*शोध धोम्य ऋषी आश्रमाचा*
*शोध धोम्य ऋषी आश्रमाचा*
@डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
9860659246
@copyright कृपया हे माझे वैयक्तिक विचार आहे याचा संबंध कुठल्याही अन्य धार्मिक बाबिशी लावू नये.
आज दि. 15ऑक्टंबर 2022 या दिवशी आम्ही थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर ता. सातारा येथे गेलो होतो. सुंदर अश्या वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून प्रसन्न मनाने आम्ही वाईच्या दिशेने निघालो.
मी पूर्वी ऐकलेले होते की सातारा जिल्ह्यात धोम्या ऋषीचा आश्रम आहे. पण मला कोणीच जास्त रिस्पॉन्स दिला नाही. पण काही वर्षापासून मी बऱ्याच लोकांस विचारले पण त्यांनी सांगितले की आम्हाला एवढं माहिती आहे तिथे शंकराच आणि नृसिंहच मंदिर आहे. पण जास्त माहिती मिळतच नव्हती.
पण आता मी ठरवूनच टाकलं की आज कितीही अडचणी आल्या तर आपण मंदिर शोधून काढू.
माझ्या पत्नीनीही संमती दर्शवली. त्यामुळे मला आणखी स्फुरण चढले.आणि मी गाडी वाई शहरामध्ये घातली तिथे एका गोशाळा कृष्ण मंदिरात मी विचारायला गेलो . नशिबाने तिथे धार्मिक लोक भेटले त्यांना मी माहिती विचारली तर त्यांना त्या धोम गावाबद्दल माहिती होती पण मंदिर माहीत नव्हते। मी ठरवून टाकले की आज आपण तपास करायचाच.
मी परत गाडी पुढे नेली तिथे लोकांना विचारले त्यांनी पण धोम धरण आणि धोम गावाबदल सांगितलं. पण त्यांना पण काहीच माहिती नव्हती.
मग आम्ही ठरवल की आपण धोम गावात जाऊन पहायचं . ते गाव वाई पासून 8 किलोमीटर अंतरावर होते. आम्ही गाडी धोमच्या रस्त्यावर नेली आणि त्या गावाला येऊन पोहचलो तर बाहेरच श्री क्षेत्र धोमचा बोर्ड लावला होता. आम्ही गाडी थांबविली आणि त्या गावातील लोकांना विचारले की धोम्य ऋषीचा आश्रम कुठे आहे तर त्यांनी आम्हाला श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर चा रस्ता दाखविला. आम्ही तिथे बऱ्याच लोकांना विचारले तेव्हा कुठे मंदिराकडे जायला लागलो पण रस्ता अतिशय निमुळता होता , एक गाडी पण मोठ्या प्रयत्नाने जाऊ लागली . मी मनात विचार करत होतो की जर दुसऱ्या बाजूने जर गाडी आली तर बाहेर निघणेच अशक्य. पण मी हिम्मत केली आणि गाडी त्या रस्तावर घातली . मोठ्या प्रयत्नाअंती आम्ही मंदिरात पोहचलो. पोहचल्या वर आम्ही अतिशय आश्चर्य चकित झालो. आणि आपल्या पुरतान सनातन संस्कृतीला बघून थक्क झालो. अतिशय भव्य असे ठिकाण आणि मंदिर . दगडामध्ये भव्य वास्तू अतिशय सुंदर पद्धतीने निर्माण केलेली.
मी मंदिराच्या भव्य मुख्य दरवाज्यातून प्रवेश केला . समोरच मला ब्रम्हकमळ यंत्रावर नंदीश्वर बसलेले दिसले . समोरच मदिरात भव्य शिवलिंग .आणि पाठ वळवली तर लगेच मागे लक्ष्मी नृसिंह श्रीयंत्र वर विराजमान .हा तर अतिशय दुर्मिळ संगम, योग. मी बारकाईने निरीक्षण करू लागले तर ब्रम्हकमळ च्या पुढे आणि मंदिराखाली अक्षर लिहिलेले दिसले .
"धोम्य ऋषी समाधी" .
मी ते वाचून आश्चर्य चकित आणि धन्य झालो. मला अतिशय आनंद होत होता कारण मी पूर्वी महाभारत ग्रंथामध्ये वाचलेली कथा व त्यांच्या पुरावे मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो. आणि मी बारकाईने बघू लागलो तर बरेच मंदिर हे भग्न अवस्थेत होते. आणि शेजारी असलेली कृष्णा नदी हीचा मार्ग पण धरण बांधल्यामुळे बदलला होता. मी तिथल्या स्थानिक लोकांना माहिती विचारली तर त्यांना या स्थानाच महत्व माहिती नव्हते. त्यांना कथा माहिती होती. ती पण अपूर्ण. मग आम्ही अजून काही माहिती मिळते का म्हणून स्थानिक लोकांना माहिती विचारली .आणि त्यांच्याकडून काही माहिती मिळविली.
