ध्येय, परिश्रम, आत्मशिस्त आणि देशसेवेचा प्रेरणादायी प्रवास आयपीएस अधिकारी डॉ. सुहास वारके यांची अविस्मरणीय मुलाखत लेखक : डॉ. जितेंद्र आत्माराम होले, पुणे स्थळ : जेएसपीएमचे राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे, पुणे कालावधी : नोव्हेंबर २०२६ एक अविस्मरणीय सकाळ, नोव्हेंबर २०२६ मधील ती एक प्रसन्न सकाळ होती. घड्याळाचे काटे सकाळचे दहा वाजल्याचे दर्शवत होते. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात त्या दिवशी एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य संचारले होते. प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी एका अत्यंत महत्त्वाच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण होता जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र, उच्चशिक्षित, कर्तव्यदक्ष आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व लाभलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी डॉ. सुहास वारके यांच्या मुलाखतीचा! कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण आधीच निश्चित करण्यात आले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास डॉ. वारके यांचे महाविद्यालयात आगमन झाले. अत्यंत साधे, सोज्वळ, शांत आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. वारके यांचे महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यांच्या व्यक्त...
Posts
Showing posts from November, 2026