*वसु बारस व पंचगव्य स्नान एक अप्रतिम स्वर्गीय अनुभव*

लेखक 
प्रा. डॉ जितेंद्र आ होले
अध्यक्ष
भारतीय शिक्षण मंडळा पुणे महानगर 

*वसुबारसच्या* निमित्ताने पांजरपोळ भोसरी पुणे येथे पंचगव्य स्नान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी 8.00 वाजता ह्या प्रोग्रामला सुरवात झाली. सुरवातीला गोशाळेला प्रदक्षिना करण्यात आली त्यामध्ये आयोजकांनी पंचगव्य स्नानाचे महत्व . पंचमहाभूते व आपल्या शरीराचा संबंध तसेच भारतीय पुरातान शास्त्र व त्याचे महत्व उपयोग याचे विश्लेषण करून सांगितले . व यामागील विज्ञान, शास्त्र समजाऊन सांगितले. त्यानंतर
सर्व मंडळी ज्ञान ग्रहण करीत गोशाळेतील मध्यवर्ती ठिकाणी जिथे पंचगव्य स्नानाची व्यवस्था केली होती तिथे पोहचली. कमीत कमी 400 जण स्नानाकरिता आले होते. जळगाव ,धुळे, अमरावती कोल्हापूर सातारा ,सांगली ,नांदेड परभणी, अहील्यानगर, संभाजीनगर, इंदापूर, पुणे , पिंपरी चिंचवड,मावळ, मुंबई, पुणे ,नाशिक, अहमदनगर जिल्हा,अश्या विविध ठिकाणची मंडळी आलेली होती. आणि विशेष म्हणजे फक्तं पंचगव्य स्नान साठी
एवढे कष्ट घेऊन ही मंडळी आलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद समाधान उत्साह अगदी स्पष्ट दिसत होता. आदरणीय मिलिंदजी एकबोटे , श्री तुषारजी देशमुख व इतर आयोजकांनी प्रोग्रमला सुरवात केली. माईक , स्टरिओ ची व्यवस्था केली होती तसेच एका शिंधी बांधवाने जलपेयाची पण व्यवस्था केली होती. सर्वांना खाली बसविण्यात आले.
आधी सांगितल्या प्रमाणे तील तेल, अभ्यंग तेल हे लोकांनी सोबत आणले होते . आयोजकांनी सांगितले की तेल हे स्वतः स्वतःला न लावता एकमेकाला तेलभ्यांग करायचे . मग जोड्या ठरल्या आणि एकमेकांना तेल अभ्यंग करू लागले.
 सकाळच्या सूर्य प्रकाशात सर्वांचा उत्साह आनंद ओसंबून वाहत होता. तेल लावल्यानंतर मग थोड्यावेळाने पंचगव्य तयार करण्यासाठी सज्ज झाले.
 समोर दोन टाक्या ठेवलेल्या होत्या. त्यात पंचगव्य तयार करणार होते. सर्व प्रथम गायत्री मंत्राचे उच्चारण करण्यात आले व इतर शास्त्रोक्त मंत्रांनी सुरवात झाली . 
सर्व प्रथम गोमय टाकण्यात आले त्यानंतर मग गोमूत्र, दूध, तूप ,दही, ताक,मध, तुलसी पत्र , निंबाच्या पानाचा रस, निंबाच्या पानांचा रस, चंदन पावडर, कोरफड , मुलतानी माती यज्ञाची भस्म, हळद व इतर आयुर्वेदीक औषधी वनस्पती हे सर्व पदार्थ एकत्र करण्यात आले . अगदी शास्त्रोक्त पद्धतीने मिस्त्रण तयार करण्यात आले. वातावरण अतिशय पवित्र आनंदी झाले होते. सूर्यनारायणाची संपूर्ण कृपावर्षाव होत होता. पंचमहाभूते पण आज कृपावर्षाव करीत होती. आणि तो क्षण आला आणि आयोजकांनी सांगितले की आता शास्त्रोक्त ,आयुर्वेदिक ,पारंपरिक, आध्यात्मिक पद्धतीने तयार केलेले पंचगव्य शरीराला लावायचे आहे पण आयोजकांनी सांगितले की एकमेकांना पंचगव्य लावायचे. 

झाले लोक सज्ज झाले आणि 20 जणांचा गोल रिंगण तयार करून एकमेकांना पंचगव्य लावू लागले .भरपूर पंचगव्य संपूर्ण शरीराला लावले गेले . लोकांचा आनंद ,उत्साह शिगेला पोहोचला होता. ब्रम्हानंदात लोक पोहचले. आणि सांगण्यात आले की सूर्य प्रकाशात बसा . आणि पंचगव्य अंगावर कोरडे झाले की मग पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. थोड्यावेळाने पंचगव्य सुकल्यावर सर्वांना मध्यवर्ती असलेल्या हौदाजवळ बसविण्यात आले आणि मग कार्यकर्त्यांनी अंगावर थंडगार पाणी टाकले . स्नानाचा आनंदोत्सव सुरू झाला . थंडगार पाण्याचा फवारा हा आनंददायक क्षण अनुभव करून देत होता. सर्वांचे स्नान संपूर्ण झाले . त्यानंतर स्नेह भोजन, प्रसादाचा कार्यक्रम होता . बारा वाजले होते सर्वांना अतिशय भुख लागली होती , पोटात कावळे ओरडत होते. पोटातील अग्नी प्रज्वलित झाला होता . भोजनाच्या सुवास दरवळत होता. कळत नकळत सर्वांचे पाऊल हे अन्नपूर्णा हॉल च्या दिशेने गेले . अमृतमय भोजन करून तृप्त होऊन सर्व आपापल्या मार्गाने निघून गेले पण एका अटीवर, की पुढच्या वर्षी परत एकत्र येऊ व यानंतर परत नवीन कार्यक्रम आयोजित करून सनातन संस्कृती व भारतीय ज्ञान परंपरेला वृद्धिंगत करून ज्ञानार्जन ,अर्थाजन, मानसिक ,आध्यात्मिक ,शांती, समाधान, कीर्ती ,समृध्दी ,आरोग्य, सुख, शांतता, आनंद समाजात पोहचवू.
धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*