Posts

Showing posts from August, 2026
 तासिका तत्त्व आणि अकरा महिन्यांची प्राध्यापक भरती — अपेक्षा कायमस्वरूपी, नोकरी मात्र अस्थिर! आज उच्च शिक्षण क्षेत्रात एक गंभीर आणि अस्वस्थ करणारे वास्तव वाढताना दिसत आहे—तासिका तत्त्वावर (CHB) आणि अकरा महिन्यांच्या करारावर प्राध्यापकांची नियुक्ती. ज्या शिक्षकाच्या खांद्यावर देशाची भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आहे, त्याच शिक्षकाच्या स्वतःच्या नोकरीचे भविष्य जर दरवर्षी अनिश्चित असेल, तर गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची अपेक्षा आपण नेमकी कोणत्या आधारावर करणार? विद्यार्थी पूर्णवेळ — शिक्षक तासिका तत्त्वावर? विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शैक्षणिक वर्षाची फी घेतली जाते. त्यांना गुणवत्तापूर्ण अध्यापन, प्रयोगशाळा, प्रकल्प मार्गदर्शन, संशोधन, mentoring, career guidance आणि रोजगारक्षम बनविण्याची अपेक्षा असते. मग एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो— विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्णवेळ असताना त्याचा शिक्षक मात्र तासिका तत्त्वावर का? प्राध्यापक म्हणजे केवळ वर्गात येऊन एक तास शिकवून निघून जाणारी व्यक्ती नाही. तो शिक्षक आहे, संशोधक आहे, मार्गदर्शक आहे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शिल्पकार आहे आणि संस्थेच्या...
 उच्च शिक्षण व्यवस्था : गुणवत्ता घसरतेय की व्यवस्था कोलमडतेय? लेखक : डॉ. जितेंद्र आत्माराम होले, पुणे उच्च शिक्षण हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे सर्वात मोठे साधन मानले जाते. परंतु आज अनेक स्तरांवर अशी चिंता व्यक्त केली जाते की काही ठिकाणी उच्च शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता घसरत आहे. ही टीका सर्व संस्था किंवा सर्व व्यक्तींना लागू नाही; मात्र जिथे या समस्या आहेत, तिथे त्या गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सर्वप्रथम, शिक्षणाचे राजकारण हा गंभीर विषय बनला आहे. काही ठिकाणी गुणवत्तेपेक्षा गटबाजी, पदांसाठी स्पर्धा, अंतर्गत संघर्ष आणि वैयक्तिक मतभेद यांचा शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असल्याची भावना निर्माण होते. "मान-सन्मान हा पदाला असतो; पद गेल्यावर मानही कमी होतो," अशी कटू अनुभूती अनेकांना येते. शिक्षक भरती ही पूर्णपणे गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर आधारित असावी, अशी अपेक्षा असते. रिक्त पदे दीर्घकाळ न भरणे, करार तत्त्वावरील शिक्षकांवर अवलंबून राहणे किंवा गुणवत्तेला पुरेसे प्रोत्साहन न मिळणे यामुळे संस्थात्मक क्षमता कमी होऊ शकते. अध्यापन आणि मूल्यांकन ही शिक्षण व्यवस्थेची दोन महत्त्वाची आ...
 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील Mechanical Engineering Board of Studies : दूरदृष्टी, नेतृत्व आणि जबाबदारी – डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे  (BOS Member, Mechanical Engineering,SPPU Pune, पश्चिम महाराष्ट्र प्रांत टोळी सदस्य, भारतीय शिक्षण मंडळ)  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) हे देशातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक असून त्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे १०७ ते ११७ अभियांत्रिकी महाविद्यालये कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ९९ महाविद्यालयांमध्ये Mechanical Engineering हा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या ९९ विभागांपैकी सुमारे १४ स्वायत्त (Autonomous) आणि ८५ अस्वायत्त (Non-Autonomous) महाविद्यालये आहेत. या व्यापक शैक्षणिक व्यवस्थेचे शैक्षणिक नेतृत्व करण्याची जबाबदारी Mechanical Engineering Board of Studies (BoS) वर असते. Board of Studies म्हणजे केवळ अभ्यासक्रम तयार करणारी समिती नव्हे, तर ती संपूर्ण Mechanical Engineering Program चे शैक्षणिक प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे. तिचे निर्णय हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, शेकडो प्राध्यापकांच्या अध्यापनावर आणि ...