आतापर्यंत माझ्या सर्व हालचाली खटाटोप पाहून माझ्या मुलींनी मला विचारले की हे सर्व कश्यासाठी आणि त्याची काय कथा आहे ? आणि कोणत्या पौराणिक ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे ? आणि याचा पुरावा काय? की हेच ते ठिकाण?
मग मी शांतपणे माझ्या मुलींना आपल्या ग्रंथाचं महत्व आणि कथा सांगू लागलो :
ही कथा संदर्भ [अ.२ रा]
[श्रीपांडवप्रताप कथासार ], महाभारत ग्रंथ यामधील आहे. तसे बघितले ऋषींचे बरेच शिष्य होते. त्याठिकाणी ते शास्त्रोक्त कृषी व इतर विषयांचे अध्ययन करीत असत . त्यामधील
*श्री धोम्य ऋषी आणि त्यांचे तीन शिष्य यांची कथा पुढीलप्रमाणे*🙏
धौम्य नावाचे एक महान ऋषी होते. वैध, अरुणी वउपमन्यू असे त्यांचे तीन शिष्य होते. ते तीन शिष्य मनोभावे आपल्या गुरुची सेवा करीत असत, एके दिवशी त्यांनी शिष्यांना सांगितले की, "शेतामध्ये जा आणि पाटाचे पाणी शेतीसाठी आणा." त्यांच्या आज्ञेप्रमाणे ते शेतात गेले.
पाटाचे पाणी शेतीसाठी नेऊ लागल्यावर वाटेतच पाप फुटला. पाणी इकडे तिकडे वाहून जाऊ लागले. त्यामुळे पाणी शेतीला मिळेना. पाणी अडविण्याचा खूप प्रयत्न अरुणी या शिष्याने केला, परंतू त्याच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले नाही. पाणी अडवण्यासाठी त्याला जवळपास दगड किंवा माती काहीच मिळाले नाही. अरुणी दुःखीकष्टी झाला. काय करावे हे त्याला समजेना. शेवटी तो स्वतः पाटामध्ये आडवा झोपला व पाणी थांबवले. आपल्या गुरुंची आज्ञा पालन करण्यासाठी थोडासुद्धा हालत नव्हता.
इकडे धौम्य ऋषी अरुणी न आल्यामुळे काळजी करत होते. आपल्या शिष्याचा शोध घेण्यासाठी ते स्वतः शेतात आले. अरुणीचा शोध करु लागले. त्यावेळी अरुणी आडवा पडून पाणी थोपवत आसताना दिसला. त्याची ती गुरुभक्ती पाहून धौम्य ऋषींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, "अरुणी तुझी गुरुभक्ती श्रेष्ठ आहे त्यामुळे तुला उत्तम ऐश्वर्य आणि ज्ञान प्राप्त होईल." अशाप्रकारे गुरूंच्या आज्ञेचे पालन करून अरुणीला अखंड कीर्ती लाभली.
धौम्य ऋषींचा दुसरा शिष्य म्हणजे उपमन्यु. तो धौम्य मुनींच्या गाई लरानात घेऊन जात असे आणि त्यांची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. एके दिवशी धौम्य ऋषींनी त्या शिष्याला विचारले, "तू गायींना घेऊन रानात जातोस, परंतू स्वतःच्या शरीराचे कसे काय पोषण करतोस ?" त्यावेळी उपमन्यु म्हणाला, "मी भिक्षा मागून पोट भरत असतो." त्यावेळी गुरू म्हणाले, "असे अन्न निषिद्ध आहे. मिळालेल्या अन्नातील पहिला भाग गुरूंना अर्पण करायचा असतो. तरच ती भिक्षा पवित्र होते.
सद़्गुरुंच्या उपदेशाप्रमाणे उपमन्यू रोज मिळणाऱ्या भिक्षेतील अर्धी भिक्षा सद़्गुरूंना आणून देऊ लागृला. अर्धी भिक्षा खाऊन तो आपली उपजीविका पूर्ण करीत असे. एके दिवशी गुरू त्याला पुन्हा म्हणाले, "आता तू मला संपूर्ण भिक्षा आणून दे." उपमन्यू त्याप्रमाणे संपूर्ण भिक्षा गुरूंना आणून देऊ लागला आणि पुन्हा गावात जाऊन दुसऱ्यांदा भिक्षा मागून त्यातून आपली उपजीविका चालवू लागला. त्यानंतर गुरूंनी उपमन्यूला सांगितले, की दिवसातून एकदाच भिक्षा मागायची, दोन वेळेला मागायची नाही. गुरूंची आज्ञा पालन करून उपमन्यू रानात जाऊन गाईःची राखण करू लागला. आता पोट भरण्यासाठी एका द्रोणामध्ये गाईचे दूध काढून पिऊ लागला.
