*सूर्य ऊर्जा व त्याचा वापर*

हिंदू संस्कृतीत सूर्याला देवता मानले आहे त्यामागचे कारण काय? आपल्याला माहिती आहे की सूर्य हा प्रचंड उष्णतेचा तप्त गोळा आहे त्याच्या भोवती सर्व ग्रह व पृथ्वी फिरत आहे. सूर्याची किरणं पृथ्वीवर येऊन जीवन दान देत असतात. आता आपण जी सूर्यकिरण येतात त्यांचा आपल्या पृथ्वीवर ,मानवी जीवनावर ,निसर्गावर काय परिणाम होत असतो त्याचा विचार करू.

सूर्य किरण जमिनीवर पडतात जमिनीवर असलेले वनस्पती ,झाड, भाजी पाला , बीज, यांच्याशी प्रत्यक्ष संबंध येऊन ते फलस्वरुप होतात आणि मानव , प्राणी किंवा जीवसृष्टी ते अन्नस्वरुपात ग्रहण करतात. 

तसेच सूर्यकिरण शरीरावर पडण्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन ची कमतरता दूर होते.

सूर्यकिरण पृथ्वीवरील पाण्यावर पडल्यामुळे व त्यातील उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते आकाशात ढग स्वरूपात तयार होऊन त्यांना थंड हवा लागल्यावर पाऊस स्वरूपात जीवनदान देते. 

सूर्यकिरण हे पृथ्वीवरील हवेच्या संपर्कात आल्यामुळे हवेचे प्रेशर, तापमान बदल होत असतो त्यामुळे हवा ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते म्हणजे जीवसृष्टीला आवश्यक असलेली हवा ही सूर्यामुळे बदल होत असते. 

तसेच सूर्य प्रकाश किंवा सूर्यकिरण या मध्ये असलेल्या अग्नीमुळे वातावरणात समतोल राखण्यास मदत होते.


 आकाशात सूर्यप्रकाशामुळे विविध बदल होत असतात आणि मानवी जीवनास व इतर जीव जंतूंना जगण्यासाठी सुयोग्य वातावरण तयार करीत असतात.

सांगण्याचे तात्पर्य पंचमहाभूतांचे सरळ संबंध हे सूर्य देवतेशी आहे म्हणूनच वेदांमध्ये व पुराण ,उपनिषद् मध्ये सूर्य देवतेचे अनन्य साधारण महत्त्व सांगितले आहे.

सूर्य देवतेचा संबंध हा जगातील , ब्रम्हांडातील प्रत्येक घटकाशी आलेला आहे.  

तात्पर्य सूर्य देवतेमुळेच आज हे ब्रम्हांड ,विश्व आहे.  


सूर्य प्रकाश हा पृथ्वीवर आल्यावरच माणसाला जग दिसते. जर सूर्यप्रकाश नसेल तर सगळी कडे अंधारच अंधार. 

या ब्रम्हांडामध्ये अशी एकही वस्तू नाही की ज्याचा सूर्याशी संबंध नाही.

म्हणूनच आपल्या जीवनात सूर्यदेवतेला अनन्य साधारण महत्त्व आहे.


आता आपण सूर्यदेवतेशी संबंधित ऊर्जेचा विचार करू.

१)सूर्याच्या किरणापासून तयार करण्यात आलेल्या ऊर्जेला सोलर एनर्जी म्हणतात. 

२)सूर्याची किरणं हे जमिनीवर पडतात जमिनीवरील तापमान वाढ होते तसेच पृथ्वीच्या आतील उष्णता यामुळे geothermal energy तयार होते.

३)सूर्यकिरण हे समुद्राच्या पाण्यावर पडल्यामुळे पाण्याच्या तापमानात बदल होत असतो त्यामुळे ocenic energy तयार होते.तसेच tidal wave energy चा संबंध पण सूर्यप्रकाशा शी संबंधित आहे.

४)सूर्यप्रकाश पासून तयार झालेली वनस्पती पासून biomass energy तयार करण्यात येते.

५)सूर्यप्रकाशाच्या तापमानामुळे हवेत बदल घडत असतात आणि काही ठिकाणी वाऱ्यांचा जोर जास्त कमी होत असतो म्हणजे wind energy तयार करण्यात पण सूर्यकिरणां चा प्रत्यक्ष संबंध असतो.


सूर्या जवळ असलेल्या प्रचंड ऊर्जेचा वापर कसा कोणी कोठे केव्हा कधी करावा याचे शास्त्रोक्त ज्ञान घेणे अतिशय आवश्यक आहे. सूर्यऊर्जा ही निरंतर अखंड अगणित ऊर्जा आहे . त्याचा वापर करून जास्तीत जास्त वापर करून मानवी जीवन व कार्य श्रेष्ठ करून घ्यावे.

धन्यवाद

डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे

९८६०६५९२४६

@ Do not copy, forward to All 🙏

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*