 उच्च शिक्षणातील गुणवत्ता वृद्धीसाठी विद्यापीठाची 360° ऑडिट प्रणाली : काळाची गरज – डॉ. जितेंद्र आत्माराम होले (पश्चिम महाराष्ट्र प्रांत टोळी सदस्य भारतीय शिक्षण मंडळ) उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता केवळ उत्कृष्ट निकाल, आधुनिक इमारती किंवा सुसज्ज प्रयोगशाळांवर अवलंबून नसते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, संशोधनासाठी पोषक वातावरण, पारदर्शक परीक्षा व्यवस्था, सक्षम प्रशासन आणि उत्तरदायी आर्थिक व्यवस्थापन उपलब्ध करून देणारी संस्थाच खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण ठरते. या सर्व घटकांची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर व्यापक आणि बहुआयामी (360°) ऑडिट प्रणाली विकसित करणे ही आजची गरज आहे. आज बहुतेक विद्यापीठे संलग्न आणि स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक मार्गदर्शन करतात; परंतु केवळ संलग्नता देणे पुरेसे नाही. त्या महाविद्यालयांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता सातत्याने वाढत आहे का, विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये मिळत आहेत का, संशोधनाची संस्कृती विकसित होत आहे का आणि सार्वजनिक निधीचा योग्य वापर होत आहे का, याचे नियमित मूल्यमापन होणे आवश्यक आहे. ही भूमिका प्रभावीपणे पार पाडण्यासाठी ऑडिट ह...
 मोठेपणा पदाचा नसतो, तर मनाचा असतो (डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे) या जगात कोणाचेही कोणावाचून काहीच अडत नाही. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. त्यामुळे "माझ्याशिवाय काहीच होणार नाही" हा विचार हा वास्तव नसून अहंकाराचा परिणाम आहे. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते. प्रत्येक जण स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या समूहासाठी अनमोल असतो. मनुष्य हा समूहात राहणारा प्राणी आहे. त्याला मित्र, नातेवाईक, सहकारी आणि समाज यांच्यात राहणे आवडते. त्यामुळे प्रत्येकाचा एक स्वतंत्र सन्मान आणि अस्तित्व असते. प्रत्येक समूहात काही व्यक्तींना नेतृत्वाची संधी मिळते. गावात सरपंच, शहरात लोकप्रतिनिधी, शाळेत मुख्याध्यापक, महाविद्यालयात प्राचार्य, कंपनीत व्यवस्थापक, कार्यालयात अधिकारी, बँकेत शाखाप्रमुख—ही सर्व पदे जबाबदारीची असतात, श्रेष्ठत्वाची नाहीत. त्यांच्या नेतृत्वामुळे समूहाची प्रगती होते; परंतु त्या पदामुळे ते इतरांपेक्षा मोठे होत नाहीत. खरा नेता तोच, जो आपल्या लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होतो, त्यांच्या अडचणी समजून घेतो आणि प्रत्येकाला सन्मानाने वागवतो. लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी अधिकाराप...
