*जागो मतदार जागो, अन्यथा ----+--------*
 *जागो मतदार जागो, अन्यथा ----+--------*  लेखक डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे मला आठवतं मी लहान असताना म्हणजे  1980 ते 1990 च्या दशकातील स्थिती होती . आमच्या गावाकडील परिसरामध्ये काही विशिष्ट लोकांची दादागिरी होती त्याचे कारण असे होते की ते संघटित होते आणि त्यामुळे  त्याच्या मनाला जे येईल तसे ते वागायचे . आमच्या शेतकरी बंधूंच्या शेतामधील पीक कापून न्यायचे. भाजी पाला शेतकऱ्यां समोर घेऊन जायचे . आयाबहिनीची छेडछाडी करायचे आणि कोणी प्रत्युत्तर दिलं तर त्याला सर्व मिळून मारायचे. त्यामुळे अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते . पोलिस,कायदा सर्व काही होते पण त्या लोकांना धाक नव्हता. खुले आम आततायी माजली होती. प्रत्येक जण हा चिंतेत ,धाकात ,असुरक्षित होता. त्यावेळेस एक चमत्कार झाला. जनसामन्याची एक संघटना एका देवमाणसाने सुरू केली  . तो देवमाणूस  मुंबईहून आला होता त्याने लोकांना  संघटित केले व सर्व मिळून सामना, प्रत्युत्तर युद्ध कास करायचं ते  शिकवले . आणि याचे फलस्वरुप ते लोक घाबरले व नंतर सुरळीत सुरक्षित जीवनमान सुरू झाले .  सांगण्याचा उद्देश की स...