दिवाळी आणि नरकासुर वध

*दिवाळी व नरकासुर वध* *@जितेंद्र आत्माराम होले पुणे* आज दि. २४/१/२०२२ दिवाळीच्या दिवशी सकाळी आमच्या बिल्डिंग मधील मुले खेळत होती . मी त्यांना सहज विचारलं आज काय आहे? त्यांचं उत्तर लगेच आले की दिवाळी आहे. मी त्यांना परत प्रश्न केला की दिवाळी का साजरी करतात ? तर त्यांच्यापैकी कोणीही बोलला नाही कारण त्यांना काही माहितीच नव्हते. मी त्यांना परत परत विचारू लागलो पण आता ते कंटाळले आणि त्यांनीच मला स्पष्ट सांगितले की तुम्हीच आम्हाला सांगा . तोच त्या मुलांपैकी एक मुलगा म्हणाला याचा संबंध रामायणाशी आहे. लगेच दुसरा म्हटला अरे महाभारताशी संबंध आहे. पण कोणालाच काही माहिती नव्हते . तिथेच अजून आमच्या बिल्डिंग मधील सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले दोन मान्यवर आले. पण त्यांना सुद्धा माहिती नाही. मग मुलांच्या विनंतीस मान राखून त्यांना मी सांगू लागलो. दिवाळीचा संबंध हा रामायण महाभारत या दोघांशी आहे. रामायण मध्ये रावणाला मारून राम ,सीता, लक्ष्मण आणि सर्व मान्यवर ज्या दिवशी अयोध्येत आले त्या दिवशी दिवाळी साजरी केली . दिपोस्तव आनंदोत्सव साजरा करण्यात आला घरे ,आंगण सजविण्यात आले. नवीन वस्त्र घालून घरात गोडधोड पदार्थ तयार करण्यात आले. अंगण ,परिसर , नगर पताकांनी दिव्यांनी ,फुलांनी सजविले गेले. अश्या रीतीने दिवाळी साजरी करण्यात आली. आणि महाभारताशी संबंधित म्हणजे नरकासुर वध. मी त्यांना सांगितले बरे का बाळांनो! आजचे गुवाहाटी म्हणजे त्या काळाचा प्रागज्योतिषपूर म्हणजे नरकासुराची राजधानी. त्याचा तिथे भव्य राजवाडा होता आणि त्यानं पृथ्वीवरील सर्व भागांतून सुंदर सुंदर रूपवान ,तेजस्वी,देदीप्यमान अश्या स्त्रियांना पळवून घेऊन आला होता आणि त्यांना डांबून ठेवले होते. आणि आजच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला . म्हणून आजच्या दिवशी दिवाळी साजरी करतात. मुलांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की श्रीकृष्णांना १६१०८ भार्या होत्या पण भगवान श्रीकृष्णांनी कधीच कुणाला लग्नासाठी मागणी घातली नाही. प्रत्येक वेळी वधू कडून मागणी आलेली आहे. आणि ती श्रीकृष्णानी मान्य केली.

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*