*सत्य कथा*
*जैसी करणी वैसी भरणी*
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
संध्याकाळची वेळ होती प्रत्येक जण कामाहून घरी आले होते किंवा काही येत होते. शेजारच्या सोसायटीतील
राजेंद्र आणि विशाखा एक वेगळाच अनुभव अनुभवत होते आणि त्यांनी केलेल्या सर्व घडामोडी लोक बघत होते. !!!!!!!!
शेवटी राजेंद्र आणि त्याची पत्नी विशाखा हिने सुटकेचा श्वास सोडला त्याला कारणही तसेच होते त्यांनी त्याच्या आईला वृद्धाश्रमात ठेऊन आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विजेतेपदाची अभिमानाची झलक दिसत होती. वृध्द आईच्या यातानांवर आपल्या सुखाची पोळी भाजण्याचे समाधान दिसत होते. राक्षसाला देखील वाईट वाटेल असे कृत्य करून ही जोडी आपल्या नित्य क्रमाला लागली . हे सर्व त्यांचा मुलगा आनंद बघत होता तो कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला होता. आनंद अभ्यासात हुशार होता त्यांनी परीक्षेत यशस्वी होऊन परदेशात जाण्यासाठी परीक्षा सुद्धा उतिर्ण केली होती. परदेशातील शिक्षणासाठी जाण्यासाठी असलेल्या विविध प्रकारच्या अडचणी दूर करून तो अखेर परदेशात गेला. पण इकडे आई वडील यांचे हृदय कासावीस होत होते आणि अनेक प्रकारचे विचार डोक्यात येत होते. आनंद जर परत आला नाही तर ? त्याने तिकडेच लग्न केले तर? एक ना अनेक असे प्रश्न मनात येत होते? फोन वर दररोज बोलणं होतं होते. तेवढ्यावर समाधान मानत होते. पण एक दिवस अचानक आनंद ने बातमी सांगितली मी एका जर्मन मुलीशी लग्न केले आणि मी एकडेच स्थायिक होणार आहे. हे ऐकून त्यांच्या पायाखाली ल जमीन सरकली. प्रचंड धक्का बसला . दुःखाने वेदनेने त्यांनी आनंदला विचारले आम्हाला विचारले पण नाही ? आमच्या भावनां चा विचार पण तू केला नाहीस. अतिशय वेदनेने विव्हळत दोन्ही खाली बसले तोच एक फोन आणि मेसेज आला वृद्धाश्रमातून . तुमच्या आईचा मृत्यू झाला आज तेरावा दिवस आहे. त्यांच्या इच्छेनुसार काही वस्तू आहे त्या तुम्ही घेऊन जाव्या.
झाले ! डोळ्यासमोर आईला दिलेली वागणूक तिरस्कार आठवत होता. शेवटचा अधिकार सुद्धा त्याला दिला नव्हता. मुलाच्या वेदना , आईचे दुःख दोघांना सहन होत नव्हते. तोच राजेंद्र जोरात हृदय विकाराचा झडका आला आणि तो विव्हळत खाली पडला. आणि काही कळायच्या आतच तो गतप्राण झाला. काळाची महिमा ! विशाखा एकटीच राहिली. सुन्न डोक्यानी बेभान स्थितीत खाली बसली आणि कोंनाच्या तरी मदतीची याचना करीत राहिली. पण तिने काहीतर पुण्य केले असतील म्हणून सोसायटी तील लोकांनी एकत्र येऊन व दया येऊन पुढील कार्यक्रम लागले.
Comments
Post a Comment