*तथाकथित पुरोगामी संस्कृतीचे होलिका दहन*
*डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे*
( या लेखातील विचार हे लेखकाची विचार असून कोणीही याचा विपरीत अर्थ लावू नये)
"होळी रे होळी पुरणाची पोळी; साहेबाच्या घरी उंदराची जोडी", अश्या प्रकारच्या घोषणा देत होळीची सूरवात गावाकडे व्हायची . लोक अतिशय सध्या पद्धतीने होळीचा सण साजरा करायचे . सकाळी लवकर उठून घरातील ,गावातील सर्व मंदिरांना नमस्कार करून लोक एकमेकांना टिळा लावून भेट व आशीर्वाद घेऊन होळी साजरी करायचे . घरात पुरणपोळी खीर चा स्वयंपाक असायचा घरामध्ये स्वतच्या हातानी तयार केलेले पदार्थ असायचे व संध्याकाळी प्रत्येक घरातून लोक लाकूड , गोवऱ्या काढून होलिदहनसाठी सज्ज राहायचे . व अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने होलिका दहन व्हायचे . होळीची पुजा करायचे नैवद्य दाखवायचे व काही वयस्क स्त्रिया होळीचे गीत गायच्या व सर्वजण आनंदाने घरी जायचे अश्या पद्धतीने साध्या सरळ पद्धतीने होलिका दहन साजरे व्हायचे. पण आता शहरामध्ये याचे रुप बदलले आहे.
होलिका दहन च्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन ला रंग खेळतात. होळीच्या दिवशी आमच्या सोसयटीतील होळी दहन केल्यानंतर माझ्या मुलीला घेऊन मी माझ्या टू व्हीलर वर आपल्या विभागात फिरायला गेलो प्रत्येक सोसायटीत किंवा सोसायटी बाहेर किंवा काही राजकारणी व्यक्तीनी सामायिक होलिका दहन केले अतिशय प्रसन्न वातावरण होते. पण काही सोसायटी मध्ये होलिका दहन नव्हते तो सोसायटी भकास उदास दिसत होती तिथलं वातावरण,लोक उदासीन दिसत होते. खर तर काही लोकांनी पुढाकार घेऊन हा उत्सव साजरा करायचा होता पण त्यांची मर्जी.
होलिका दहन तर अतिशय प्रसन्न रोमांचक आनंदी वातावरण साजरे झाले . आता धुलीवंदनचा दिवस उगवला . सकाळपासून लहान मुले रंग खेळू लागले. जसं जसं दिवस वर जात होता तसे तसे लोक घरातून बाहेर येऊ लागले व रंग खेळू लागले. एकमेकांना रंग लावून आणि पाणी किंवा रंगाचे पाणी एकमेकांवर उडवू लागले. अतिशय आनंदी वातावरण तयार होते. नंतर काही लोक डी जे लाऊन नाच गाणी ऐकत आनंद साजरा करतात. खूपच रोमांचक रोमहर्षक वातावरण असते. पण काही मंडळी जेव्हा विचित्र कपडे घालून बीभत्स वर्तणूक करतात तेव्हा वाईट वाटत . आणि मद्य किंवा भांग घेऊन होळी खेळली जाते आणि मग नशेत विचित्र हावभाव करून वातावरण बिघडवले जाते तेव्हा चिंता वाटते. त्यावेळी ते लोक लहान मुलांवर काय संस्कार होतील याचा साधा विचार सुद्धा करत नाही. अशी मंडळी स्वतः ला मॉडर्न समजतात व दुसऱ्याला तुच्छ लेखून वावरतात. वय चाळीस उलटून गेलेली स्त्री पुरुष जेव्हा आपल्या शरीराला न शोभणारे कपडे घालून स्वतः ला वास्तविक नसलेले तरुण समजून वावरतात तेव्हा वाईट वाटत. असो आपल्याला काही कोणाला शिकवायचे नाही. प्रत्येक जण सुज्ञ आहे. फक्त एवढाच सामान्य जीवन जगा व जगू द्या.असो
मी परत एक अभिनव प्रयोग केला .अनेक लोकांना ,मुलांना होलिका सण कधीपासून साजरा करतात? व त्यामागची कथा काय आहे? तेव्हां मात्र या तथाकथित पुरोगामी सुशिक्षितांची खरी ओळख पटली. एक टक्के सुद्ध यांना पौराणिक कथा माहिती नाही .
मग त्यांना प्रल्हाद , हिरण्यकश्यपू, होलिका यांची पौराणिक कथा सांगितली. तेव्हा त्याचं प्रश्न हे खर कशावरून ? मग माझा पारा चढला पण मी शांत पणे अश्या मंडळीच्या बुद्धी चा विचार करून घरी आलो.
Comments
Post a Comment