*श्यामचा संताप व शिक्षणाचं महत्त्व* *एक सत्य कथा*
*श्यामचा संताप व शिक्षणाचं महत्त्व* *एक सत्य कथा*
एक आटपाट नगर होतं त्या नगराच नाव फैजपूर . सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या सुंदर वनराई ने नटलेल्या निसर्ग देवतेचे वरद हस्त लाभलेल्या शहरामध्ये देवराम नावाचा एक शिक्षक राहत होता. त्याच्या मुलाचे नाव श्याम होते. श्याम अतिशय हुशार चंचल चतुर होता पण गावामध्ये शिक्षण झाल्यामुळे त्याच राहणीमान , वागणं, बोलणे सर्व गावासारखं.
श्यामचा दहावीचा निकाल लागला; निकाल घेऊन घरी पोहोचला आणि सर्व शेजारी मित्रमंडळी त्याला आपापले मत मांडून तू ITI कर ,DEd कर, BSc कर, दिक्लोमा कर , हो, दिक्लोमाच करं! त्यांना डिप्लोमा हा शब्द माहिती नव्हता. असे फुकटचे सल्ले देत होते. मात्र श्याम काळजीत होतो , काय करायचं? कोण मार्गदर्शन करेल? किती पैसे लागतील ? काहीच माहिती नाही. शेवटी श्याम वडिलांना घेऊन TMES कॉलेज मध्ये diclomacha तपास करण्यासाठी घेऊन गेला. कॉलेजच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला. दोघांच्या छातीत धडकी भरली कारण एवढ्या भव्य दिव्य कॉलेजमध्ये पहिल्यांदा गेले होते. मोठी हिम्मत करून त्यांनी ऑफिस मध्ये प्रवेश केला . तीन क्लार्क ऍडमिशन साठी बसले होते. बाहेर शिपाई होता . त्यांनी श्याम आणि त्याच्या वडिलांकडे बघितलं व साधा पांढरा शर्ट , पांढरी पँट बघून त्यांनी त्यांचा हात धरला आणि अक्षरशः ओरडला आणि खान्देशी भाषेत बोलू लागला" ओ बोवा तुले समजत नी का ? एवढी लाईन लागली आहे, तिकडे बैस. असे बोलून हात पकडुन बाजूला केले आणि दोघांना अक्षरशः बाहेर काढलं. श्यामला त्याचा अतिशय राग आला. संताप अनावर झाला पण काय करणार? तो असहाय होतो . त्याचे वडील पण परिस्थिती मुळे असहाय झालेले , गरीब साधा सरळ शिक्षक बाजूला जाऊन बसला. त्यानंतर त्यांचा नंबर आला आणि त्यांना बोलाविले तिथला क्लार्क ने अतिशय तुच्छतेने दोघांकडे बघितले आणि श्यामला विचारले, कारे काय करणार आहे ? श्यामने घाबरत घाबरत उत्तर दिले ,मी दिकलोमा करणार आहे. असे बोलला तेव्हा त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि परत विचारलं काय करणार आहेस. तो परत बोललो , dicloma करणार आहे. आता मात्र त्याची सहनशीलता संपली व तो श्यामवर खेचटला, अरे! जा रे घरी! तुला साधं डिप्लोमा म्हणता येत नाही आणि तू शिकायला निघाला.
अहो गुरुजी जा घरी आणि याला 11 वी , 12 वी शिकावा, याला हे शिक्षण जमणार नाही. आणि त्या माणसाने अक्षरशः त्या दोघांशी बोलणे थांबाऊन दुसऱ्याशी बोलू लागला. आता मात्र श्यामच्या संतापाचा उद्रेक झाला. अंगाची लाही लाही झाली, तळपायाची आग मस्तकात गेली. आणि त्याच वेळेस श्यामने ठरवून टाकलं की याच क्षेत्रातील उच्च शिक्षण घ्यायचं आणि ह्या शिपायाला आणि क्लार्कला पाणी , चहा नाष्टा घेऊन यायला सांगायचं.
झालं श्यामने ठरविलं आणि तावांतावांत घरी आला. आणि सरळ 11 वी ला प्रवेश घेतला. आणि खूप अभ्यास केला 12वी झालांआणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.पदवीधर झाला. नंतर प्रचंड मेहनत केली एन आय टी मधून उच्च पदवीधर झाला. आणि त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून हजर झाला. प्रथम दिवशी श्यामला त्या दोन्ही महाशयांचे दर्शन झाले. आणि प्राचार्यांच्या केबिन बाहेर तो बसलो होता . त्यांनी श्यामची अतिशय आतुरतेने चौकशी केली व त्याला चहा पाणी दिले. तेव्हा श्यामला शिक्षणाचं आणि कपड्यांचं महत्त्व पटलं. आणि त्याच्या मनात असलेले अपमानच शल्य सुखदपणे मावळत गेले. परत दोन दिवसांनी तो क्लार्क त्याच्याकडे काही कामासाठी आला तेव्हा त्याला अतिशय नम्रपणे लाचार, दीनवाणी अवस्थेत बघितलं. श्यामलाच त्याची दया आली आणि त्याच्या मनातील एवढ्या वर्षाचा राग संताप ,उद्वेग , द्वेष , अपमान संपुष्टात आला. आणि तो अतिशय शांतपणे आनंदाने पुढील वाटचालीकडे मार्गस्थ झाला.
*डॉ जितेंद्र आत्माराम होले
BOS,
पुणे विद्यापीठ आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव*
Comments
Post a Comment