*सरपंचाची निवड कशी करावी*

*आपले व आपल्या गावाचे भविष्य म्हणजे सरपंच निवड*


सरपंचाची निवड ही सामान्य नागरिकाच्या मतांच्या आधारावर होणार आहे . पण आपण सरपंच निवडताना काही महत्वाची बाबींचा विचार करायला पाहिजे की ज्याची आपण निवड करणार आहे त्याला आपल्या समाजाबद्दल लोकांबद्दल , तिथल्या पंच महाभुत म्हणजे , जमीन, पाणी, हवा,( Environment) , अग्नी ( वातवणातील तापमान, दाब) आणि आकाश ( म्हणजे आकाशात होणारे बदल व त्यामुळे होणारे परिणाम) ह्या गोष्टींचा अभ्यास . 

*आपल्याला हसू येईल की काय अपेक्षा की सरपंचाला पंचमहाभूतांचे ज्ञान पाहिजे ?* पण मित्रांनो हसण्यावर नेऊ नका . माझा उद्देश हाच आहे की त्याला तिथल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा माहिती , अभ्यास पाहिजे. 

*मूल्य शिक्षण* त्याला अवगत पाहिजे . परत इथे कठीण शब्द मूल्यशिक्षण म्हणजे त्याला प्रामाणिकता, विनम्रता कर्तव्य दक्षता ,कष्टाळू पण, चिकाटी , प्रेमळ ता , उदारता ,सहिष्णूता , सेवाभाव, सर्वधर्मजाती समानता इ. असे गुण अंगीभूत हवेत.

त्याच्याजवळ दूरदृष्टी, विचारक्षमता , कल्पना रचना चुतुरता , व्यवस्थापनता , आणि महत्वाचे म्हणजे विश्वासप्राप्तता . 


सर्व जण हिताय व सर्व जण सुखाय हि भावना व्यक्त करून काही माफक अपेक्षा

राजकारणात, समाजकारणात आहेत याचा अर्थ समाज जागृती, प्रबोधन समाजकार्य विकास या भावनेने . गावातील वंचित लोकांसाठी ,गरीब ,असहारा,वृध्द, अनाथ,अपंग,निराधार लोकांसाठी व त्यांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा देण्यासाठी, नागरिकांचा मानसिक, शारीरिक, अध्यात्मिक विकास करण्यासाठी. गाव हे कुटुंब व गावातील प्रत्येक व्यक्ती सभासद. त्यांचा विकास करण्याची जबाबदारी प्रमुखाची. प्रत्येक नागरिक सुख , समाधान, शांती ऐश्वर्य समृध्दी पूर्वक जगण्याची जबाबदारी प्रमुखाची. न्याय, सुरक्षा,मूलभूत. सुविधांची जबाबदारी प्रमुखाची.

ग्रामविकास होण्यासाठी अपेक्षा पुढीप्रमाणे. 

आदर्श ग्रामासाठी कार्य

१) मूलभूत सुविधां( अन्न सुरक्षा, वस्त्र,निवारा)

२)मूलभूत शिक्षणाची सुविधा

३)सार्वजनिक वाचनालय

४)मूलभूत आरोग्य सुविधा

५)सुंदर अत्याधुनिक सार्वजनिक बगीचा 

६)शेती तक्रार व सल्ला, संशोधन कार्यालय

७)न्याय व तक्रार निवारण केंद्र

८) आत्मनिर्भर ग्राम केंद्र

९) योग ,व्यायाम ,खेळ सुविधा

१०)रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मदत केंद्र

११) रस्ते ,लाईट, दुतर्फा झाडं ,वृक्ष संवर्धन

१२)नागरिक मदत केंद्र

१३) कन्या व महिला सबलीकणासाठी कार्य

१४) गरीब, अशिक्षित,असहरा,अनाथ, वृध्द लोकांसाठी कार्य 

१५) आपत्ती व्यवस्थापन व निवारण केंद्र.

१६)शेती पूरक व्यवसाय व इतर व्यवसाय प्रोत्साहन, संवर्धन व संरक्षण केंद्र

१७)साक्षरता केंद्र

१८) डिजिटल अवेयरनेस व मार्गदर्शन केंद्र

१९)शेती भाव व इतर व्यवसाय हमी भाव 

२०) हुशार विद्यार्थी , विशेष कार्य करणारी नागरिक प्रोत्साहन पुरस्कार

२१) संस्कार केंद्र

२२)भारतीय संविधान अभ्यास केंद्र

२३) अर्थ वाढि करता योजना

२४)शेजारी गांव मित्र संवर्धन योजना

२५)ग्रामविकास वार्षिक प्लान

वरील कार्य पूर्णत्वाचा विचार आणि अभ्यास करणाऱ्याला च मतदान करावे व निवडून आणावे. 

अन्यथा पुढील वर्ष आपणासाठी व आपल्या भविष्यासाठी धोक्याची असतील. 


 डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*