*पुरुष प्रधान लग्न व्यवस्था*


लेखक: डॉ. जितेंद्र आ. होले ,पुणे.

( या लेखातील विचार हे लेखकाचे विचार असून याचा विपरीत अर्थ लावू नये)


"*शक्ती* ही ब्रम्हांडातील सर्वोच्च ऊर्जा आहे असे म्हटतात ,त्या उर्जेतून त्रिदेवांची निर्मिती झाली आहे .आणि मग ह्या त्रिदेवानी सर्व सृष्टी निर्माण केली , सर्व प्राणी, पक्षी ,वनस्पती, पंचमहाभुत, पंचतंमात्रा , पंचप्राण, ई. चा वापर करून सर्व ब्रम्हांड तयार केले. अश्या सर्वोच्च पदी ती शक्ती म्हणजे स्री लिंगी उच्चारवाचक आहे . आपण ती शक्ती म्हणतो. तो शक्ती म्हणत नाही . म्हणून ती शक्ती म्हणजे आद्यशक्ती एक स्री आहे आशी पौराणिक मान्यता आहे. असे असूनही समाजात पुरुष प्रधान संस्कृतीतील लग्न व्यवस्था कधी तयार झाली. या बद्दल शोध ,चर्चा करणे गरजेचे आहे असो. 🙏

"लग्न", हा संस्कार जवळपास सर्वांच्या आयुष्यात येत असतो काही विकल्प सोडून. लग्न म्हणजे दोन जीवांचे मीलन, दोन कुटुंबाचे मिलन . दोन कुटुंब धार्मिक शास्त्रोक्त पद्धतीने एकत्र येतात . मंडप , स्टेज सजावट, जेवण , नाष्टा, चहा,आइस्क्रीम, नाच गाणी, भाषण , विविध कला अश्या अनेक प्रकारच्या कार्यक्रमाची रूपरेषा समूहात केलेली असते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आनंद घेत असतो. वधू वर पण आपल्या विश्वात मग्न असतात . वर पिता माता आपले कार्य सुखरूप होत आहे ह्या आनंदात असतात . 

पण त्यावेळी त्याक्षणाला सर्वात चिंतातुर असतात ते वधूचे माता पिता. सर्वांची खातरदरी करणे लग्नाचा प्रत्येक विधी सहज आनंदात पार पडेल ह्या करिता प्राणपणाला लाऊन प्रयत्न करणे. मग हा वधुपिता सगळ्यांशी हसत खेळत पण एक चिंताग्रस्त मनाने वावरत असतो. आणि ज्या क्षणाची तो आयुष्यातील सर्वात मोठी आनंद दुःख क्षणाची वाट बघत असतो तो क्षण म्हणजे कन्यादानाचा तो क्षण येऊन पोहचतो. त्याच्या मनाच्या पडद्यावर असंख्य मागील सुख दुःखाचे क्षण ,बालपण ,शिक्षण ई अनेक घटना येतात. व त्याचे मन ,डोळे पाणावतात. आणि मनावर डोंगराएवढे ओझे घेऊन मुलीला विदा करतो. 

त्यावेळी मुलीच्या पण मनात कालवाकालव होत असते . एक तर नव्या घरी नवे लोक , नवं कुटुंब आणि दुसरीकडे आपल्या लहानपणच्या माणसांचा , घराचा , आई वडिलांचा वियोग. अतिशय द्विधा मनस्थितीत वधू असते. घराची लोक कशी असतील? त्यांचे स्वभाव कसे असतील? त्यांना माझे वागणे आवडेल का? अश्या अनेक शंका कुशंका तिच्या मनात असतात. आणि अतिशय बेगळ्या मनस्थितीत ती नवऱ्याच्या घरी जाते.

पण एक प्रश्न सहज मनात येतो की कन्यादानच का? पुत्रदान का नाही? मुलींनीच मुलाच्या घरी का जावे ? मुलांनी मुलीच्या घरी का जाऊ नये? 

तर याचे एकच शास्त्रोक्त उत्तर आहे की ,"*पुरुष प्रधान संस्कृती*, म्हणजे पुरातन काळापासून पुरुष हे धन , संपत्ती कमवायची व कमावलेली संपत्ती ही आपल्या घराकरिता उपयोगात आणयाची . स्त्रियांनी त्या संपत्तीचा वापर आपले घर ,कुटुंब चालविण्यासाठी करायचा. व घरातील सर्व कार्य करायची. पुरुषांनी घरच्या बाहेरील सर्व कार्य करायची

 . पण आता आजच्या परिस्थितीत मुले आणि मुली दोन्ही सारखे उच्चशिक्षित असतात . दोघांना चांगला पगार असतो. दोन्ही कमावते असतात . एव्हाना मुली ह्या मुलापेक्षा जास्त कमावत असतात. अश्या वेळी वरील संस्कृती परंपरा योग्य आहे का? याचा विचार आपण सर्वांनी करायचा आहे. 

हल्ली मुलींचे पण स्वतः चे घर पगारातून किंवा स्व-मिळकतनी घेतलेले असते. मग तिच्या स्वतः घरी मुलगा का जाऊ नये? आजकाल शहरामध्ये आपण बघतो दोन्ही जण कमाविते असेल तर घरच्या कामाची वाटणी पण समान होते.आणि मुलगापण स्वयंपाक करतो. 

पण जाऊ द्या आपला मुख्य विषय बाजूला पडला. अश्या सामर्थवान मुलीच्या कार्याचा विचार करून पुत्रदान कोणी करेल काय? कोणी खूपच पुरोगामी विचारांचा असेल तर तो करेलही पण समाज ,नातेवाईक ,मित्रसंबंधी हे मान्य करतील काय? त्याला मूर्ख, शहाणा, वेडा ठरवतील . त्यांना त्याची संस्कृती परंपरा आडवी येईल . ते संस्कृतीरक्षक अश्या अभिमानाने पुढे येतील जसे म्लेच्छानी धर्मावर आक्रमण केले असे. पण ते जाऊ द्या. आपल्याला काय करायचे आहे?

पण एका प्रश्नचं उत्तर समाजानी द्यायचे आहे कि आज काल मुले मुली समान शिक्षण ,समान उच्च शिक्षण , समान ज्ञान , समान क्षमता सर्वतोपरी समानता असे असेल तर जी रणरागिणी लग्नानंतर ज्या दिव्याला सामोरी जाते त्या दिव्याला आपले शूरवीर मुले मुलीकडे सामोरे जातील काय? मुलगा हा नवीन घर, नवीन कुटुंब, नवीन आई वडील, नवीन नातेवाईक नवीन घरसंस्कृती हे मान्य करील काय? 

तर उत्तर नाही! कारण याचे उत्तर एकच ! *पुरुष प्रधान संस्कृती*. 

पण जाऊ द्या मंडळी ! आपल्याला काय करायचं एवढा विचार करून . आपल्यावर जेव्हा असा प्रसंग येईल तेव्हा बघून घेऊ . आणि आपणच का विचार करायचा. आपणच का विरुद्ध जायचं. जसं आहे तसं चालू द्या. काळ याच्यावर औषध आहे. थोडा काळ गेल्यानंतर सर्व ठीक होऊन जाते. आपण तो विचार नाही करायचं आपले काम आपले कुटुंब आणि आपले घर एवढेच आपले विश्व.


Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*