Benifits of Holistic Education

 *सर्वांगीण शिक्षणाचा फायदा - सर्वांगसुंदर श्याम चरित्र* 

लेखक डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे

@ Do not copy. All rights reserved ( Copy rights)

एक आटपाट निसर्गाच्या कुशीत ,सुंदर असे फैजपूर नगर होतं . तिथे श्याम नावाचं अतिशय हुशार मुलगा राहत होता. त्याचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. त्याचे अभियांत्रिकी चे शिक्षण सुरू होते. समाजकार्याची आवड असणाऱ्या श्यांम हा आपल्या मित्रांच्या सोबत सातपुडा पर्वताच्या कुशीत पर्यावरण प्रोजेक्ट करण्याकरिता गेला.सकाळी लवकर उठून ते जंगलात जाण्यासाठी निघाले पण रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली. पण नवीन शिक्षा धोरणाच्या अंमलबजावणी मुळे त्याचे multidisciplinary , interdisciplinary, vocational, skill development , extracurricular cocurricular activities झाल्यामुळे त्याला खूप काही विषयांचे ज्ञान होते . त्यामुळे त्याने बंद पडलेल्या गाडीला स्वतः दुरुस्त केले . गाडी जंगलाच्या दिशेने धावू लागली. रस्ता खडतर असल्यामुळे पुढे काही अंतरावर गाडी पंक्चर झाली. श्याम नी स्वतः गाडीतील extra असलेले टायर टाकून वेळ निभावून नेली. सगळे मित्र आनंदाने गाडीत बसले . गाडी वेगाने धावू लागली. गाडीत मनोरंजन कार्यक्रम सुरू केला श्यामला संगीताचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्याने अतिशय सुंदर गाणं म्हटले. तसेच नाटक , नकला पण छान केल्या खुपचं आनंदित वातावरण झालं होते. गाडी जंगलात पोहचली तिथे आदिवासी लोक भेटले त्यांना त्यांचीच स्थानिक भाषा येत होती . पण श्यामला local language, marathi ,hindi ,English भाष्यांचे ज्ञान असल्यामुळे त्याने आदिवासीं कडून माहिती जमा केली. नंतर श्याम आणि मित्रमंडळी प्रकल्पाच्या ठिकाणावर गेले. तिथे त्यांना तात्पुरते टेन्ट उभा करायचा होता श्यामला सिव्हिल इंजिनिअर चे ज्ञान असल्यामुळे त्याने ते कार्य पण पूर्ण केले. त्याच वेळी त्याने पर्यावरणाचा पण अंदाज केला आणि फॉरेस्ट ज्ञाना चा पण वापर करून सुरक्षित अश्या ठिकाणी आपला तात्पुरता निवास तयार केला. सगळ्या मित्रांनी टेन्ट मध्ये जाऊन आराम केला. पण त्याच वेळी एका मित्राला जखम झाली . आयुर्वेद चा अभ्यास असल्यामुळे जंगलातील काही वनस्पती आणून त्याच्या जखमेवर चोळ ल्यामुळे त्याला आराम वाटू लागला. वनस्पती ,जीव शास्त्र अभ्यासामुळे त्याच्या खूप अडचणी दूर झाल्या.

मित्रमंडळी प्रकल्पाच्या आराखडा तयार करून त्याच्यासाठी लागणाऱ्या अभियांत्रिकी च्या विविध शाखांचा कसा वापर करून आपला प्रकल्प पूर्णत्वास कसा नेण्यात येईल त्याबद्दल विचार विनमय झाला. नंतर मग प्रकल्प निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कार्य पद्धती आणि suitable मित्र नेमून कार्याची सुरुवात केली. प्रत्येक जण आपापली कामे अतिशय निष्ठेने ( Ethic and Value education) करू लागला. Extracurricular activities मुळे त्यांचे शरीर व योगामुळे मन मजबूत होते आणि त्यामुळे त्यांना कार्य सहज शक्य होत होते. प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यांनी वाणिज्य व management, advertising च्या ज्ञानाचा वापर करून पुढील निती तयार केली. झालं यशस्वी प्रकल्प करून ते परत आदिवासींना व काही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेटले. तिथे त्यांनी भारतीय ज्ञान परंपरा व जैविक शेती , प्राणी शास्त्र, पशू शास्त्र , पर्यावरण शास्त्र, ग्रामीण कला, परंपरागत व्यवसाय , समाजकारण , राजकारण, अर्थकारण, संस्कृती, आरोग्यशास्त्र, गोविज्ञान, ग्राम रचना शास्त्र, आहारशास्त्र, ज्योतिष्य/ खगोल शास्त्र, जमीन शास्त्र, जलशास्त्र, अग्नी शास्त्र, आकाश शास्त्र, वायू शास्त्र अश्या विविध विषयांवर चर्चा व ज्ञान देवाण घेवाण केली.मुलांनी अतिशय आनंदाने ज्ञान ग्रहण केले. आत्मसुख स्वर्ग सुखअनुभवताना मुलांच्या चेहऱ्यावर समाधान होत. परिपूर्ण होऊन आपापल्या घरी गेले.

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*