ही गोष्ट समजल्यावर गुरू म्हणाले, "यज्ञासाठी दूध लागात असते परंतू असे उष्टे केलेले दूध यज्ञाला चालू शकत नाही." त्यामुळे उपमन्यूने दूध पिणेही बंद केले. रानामध्ये गाईचे दूध पिताना वासरांच्या तोंडातून जो फेस बाहेर पडत असे, तो फेस उपमन्यू घेऊ लागला. त्यामुळे त्याची भूक भागू लागली, परंतू तसे करणेही योग्य नाही, असे गुरूंनी त्याला सांगितले. आता उपमन्यू रुईच्या पानांचा चीक खाऊन जीवन कंठू लागला.
एके दिवशी रुईचा चीक उफमन्यूच्या दोन्ही डोळ्याःत गेल्यामुळे त्याची दृष्टी गेली. सायंकाळी गाईंना घेऊन तो घरी येत असताना अचानक विहिरीमध्ये पडला. गाई आपल्या आश्रमात परत आल्या परंतू उपमन्यू काही आला नाही.
धौम्य ऋषी उपमन्यूची वाट पाहत होते. त्याचा शोध घेण्यासाठी ते स्वतः रानामध्ये आले आणि उपमन्यूला मोठ्याने हाका मारू लागले. ते म्हणू लागले, "उपमन्यू ! तू कोठे आहेस ? मला ताबडतोब भेटायला ये." गुरूंचा आवाज ऐकून त्याने विहिरीतून आवाज दिला.. "गुरूदेव ! मी विहिरीत पडलो आहे. माझे डोळेगेले आहेत. आपणच आता मला वर काढा." उपमन्यूचा आवाज ऐकून गुरू विहिरीजवळ गेले आणि म्हणाले, "उपमन्यू, तू काही घाबरू नकौस ! अश्विनी देवांचे मनोभावे स्मरण कर. ते तुझ्यावर कृपा करतील."
ताबडतोब उपमन्युने देवाचे स्मरण करायला सुरूवात केली. अश्विनीदेव त्या ठिकाणी प्रगट झाले इणि त्यांनी उपमन्यूला खाण्याचे पदार्थ दिले. त्यावर उपमन्यू म्हणाला, "माझ्या सद़्गुरूंना आर्पण केल्याशिवाय मी काहीही खाऊ शकणार नाही." हीत्याची गुरूनिष्ठा पाहून अश्नीदेव प्रसन्न झाले. त्यांनी त्याचीगेलेली दृष्टी परत आणली. त्याला आशीर्वाद दिला की, "तू वेदशास्त्रामध्ये पारंगत होशील. तुझ्या नुसत्या दर्शनाने अधेळनेकांचा उद्धार होईल. तू प्रभू चरणांशी एकरूप होशील." एवढे बोलून अश्विनीदेव गुप्त झाले.
आपल्या शिष्यास मिळालेला वर ऐकून धौम्य ऋषींना अतिशय आनंद झाला. त्याःनी त्याला उत्तम आशीर्वाद दिले आणि घरी पाठविले.
धौम्य ऋषींचा तिसरा शिष्य म्हणजे बैद. तोही अत्यंत मनोभावे गुरूंची सेवा करीत असे. त्याला धौम्य ऋषींनी शुभ आशीर्वाद दिले, की तुला दिव्य ज्ञान प्राप्त होईल. तुझ्या घरी संपत्ती कधी कमी पडणार नाही. त्यानंतर सद़्गुरूंनी त्याला घरी पाठविले. सद़्गुरूंना साष्टांग नमस्कार घालून बैद आपल्या आश्रमात राहू लागला. त्यालाही तीन शिष्ये होते. आपल्या पुत्रांप्रमाणे तो शिष्यांचे पालन करीत असे:-D गुरूंच्या गृही असताना बैदने खूप कष्ट काढले होते. तसे कष्ट आपल्या शिष्यांना करावे लागू नयेत म्हणून तो काळजी घेत असे.
जो परमश्रद्धेने सद़्गुरूंची सेवा करतो, त्याचे जीवन पूर्ण आनंदी बनते.
छान
ReplyDelete