*शुरवीर योद्धा व आत्मनिर्भर शिक्षक आजच्या काळाची गरज*

 *शुरवीर योद्धा व आत्मनिर्भर शिक्षक आजच्या काळाची गरज*


हो शूरवीर योद्धाच शिक्षक असे का म्हणतो मी कारण शिक्षक आज अस्तित्वाची , जगण्याची लढाई करीत आहे. लढाई कुणा विरुद्ध तर शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकांशी अत्यंत जिकरीने लढत आहे. या लढाईत त्याला अत्यंत कुशलतेने आपले सर्वस्व पणाला लावून लढाव लागतंय.🙏

शिक्षकांचा आर्थिक विकास व्हायलाच पाहिजे . त्या विकासावरच त्याचे कुटुंब निर्भर असते. मी माझ्या बुध्दी प्रमाणे एक research paper तयार केलेला आहे. कृपया आपण मार्गदर्शन करावं व आपली मते सुचवावी🙏🙏🙏

                            

आपण जर क्रय व निर्माण करण्याची क्षमता असलेले प्रामाणिक , विनयशील व अतिशय उत्तुंग विचार करणारे आहोत तर मग आपल्याला अर्थशास्त्र व आर्थिक अडचणी ची घडी घालून त्यावर संतुलित समृद्ध विचार करून आपला मार्ग शोधण्याची आज गरज आहे. मग त्यासाठी काय करावे!

माझ्या मनात आलेली संकल्पना आपल्या समोर मांडतो.

आत्मनिर्भय भारतासाठी आत्मनिर्भर शिक्षक . आज प्रत्येक शिक्षकाला आत्मनिर्भर शिक्षक समाज होण्यासाठी प्रयत्न कष्ट करून कल्पना ,योजना, क्रयशक्ती, निर्माण शक्ती , संकल्पना समजावून घेणे देणे ची वेळ आज आलेली आहे. माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या कल्पना, परिकल्पना, संकल्पना, योजना शिक्षक समाजापुढे मांडाव्यात व त्याचा प्रत्यक्ष अवलंब करून आपली व समाजाची ,देशाची आर्थिक प्रगती साधून अडचणींना सामोरे जावून विकासच्या , प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकावे . 

धन्यवाद


                                         आपला

                            डॉ. जि. आ. होले.

                               प्राध्यापक, पुणे.

                            (९८६०६५९२४६)

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*