*भंडारा डोंगर देहू पुणे : एक सुखद अनुभव*
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
आज दिनांक १८ डिसेबर २०२२ रविवार सकाळी ६ वाजता नेहमीच्या सवयीप्रमाणे भंडारा डोंगर देहू पुणे येथे पोहचलो. सकाळचं वातावरण अतिशय प्रसन्न आल्हाद दायक , थंड गार वारा ,हवा, मनाला प्रफुल्लित आनंदित करणारे मंत्रमुग्ध होत . निसर्ग देवतेची अगणित कृपा असलेल्या भंडारा डोंगरावर एका उंच सपाट ठिकाणी मी माझी सतरंजी अंथरली आणि प्राणायाम करू लागलो . योग प्राणायाम करताना स्वर्गीय आनंद ,सुखाचा अनुभव येत होता. मी अतिशय प्रफुल्लित आनंदित होऊन तिथल्या स्वर्गीय वातावरणाचा आनंद, अनुभव घेत होतो.
थोड्या वेळानं मला मंदिराच्या आवारातून टाळ मृदंगचा आवाज येऊ लागला. मी थोड्या वेळानं मंदिरात गेलो. पण आश्चर्य असे की कर्मधर्मसंयोगाने म्हणा आमच्या गावाकडील लोक तिथे पारायणाला आले होते . त्यामध्ये ५० वर्षावरील ६० टक्के व खालील ४० असे लोक म्हणजे त्यात स्त्री पुरुष होते. आणि साक्षर निरक्षरचे प्रमाण ८०: २० होते. संगणक साक्षर निरक्षर चे प्रमाण २०: ८० असे होते.
मी तिथे पोहचल्यावर आपले मित्र गावाकडील लोक बघून मला अतिशय आनंद झाला. मी त्यांच्याशी अतीशय आपुलकीने बोलू लागलो आणि बघितलं तिथली व्यवस्था अतिशय सुंदर होती . मंडपामध्ये एक छान सुंदर असे व्यासपीठ तयार केले होते. समोर लोकांच्या पारायण साठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येकाला सहज वाचन करता येईल व सुलभ बैठक सोबत प्रकाश आणि हवा , पाणी याची काळजी घेतली होती. पारायण सुरु झाले. स्त्री पुरुष पारायणला बसले . पण आमचे काही मित्र हे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात गुंग झाले. काही स्त्रिया स्वयंपाकाची तयारी करू लागल्या . विशेष म्हणजे त्यांनी संपुर्ण स्वयापकाची भांडी , सामान , धान्य , भाजीपाला व इतर सर्व साधनाची अतिशय व्यवस्थित नियोजन केले होते.
थोड्या वेळानं जेवण तयार झालं व सोबतच पाठीमागे पारायणाचे प्रथम सत्र पण संपले. सगळ्या मंडळींनी हातपाय धुवून जेवायला बसले मी पण त्यांच्या सोबत जेवायला बसलो. अतिशय सुंदर रुचकर ,चविष्ट असं जेवण बनले होते.मी यथेच्छ ताव मारला . अगदी रोज पेक्षा अधिक जेवण केले. नंतर मंडळी थोड्या विश्रांती साठी गेली आणि मी पण घराकडे मार्गस्थ झालो.
Comments
Post a Comment