*जागो मतदार जागो, अन्यथा ----+--------*
*जागो मतदार जागो, अन्यथा ----+--------*
लेखक
डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे
मला आठवतं मी लहान असताना म्हणजे 1980 ते 1990 च्या दशकातील स्थिती होती . आमच्या गावाकडील परिसरामध्ये काही विशिष्ट लोकांची दादागिरी होती त्याचे कारण असे होते की ते संघटित होते आणि त्यामुळे त्याच्या मनाला जे येईल तसे ते वागायचे . आमच्या शेतकरी बंधूंच्या शेतामधील पीक कापून न्यायचे. भाजी पाला शेतकऱ्यां समोर घेऊन जायचे . आयाबहिनीची छेडछाडी करायचे आणि कोणी प्रत्युत्तर दिलं तर त्याला सर्व मिळून मारायचे. त्यामुळे अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते . पोलिस,कायदा सर्व काही होते पण त्या लोकांना धाक नव्हता. खुले आम आततायी माजली होती. प्रत्येक जण हा चिंतेत ,धाकात ,असुरक्षित होता. त्यावेळेस एक चमत्कार झाला. जनसामन्याची एक संघटना एका देवमाणसाने सुरू केली . तो देवमाणूस मुंबईहून आला होता त्याने लोकांना संघटित केले व सर्व मिळून सामना, प्रत्युत्तर युद्ध कास करायचं ते शिकवले . आणि याचे फलस्वरुप ते लोक घाबरले व नंतर सुरळीत सुरक्षित जीवनमान सुरू झाले .
सांगण्याचा उद्देश की संघटित व्हा आणि संघर्ष करण्यापेक्षा योग्य व्यक्तीस मतदान करा.
मतदान नक्की करा. सलग सुटी आहे म्हणून फिरायला जाऊ नका. आज आपण जर शांतपणे,सुरक्षित आहोत ते फक्त आपल्या सैन्य ,पोलिस व सुरक्षा रक्षककांमुळे आणि आणि हे नियंत्रणात असतं सरकारच्या, म्हणून सरकार निवड अतिशय महत्वाची आहे. आज भारतामध्ये हजारो वर्षापासून चालत आलेली संस्कृती त्यामध्ये मग शारीरिक ,आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक विकास व त्यासाठी लागणारी कर्म व त्याचे फलित हे आपल्याला शिकविलेले आहे. , सोळा संस्कार , चौदा विद्या ,दर्शन शास्त्र, पुराण ,उपनिषद , वेद यासारखे ग्रंथ जगविण्यास शिकवतात आणि ही धरोहर सुरक्षित जिवंत राहिली पाहिजे . योग शास्त्र ,आयुर्वेद ,गंधर्व वेद ,नाट्यशास्त्र , संगीत शास्त्र, कृषी शास्त्र, अर्थशास्त्र, या माध्यमातून जीवन जगण्याची कला शिकविणारी आमची संस्कृती सुरक्षित जिवंत राहिली पाहिजे . इतिहास साक्षी आहे आमचे नालंदा तक्षशिला येथील वाचनालय हे सहा महिने जळत होते. अगणित अशी ज्ञानाचा दिवा विझत होता. कोणीही संरक्षण करू शकले नाही. कारण शक्तिहीन होते. दृष्ट वाईट अंध लोकांनी हा झंझावात मांडला होता. आणि त्यातून कित्येक पिढ्यांचे फक्त नुकसान आणि नुकसानच झाले.
पूर्वी मंदिरांच्या भोवती सर्व अर्थव्यवस्था, राज्य व्यवस्था ,न्याय व्यवस्था ,आरोग्य व्यवस्था व जीवन सुखी समाधानी आनंदी राहण्यासाठीची सर्व व्यवस्था होती .
कालांतराने त्याचे स्वरूप बिघडले . पण खरे बघितले तर त्या काळी लोक बुद्धिमान, समृद्ध , सुखी समाधानी आनंदी आरोग्यदायी व आयुष्यवान होते . त्याचे कारण भारतीय ज्ञान परंपरा आणि संस्कृती.
आणि परत हे सांभाळायचे असेल तर आपली मूल्ये संस्कृती, पुरातन ज्ञान यासोबत पुरोगामी विचार व मॉडर्न जगाचा अभ्यासक असलेल्या उमेदवार व पक्षालाच मतदान करा. अन्यथा अपरिमित नुकसान,हनी होईल . याचे परिणाम फार बिकट होतील. आणि सगळीकडे अराजकता मांडेल या परिस्थितीवर माझे हे गीत अगदी योग्य जुळेल.
*गीत*
दिसे नभात ते लालसर ढग रक्ताचे !
सरसर पडतेय भुईवर ते रक्त पुण्याचे!!
त्या रक्तापायी भरून गेली वसुधेची घरदारे!
लाललाल चहुकडे शालू नेसाला धरणीने!!
पाप पिऊ लागला ते भरभर कंठी प्राण पुण्याचे!
सगळीकडे अनर्थ माजला दिस आले व्यभिचाराचे!!
त्या रक्ताची वापस झाली ती गेली गगनात!
वरून खाली पडू लागली ती गार रक्तपात!!
त्या भयानक रक्तपातीत अनेक बहुजन मेले!
अनेक पुण्यवान तळपत मेले पाप राज आले!!
अखेर रक्ताचा पूर आला मातला उत्क्रांत!
धरणीमाता कासावीस झाली बघूनी हा अंत!!
*विचार करा ,योग्य व्यक्तीस मतदान करा*
Comments
Post a Comment