*दांडिया गरबा खेळातिल विकृत षड्यंत्र* (*अतिशय थोडके आणि महत्वाचे पण माझे विचार*) लेखक : डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे " या देवी सर्व भुतेशू शक्ती, मातृ पितृ,लक्ष्मी रुपेन संस्थिता ! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!! हे देवी आम्हा सर्वांवर कृपादृष्टी ठेव आमच्यावर दया कर व आम्हाला सर्वांना सुख शांतता आनंद समाधान कीर्ती समृध्दी आरोग्य आयुष्य बुद्धी, ऐश्वर्य प्रदान कर आणि आम्ही यासाठी हे माते तुला शरण आलो आहेत आणि कृपादृष्टी ठेवून आम्हाला आध्यात्मिक, भौतिक, शारीरिक ,मानसिक, आधिदैविक शक्ती देवो या करिता देवीची पूजा केली जाते. खरच खूप उत्साहाचे वातावरण असते . ऋतू बदल झालेला असतो पावसाळा संपून हिवाळ्यात प्रवेश केलेला असतो त्यामुळे शरीरात पण बदल झालेला असतो. वात पित्त कफ प्रकृतीत बदल झालेला असतो . आणि त्यामुळे शरीरात होणारे आजार टाळण्यासाठी उपास , आहार बदल, म्हणजे सात्विक आहार ,मानसिक शांती साठी पूजा ,ध्यान सांगितलेले आहे . वातावरण शुद्धीसाठी होम हवन ,यज्ञ सांगितले आहे. अतिशय शास्त्रीय आणि सहज कार्य प्रणाली आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत सांगितली आहे. पण...... आजची परिस्थिती कठीण आहे. नवरात्र उत्सव अतिशय उत्साहात साजरा होतो . दांडिया गरबा च्या तालावर आबालवृद्ध धुंद होऊन अतिशय आंनादात तल्लीन होऊन नृत्य करत असतो. गाणं कुठले आहे त्याचा थांगपत्ता नसतो.. फक्त तालावर तरुणाई धुंद होऊन नाचत असते. नवरात्री उत्सव हा अतिशय सात्विक ,धार्मिक आध्यात्मिक तसेच शांततेत शक्तीच्या उपासनेसाठी नवविधा भक्तीच्या माध्यमांतून करायचा असतो . मग त्या नवाविधा भक्ती मध्ये नृत्य, गायन भजन आलेच. पण याचा आता सरळ बदल करून कर्कश आवाजात *डी जे* , मोठाले लाऊड स्पीकर ,प्रचड गोंधळ करून साजरा करतात. आणि यात गाणे कुठले तर, *" मुझे प्यार हूआ अल्ला मिंया, हमे तो लूट लिया मिल के हुस्न वालोने, चारान्याचे बोंबील आणले काय ग् तूने केले* .... अश्या प्रकारची गाणी वाजवून धुंद होऊन मस्तीत दांडिया गरबा खेळत असतात. आणि हे कार्यक्रम करणारे तथाकथित धर्माचा ठेका घेतलेले लोक , राजकारणी आहेत. पण हे लोक हा विचार करीत नाही की याचा लहान मुलांवर काय परिणाम होईल. मित्रानो लक्षात घ्या सत्तेसाठी, रचलेले हे षडयंत्र आहे. मुद्दाम लोकांना भुलविण्याचे हे सुनियोजित कारस्थान असू शकते. आणि अश्या ठिकाणी विविध प्रकारचे दुकान मनोरंजन साधने उपलब्ध करून दिले असतात ह्या सर्वांकडून हप्ता ,पैसा गोळा केला जातो. अजून एक महत्वाचे सांगावयाचे वाटते की अतिशय विक्षिप्त कपडे परिधान करून ही तरुणाई आलेली असते. काही तरुण तर मद्यधुंद अवस्थेत असतात . त्यांना स्वतः ची ओळख नसते .लाज ,संस्कृती, घरच्या भिंतीच्या खुंटीवर टांगून ही लोक घरातून बाहेर निघतात . काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना या काळात जोश संचारतो आणि मग अशोभनीय विकृत अश्या घटना घडतात. आणि तुम्हाला सांगतो फक्त १० टक्के गुन्हे नोदविले जातात. शेकडा नव्वद टक्के प्रगटच होत नाही. आणि यामुळे याचे संपूर्ण आयुष्य बरबाद होते. आता तुम्हा म्हणाल तरुणांनी मजा करायची नाही काय? तर मी म्हणेल नक्कीच तो प्रत्येकाचं अधिकारच आहे. पण गरबा दांडिया रास करताना जे गाणे आहे ते अश्या प्रकारचे विकृत नव्हे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ काळ असतो. तुम्ही नक्कीच आनंद घ्या. पण आपल्या परंपरेची, संस्कृतीची जाणीव ठेवा.

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*