामध्ये घातली तिथे एका गोशाळा कृष्ण मंदिरात मी विचारायला गेलो . नशिबाने तिथे धार्मिक लोक भेटले त्यांना मी माहिती विचारली तर त्यांना त्या धोम गावाबद्दल माहिती होती पण मंदिर माहीत नव्हते। मी ठरवून टाकले की ...

National Education Policy Explanation

 नवीन शिक्षा निती ( Holistic and Multidisciplinary Education) स्पष्टीकरण -  By Dr. Jitendra A Hole ९८६०६५९२४६ नवीन शिक्षा निती मध्ये पदवी शिक्षण घेतांना शिक्षण हे एकत्रित करून Humanities and arts सोबत Science, Technology, Engineering and Mathematics (STEM) हे syllabus मध्ये घेऊन त्यात विद्यार्थ्यांसाठी परिणाम(Learning outcome ) हे पुढीलप्रमाणे असायला हवे: 1) LO1 - Creativity and Innovation 2)LO2 Critical thinking 3)LO3 Higher order thinking capabilities 4) LO4 Problem solving abilities 5)LO5 Teamwork 6) LO6 Communication skills 7) LO7 More in depth learning 8)LO8 Mastery of curricula accross field 9) LO9 Increases in social and moral awareness या सर्वांगिण आणि विविधता पूर्वक शिक्षणाचा उद्देश विद्यार्थी हा पुढील क्षमतेचा व्हायला पाहिजे १) Intellectual 2) Asthenic personal 3) social 4) Physically fit 5) Emotional and moral values या सोबतच त्याला पुढील विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे 1) Arts 2) Humanities 3) Languages 4) Sciences 5) Social Sciences 6) professional  7) Techni...
 *सूर्य ऊर्जा व त्याचा वापर* हिंदू संस्कृतीत सूर्याला देवता मानले आहे त्यामागचे कारण काय? आपल्याला माहिती आहे की सूर्य हा प्रचंड उष्णतेचा तप्त गोळा आहे त्याच्या भोवती सर्व ग्रह व पृथ्वी फिरत आहे. सूर्याची किरणं पृथ्वीवर येऊन जीवन दान देत असतात. आता आपण जी सूर्यकिरण येतात त्यांचा आपल्या पृथ्वीवर ,मानवी जीवनावर ,निसर्गावर काय परिणाम होत असतो त्याचा विचार करू. सूर्य किरण जमिनीवर पडतात जमिनीवर असलेले वनस्पती ,झाड, भाजी पाला , बीज, यांच्याशी प्रत्यक्ष संबंध येऊन ते फलस्वरुप होतात आणि मानव , प्राणी किंवा जीवसृष्टी ते अन्नस्वरुपात ग्रहण करतात.  तसेच सूर्यकिरण शरीरावर पडण्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन ची कमतरता दूर होते. सूर्यकिरण पृथ्वीवरील पाण्यावर पडल्यामुळे व त्यातील उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते आकाशात ढग स्वरूपात तयार होऊन त्यांना थंड हवा लागल्यावर पाऊस स्वरूपात जीवनदान देते.  सूर्यकिरण हे पृथ्वीवरील हवेच्या संपर्कात आल्यामुळे हवेचे प्रेशर, तापमान बदल होत असतो त्यामुळे हवा ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते म्हणजे जीवसृष्टीला आवश्यक असलेली हवा ही सूर्यामुळे बदल हो...
 *हिंदुत्व* @डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे हो मी हिंदूच आहे. माझा जन्म ही हिंदूच्या घरात झाला . आणि मृत्यू ही हिंदूच्या घरात होईल . मला मी हिंदू आहे हे कोणाला सांगायची गरज नाही . किंवा हिंदू आहे हे सिद्ध करण्याची गरज नाही . माझ्या रक्तात हिंदुत्व  आहे. हिंदू संस्कृतीत मी जगतो. जात , धर्म ,वर्ण,भाषा मी मानत नाही. जन्माने कोणी श्रेष्ठ होत नाही तर कर्माने होतो. भागवत गीता ज्ञान जगण्याची कला शिकविते. हिंदु संस्कृतीत जगणे म्हणजे काय, तर, देवाचं अस्तित्व मानणे .  हिंदू धर्मातील वेद, पुराणे, उपनिषद्, गीता, ग्रंथ, इतिहास (रामायण, महाभारत), पूजा, यज्ञ, किंवा हिंदू धर्मातील असलेल्या प्रत्येक देवतेचे अस्तित्व व त्यांचे निसर्गाशी असलेले नात किंवा त्यासंदर्भात असलेले विज्ञान यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे हिंदुत्व होय. मी कोणत्याही राजकीय ,सामजिक, धार्मिक , आध्यात्मिक पक्षाशी संबंधित नाही. पण माझा प्रचंड विश्वास आहे. हिंदू धर्मात असलेले विज्ञान,ज्ञान आणि पंचमहाभूते यांचे विज्ञान आधारित अभ्यास हे माझे कर्तव्य. योग प्राणायाम ,आयुर्वेद, ,वनस्पती , निसर्ग यांचे मानवाचे अस्त...