Posts

Showing posts from March, 2024
 *पुरुष प्रधान लग्न व्यवस्था* लेखक: डॉ. जितेंद्र आ. होले ,पुणे. ( या लेखातील विचार हे लेखकाचे विचार असून याचा विपरीत अर्थ लावू नये) "*शक्ती* ही ब्रम्हांडातील सर्वोच्च ऊर्जा आहे असे म्हटतात ,त्या उर्जेतून त्रिदेवांची निर्मिती झाली आहे .आणि मग ह्या त्रिदेवानी सर्व सृष्टी निर्माण केली , सर्व प्राणी, पक्षी ,वनस्पती, पंचमहाभुत, पंचतंमात्रा , पंचप्राण, ई. चा वापर करून सर्व ब्रम्हांड तयार केले. अश्या सर्वोच्च पदी ती शक्ती म्हणजे स्री लिंगी उच्चारवाचक आहे . आपण ती शक्ती म्हणतो. तो शक्ती म्हणत नाही . म्हणून ती शक्ती म्हणजे आद्यशक्ती एक स्री आहे आशी पौराणिक मान्यता आहे. असे असूनही समाजात पुरुष प्रधान संस्कृतीतील लग्न व्यवस्था कधी तयार झाली. या बद्दल शोध ,चर्चा करणे गरजेचे आहे असो. 🙏 "लग्न", हा संस्कार जवळपास सर्वांच्या आयुष्यात येत असतो काही विकल्प सोडून. लग्न म्हणजे दोन जीवांचे मीलन, दोन कुटुंबाचे मिलन . दोन कुटुंब धार्मिक शास्त्रोक्त पद्धतीने एकत्र येतात . मंडप , स्टेज सजावट, जेवण , नाष्टा, चहा,आइस्क्रीम, नाच गाणी, भाषण , विविध कला अश्या अनेक प्रकारच्या कार्यक्रमाची रूपरेषा स...
 *तथाकथित पुरोगामी संस्कृतीचे होलिका दहन* *डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे* ( या लेखातील विचार हे लेखकाची विचार असून कोणीही याचा विपरीत अर्थ लावू नये) "होळी रे होळी पुरणाची पोळी; साहेबाच्या घरी उंदराची जोडी", अश्या प्रकारच्या घोषणा देत होळीची सूरवात गावाकडे व्हायची . लोक अतिशय सध्या पद्धतीने होळीचा सण साजरा करायचे . सकाळी लवकर उठून घरातील ,गावातील सर्व मंदिरांना नमस्कार करून लोक एकमेकांना टिळा लावून भेट व आशीर्वाद घेऊन होळी साजरी करायचे . घरात पुरणपोळी खीर चा स्वयंपाक असायचा घरामध्ये स्वतच्या हातानी तयार केलेले पदार्थ असायचे व संध्याकाळी प्रत्येक घरातून लोक लाकूड , गोवऱ्या काढून होलिदहनसाठी सज्ज राहायचे . व अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने होलिका दहन व्हायचे . होळीची पुजा करायचे नैवद्य दाखवायचे व काही वयस्क स्त्रिया होळीचे गीत गायच्या व सर्वजण आनंदाने घरी जायचे अश्या पद्धतीने साध्या सरळ पद्धतीने होलिका दहन साजरे व्हायचे. पण आता शहरामध्ये याचे रुप बदलले आहे.  होलिका दहन च्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन ला रंग खेळतात. होळीच्या दिवशी आमच्या सोसयटीतील होळी दहन केल्यानंतर माझ्या मुलीला घेऊ...

*श्यामचा संताप व शिक्षणाचं महत्त्व* *एक सत्य कथा*

 *श्यामचा संताप व शिक्षणाचं महत्त्व* *एक सत्य कथा* एक आटपाट नगर होतं त्या नगराच नाव फैजपूर  . सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या सुंदर वनराई ने नटलेल्या निसर्ग देवतेचे वरद हस्त लाभलेल्या शहरामध्ये देवराम नावाचा एक शिक्षक राहत होता. त्याच्या मुलाचे नाव श्याम होते. श्याम अतिशय हुशार चंचल चतुर होता पण गावामध्ये शिक्षण झाल्यामुळे त्याच राहणीमान , वागणं,  बोलणे सर्व गावासारखं.  श्यामचा दहावीचा निकाल लागला;  निकाल घेऊन घरी पोहोचला आणि सर्व शेजारी मित्रमंडळी त्याला आपापले मत मांडून तू ITI कर ,DEd कर,  BSc कर,  दिक्लोमा कर , हो,  दिक्लोमाच करं!  त्यांना डिप्लोमा हा शब्द माहिती नव्हता. असे फुकटचे सल्ले देत होते.  मात्र श्याम काळजीत होतो ,  काय करायचं? कोण मार्गदर्शन करेल? किती पैसे लागतील ? काहीच माहिती नाही.  शेवटी श्याम वडिलांना घेऊन TMES कॉलेज  मध्ये diclomacha तपास करण्यासाठी घेऊन गेला. कॉलेजच्या  प्रवेशद्वारातून प्रवेश केला. दोघांच्या छातीत धडकी भरली कारण एवढ्या भव्य दिव्य कॉलेजमध्ये पहिल्यांदा गेले होते. मोठी हिम्मत करून त्यां...