*शिक्षणातील विविधता - सुंदर आणि आत्मनिर्भर जीवन ( सर्वांगीण शिक्षणाची गुरुकिल्ली नवीन शिक्षा निती )

 *शिक्षणातील विविधता - सुंदर आणि आत्मनिर्भर जीवन  ( सर्वांगीण शिक्षणाची गुरुकिल्ली नवीन शिक्षा निती )*

@लेखक डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे

९८६०६५९२४६

@ All rights reserved

Please circulate with name


एक आटपाट नगर होतं त्या नगराच नाव फैजपूर  . सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या सुंदर वनराई ने नटलेल्या निसर्ग देवतेचे वरद हस्त लाभलेल्या शहरामध्ये श्याम नावाचा एक गृहस्थ राहत होता. त्याचे पूर्ण शिक्षण हे नवीन शिक्षा निती प्रमाणे झाले होते . भारतीय ज्ञान परंपरा व ग्रंथ , लेखन याचे त्याला ज्ञान होते. त्यामुळे तो अगदी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून योग, प्राणायाम , आसन , व्यायाम ,ध्यान,धारणा करीत   असे. त्यानंतर थोडा वेळ भारतीय तत्वज्ञान चा वाचन करीत असे.  आपले जीवन तो अतिशय साध्या पद्धतीने प्रामाणिकपणे व्यतीत करत होता. स्वतः चे घर बांधताना त्याने आपल्या वास्तुशास्त्र ,  अभियांत्रिकी , रचना शास्त्र याचा वापर करून प्रत्यक्ष स्वतः च्या नियंत्रणाखाली बांधून घेतले होते. घराच्या परिसरात जैविक शेती, आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड केली. 

आपला व्यवसाय सोबत श्याम धार्मिक आध्यात्मिक सामाजिक काम पण अतिशय आनंदाने उत्साहात करीत असे. असेच एके दिवशी त्याची मुले आणि त्यांचे मित्र मंडळी खेळत होती. श्यामने त्यांना खेळाबद्दल काही माहिती विचारली , मुलांनी पण आनंदाने प्रश्नांची उत्तरे दिली व उलट श्यामला पारंपरिक खेळ व त्यांची माहिती विचारली .

श्यामने त्या मुलांना ग्रंथ पुराण यामध्ये दिलेले खेळ शिकविले व  पुराण , ग्रंथ या मध्ये असलेला गोष्टी सांगितल्या. त्यांचा उपदेश व उद्देश स्पष्ट केला. तसेच त्यामध्ये असलेले सायन्स व शास्त्रोक्त ज्ञान सांगितले. 

गोष्टी एकल्यानंतर मुलांना खूप आनंद झाला. आणि खूप भूक पण लागली . श्यामने त्यांना  अतिशय रुचकर पदार्थ खायला दिले . मुलांना पण ते आवडले आणि तृप्त होऊन आनंदाने नाचू लागले. अश्या प्रकारे अतिशय आनंदात मजेत दिवस गेला.

 घरी जाण्यापूर्वी श्यामने मुलांना सांगितले की उद्या सकाळी आपण सातपुडा पर्वताच्या शिखरावर फिरायला जाऊ , सर्वांनी आपले डबे व पाण्याची बाटली घेऊन यायची आहे. मुलांनी आनंदाने होकार दिला आणि  आनंदात घरी गेली.


सकाळ झाली सर्व मूल तयारी करून आली. श्यामनी पण गाडी काढली आणि मुलांना घेऊन तो सातपुड्याच्या दिशेने जाऊ लागले. वाटेत गाणी , भेंड्या नृत्य इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम करत ते सातपुड्यात पोहचले. आजूबाजूचा जंगल प्रदेश बघत ती सर्व पायवाटेने चालू लागले थोडे अंतर चालून झाल्यावर त्यांना एक गाव लागले. ते जंगलातील गाव होते तिथे अतिशय साधी भोळी सरळ आदिवासी लोक राहत होती श्यामला त्यांची प्रादेशिक भाषा येत होती त्यामुळे त्याला त्यांची माहिती घेऊन ती मुलांना सांगू शकत होता. गावातील काही आदिवासी लोक त्यांच्या सभोवताली जमा झाले व त्यांची परंपरा , उत्सव, संगीत , नृत्य , जंगला विषयी माहिती , वन्य प्राण्यांची माहिती , वनौषधी , अन्न पदार्थ, जंगली हत्यार, सुरक्षा कार्य पद्धती, कपडे , घरातील वास्तू शास्त्र  व त्यांचे आपआपसात होणारे आर्थिक व्यवहार यांची संपूर्ण माहिती ही श्यामने समजून घेतली आणि ती नंतर मुलांना सांगितली . मुलांना अतिशय आनंद झाला व आज काहीतरी विशेष ज्ञान प्राप्त झाल्याचे समाधान झाले.