 संघर्ष, गैरसमज आणि माझी भारतीयता डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे  संघर्ष माझ्यासाठी कधीच नवीन नव्हता. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर संघर्ष माझ्या समोर उभा राहिला. प्रत्येक वेळी त्याने माझी परीक्षा घेतली; पण मी त्याचे भीतीने नव्हे, तर अभिमानाने आणि आनंदाने स्वागत केले. कारण मला ठाऊक होते की संघर्ष माणसाला घडवतो, त्याला अधिक सक्षम, संयमी आणि परिपक्व बनवतो. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षापासून मी हिंदुत्वाचा प्रचार-प्रसार, भारतीय संस्कृतीचा अभ्यास आणि भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन व प्रसार करण्याचा प्रयत्न करत आलो आहे. हा प्रवास कधीच सोपा नव्हता. जेव्हा माझ्या वयाची मुले खेळण्यात रमायची, तेव्हा मी कीर्तन, भजन आणि संतवाङ्मय ऐकण्यात आनंद शोधत होतो. त्यावेळी मित्र, शेजारी आणि नातेवाईक मला "भजन्या" म्हणायचे. स्वदेशी विचारवंत राजीव दीक्षित यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी गोसेवेच्या कार्यात सहभागी झालो. तेव्हा काहींनी मला "गुराखी, ढोरक्या "  म्हणून हिणवले. भारतीय पंचांग, ज्योतिष, ग्रह-तारे आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करू लागलो, तेव्हा काहींनी मला "ब्रा...
 ९०% गुणांच्या विद्यार्थ्यांना शिकवणे — प्राध्यापक आणि संस्थेसमोरील मोठी जबाबदारी लेखक - डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे  (स्पष्टीकरण- हा लेख कोणत्याही विशिष्ट संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ, व्यवस्थापन, प्राध्यापक किंवा व्यक्तीला उद्देशून लिहिलेला नाही. उच्च शिक्षणाची गुणवत्ता, गुणवंत विद्यार्थ्यांचे योग्य मार्गदर्शन आणि प्राध्यापकांची शैक्षणिक जबाबदारी याबाबतचे हे सर्वसाधारण व सकारात्मक शैक्षणिक चिंतन आहे. या लेखातील कोणत्याही विधानाचा संबंध एखाद्या विशिष्ट संस्थेशी किंवा व्यक्तीशी जोडून त्याचा वेगळा अथवा वैयक्तिक अर्थ काढू नये. लेखाचा एकमेव उद्देश गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या विकासाबाबत सकारात्मक विचार मांडणे हा आहे.) जेव्हा एखाद्या महाविद्यालयात ९०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले गुणवंत विद्यार्थी प्रवेश घेतात, तेव्हा संस्थेसाठी ती निश्चितच महत्त्वाची उपलब्धी असते. पण इथेच संस्थेचे काम संपत नाही; खरे काम तर त्यानंतर सुरू होते. कारण अशा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ओळखून तिला योग्य दिशा देणे ही मोठी शैक्षणिक आणि नैतिक जबा...
*राक्षसी प्रवृत्तींचा संहार आणि स्त्रीशक्ती* सावधान! स्त्रीच्या सहनशीलतेला तिची कमजोरी समजू नका! इतिहास सांगतो—अत्याचाराचा अतिरेक झाला की ‘शक्ती’ जागी होते! (लेखक : डॉ. जितेंद्र आत्माराम होले, पुणे) इतिहासाची पाने उलटून पाहा. पुराणकथा वाचा. भारतीय संस्कृतीतील शक्तीची प्रतीके समजून घ्या. एक गोष्ट वारंवार समोर येते—जेव्हा अहंकार सत्तेच्या डोक्यात चढतो, जेव्हा अन्यायाला नियम समजले जाते, जेव्हा क्रौर्याला अधिकाराचे कवच मिळते आणि जेव्हा स्त्रीच्या सहनशीलतेला तिची कमजोरी समजले जाते, तेव्हा ‘शक्ती’ जागृत होते. ही शक्ती म्हणजे केवळ मंदिरातील मूर्ती नाही. ती दुर्गा आहे. ती काली आहे. ती चंडी आहे. ती चामुंडा आहे. आणि आधुनिक काळात ती अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभी राहणारी सामान्य स्त्रीसुद्धा आहे! भारतीय पुराणपरंपरेत महिषासुराचा अंत दुर्गेच्या हातून होतो. चंड-मुंडाच्या संहाराशी चामुंडेचे रूप जोडले जाते. रक्तबीजासारख्या अनियंत्रित दुष्टशक्तीसमोर कालीचे प्रखर रूप उभे राहते. शुंभ-निशुंभाच्या अहंकारालाही देवीशक्ती आव्हान देते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक राक्षसाचा वध केवळ स्त्रीनेच केला. पण भारतीय शक...