*माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण: ब्लॉसम पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन*
*प्रा.डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे(M. Tech, PhD)*
दि. २३/१२/२०२२ संध्याकाळी माझ्या मुलीचा परफॉर्मन्स बघण्यासाठी आम्ही सहकुटुंब सहपरिवार शाळेत गेलो.संध्याकाळचे प्रसन्न वातावरण होते शाळेच्या आवारात प्रवेश केल्यावरच लहान लहान मुलांनी आमचे नमस्कार करून स्वागत केले . अतिशय सुंदर गोड लहान लहान हात जोडून काही मुले हात पुढे करून स्वागत करीत होते. धुंद वातावरण होते. काही मुलांनी हातामध्ये विविध स्वनिर्मित वस्तू घेतल्या होत्या. काहींनी फुलांचे गुच्छ हार परिधान केले होते. त्याच्या वासाने वातावरण अतिशय प्रसन्न आल्हाद दायक आनंदित झाले होते.
आम्ही मंडपात प्रवेश केला. समोर भव्य असे स्टेज केले होते समोर दोन डिजिटल टीव्ही दिसत होते . अतिशय प्रकाशाचा झगमगाट आणि गाण्याचा सुमधुर आवाजात आम्ही बसलो व कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघत होतो.
थोड्या वेळाने कार्यक्रम सुरू झाला प्रथम गणेश वंदना सुरवात झाली. सुरवात तर छान झाली नंतर मग एक एक अँकर आपले कसब दाखवू लागला. आम्ही प्रचंड आश्चर्य चकित झालो की एवढे लहान मुले एवढी सुदंर आणि स्पष्टपणे व्यवस्थीत स्वच्छ शब्दांमध्ये कसे बोलू शकतात? पण हे खरं होत. लहान लहान मुले अप्रतिमपणे कार्यक्रमाची धुरा सांभाळत होती. सहा लहान मुले अगदी व्यवसायिक वक्त्याप्रमाणे आपली मते व कार्यक्रमाचे सादरीकरण करीत होती. कार्यक्रमाला रंगत येत होती. भारताचा स्वर्णीम, गौरवशाली इतिहास अतिशय सुंदर पणे , व्यवस्थित पद्धतीने सादर केला. *विश्वास बसत नव्हता की आपण लहान मुलांच्या स्नेहसंमेलनात आलो आहे.* त्यानंतर *ओडिसी नृत्य, पंजाबी भांगडा, तमिळ तेलुगू नृत्य, लावणी, पोवाडा, बंगाली नृत्य* इत्यादी कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने सादरीकरण केले.
*खर तर त्या मुलांना व शिक्षकांना याचे पूर्णपणे श्रेय द्यायला पाहिजे .* शिक्षक खरंच पुरस्कारास प्राप्त आहे की त्यांनी मुलांकडून एवढी मेहनत करून घेतली.
पालकांनो विचार करा एक महिन्यापूर्वी तुमचं मुलगा मुलगी आणि आज रोजी तुमचा मुलगा मुलगी यांच्यात काय बदल? तर त्या शिक्षकांनी मुलांना कॉन्फिडन्स , competent , स्टेज डेरिंग , मित्र भावना , उत्साह, आनंद , प्रेरणा एका शब्दात सांगायचं झालं तर मूल्यशिक्षण तुमच्या मुलाच्या अंगीभूत आणले .
*माझ्या आतापर्यंतच्या २५ वर्षाच्या शिक्षिकी जीवनात मी इतका सुंदर स्वच्छ,नीटनेटका, नाविन्यपूर्ण, व्यावसायिक सारखा, मनाला मंत्र मुग्ध करणारा कार्यक्रम बघितला नाही .* सर्वच पालक अतिशय भरभरून शाळेचं , शिक्षकाचे कौतुक करीत होते आणि आनंदविभोर होऊन आपल्या पाल्याच कौतुक करून स्वतःला धन्यता देत होते. कार्यक्रमाची सांगता झाली आणि आपआपल्या पाल्यांना घेऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न बघत घरच्या वाटेला लागली.
🎉आनंदात होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता दिसली. मुलाच्या कर्तुत्वाचा अभिमान आनंद स्पष्ट चेहऱ्यावर दिसत होता
*तात्पर्य: गुरू, शिक्षकांमध्ये एवढी शक्ती , सामर्थ्य असते की जसे कुंभार मातीला आकार देऊन घडा किंवा वस्तू तयार करतो त्याच प्रकारे शिक्षक हे कच्च्या मुलाला शिक्षणाचा, ज्ञानाचा आकार देऊन त्याला घडवतो. आणि अश्या प्रकारच्या कार्यक्रमातून शिक्षक हे भविष्यातील थोर कलाकार , राजकारणी, समजासेवक, व्यापारी, उद्योजक, इत्यादी विशेष म्हणजे भारतीय घडविण्या चा सुंदर , भक्कम पाया तयार करतात.*
Comments
Post a Comment