दुपार झाली होती मुलांना भुक लागली होती , एक छान मोठ झाड पाहून त्या झाडाखाली गोल रिंगण करून जेवायला बसले . गावातील लोकांनी रानमेवा व सुमधुर फळांचा रस आणून दिला . मुलांनी अतिशय आनंदाने सर्व पदार्थ फस्त केले.

त्यानंतर श्याम नी मुलांना सांगितले की

आपल्याला सर्वांना रामायणातील कथा माहितीच आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. 

माता कैकायीच्या आग्रहास्तव दशरथ राजाने वचनस्तव श्रीरामाला १४ वर्ष वनवासात जाण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे श्रीरामाने अतिशय विनम्रपणे वडिलांचे वचन आदेश पाळत वनवासात जाण्याचा निर्णय घेतला(Value Education). आता १४ वर्ष वनवासात राहणे  म्हणजे मोठे दिव्यच होते पण गुरू वशिष्ठ यांनी गुरुकुलात  दिलेल्या ज्ञानाचा खूप फायदा झाला. श्रीराम आपल्या पत्नी आणि भावासोबत वनवासाला निघाले तेव्हापासून ते परत १४ वर्षानी परत अयोध्येला परत आले तिथपर्यंत बरेच असे प्रसंग आले. त्यावेळी श्रीरामांनी अतिशय कुशलतेने आपल्या ज्ञानाचा वापर केला. मित्र निषाद राजा सोबत चे मित्रसंबंध , संघटन कौशल्य तसेच जंगल ज्ञान, सुरक्षा ज्ञान , कुटी बांधण्यासाठी ज्ञान , वनस्पती शास्त्र, जीव शास्त्र , आरोग्यशास्त्र, शेती शास्त्र , हवामानशास्त्र, खगोल शास्त्र ,धातू शास्त्र , रचना शास्त्र , विविध भाषा ज्ञान, प्रादेशिक भाषा ज्ञान, संस्कृत भाषा , संभाषण कौशल्य , शरीर शास्त्र, मानसिक शास्त्र , पंचामहाभूत शास्त्र,  युद्ध शास्त्र   या ज्ञानाचा उपयोग केलेला दिसून येतो .  आणि पुढे रावणाने माता सीतेचे हरण केल्यानंतर प्रभू हनुमंताला आणि सुग्रीवला भेटले त्यावेळेस त्यांचे राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र , संघटन शास्त्र, रचना शास्त्र या आणि अश्या अनेक विषयांचा अभ्यास असल्याचा अनुभव येतो. पुढे जेव्हा राम रावण युद्ध झाले त्यावेळी युद्ध शास्त्र ,

राजनीति ,सैनिकांसाठी आहार शास्त्र , आरोग्य शास्त्र, खगोल शास्त्र  या शाखेमध्ये  फिजिक्स केमिस्ट्री गणित, ग्रह तारे नक्षत्र, ज्योतिष्य, ऊर्जा, जीवशास्त्र, आयुर्वेद , युद्ध शास्त्र, अणू शास्त्र, धातू शास्त्र, manufacturing process, metallurgy, material science, विमान शास्त्र,  या आणि अश्या अनेक विषयांचा शास्त्रोक्त अभ्यास केला असला पाहिजे म्हणून तर प्रभू श्रीरामांनी  रावणावर, लंकेवर विजय मिळवला 🙏

मुलांनो बर का! विमान शास्त्र या भारद्वाज ऋषी च्या पुस्तकात ४१ प्रकारचे विमान चां उल्लेख आढळतो. त्यामध्ये अगदी बेसिक पासून, material science, metallurgy, production, assembly , manufacturing, environmental,thermal ,Design, earth sciences, या आणि अश्या अनेक विषयांचा समावेश आहे. तसेच विमनामध्ये बसल्यानंतर कपडे, अन्न , पाणी , आजार, हवा वेळ याची पण सखोल माहिती दिलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*