परदेशी विद्यापीठ आव्हाने आणि संधी?*
*परदेशी विद्यापीठ आव्हाने आणि संधी?*
प्रा.डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
(9860659246)
Email - jahole1974@gmail.com
आजकाल सगळीकडे या विषयावर चर्चा आणि चर्चासत्र सुरू आहे. शिक्षणतज्ञ आपापली मते मांडीत आहे. आपली विचारधारा , मतप्रवाह प्रगट करीत आहेत. चांगली गोष्ट आहे की या विषयावर विचार मंथन व्हायलाच पाहिजे. पण हे विचारमंथन उच्च पदस्त अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक स्तरावरील लोकांचे व्हायला पाहिजे. आणि टेबल वर किंवा स्टेज वर नव्हे तर लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा चर्चेच्या माध्यमातून विचार मंथन व्हायला पाहिजे.
परदेशी विद्यापीठे भारतात येत आहेत हे आव्हान आहे का संधी?
माझ्या मते दोन्हीही. परदेशी विद्यापीठांचे भारतात स्वागतच आहे. पण आपण आव्हान आणि संधी या दोन्ही बाजूंचा विचार करू.
आव्हाने -
१)भारतीय शिक्षा नीतीचे अवलंबन करणार आहे का?
२)विद्यापीठातील उच्च पदस्थ अधिकारी व विद्यार्थी यांचे प्रमाण कसे असेल?
३)विद्यापीठाचे धोरण, उद्देश सुरक्षितता कशी असेल?
४)स्थानिक किंवा भारतीय नोकरी चे प्रमाण कसे असेल?
५)विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्ता आधारावर सर्व मान्य परीक्षेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे.
६)विद्यापीठाची गुणवत्ता ही मुख्य विद्यापीठा सारखीच असायला पाहिजे.
७)विद्यापीठाची गुणवत्ता कार्यप्रणाली ही कोणत्या आधारावर होणार आहे याचे पूर्णपणे शास्त्रीय दृष्ट्या प्रगट केले असावे
८)परदेशी विद्यापीठे आणि भारतीय विद्यापीठे यांचे समन्वय असायला पाहिजे
९)परदेशी विद्यापीठात शिक्षण समाज उपयोगी असायला हवे.
१०)जागतिक मूल्यांकन असलेल्या विद्यापीठाचे आगमन व्हायला पाहिजे
११)विद्यापीठाची कार्यपध्दती ,नियम ,रूपरेखा, वाणिज्य विषयी आराखडा, आर्थिक सांस्कृतिक आराखडा , सामाजिक राजकीय सांस्कृतिक उद्देश या सर्व बाबींचा विचार करायला हवा.
१२)विद्यापीठ हे शहराजवळ किंवा गावाजवळ होणार आहे किंवा याचे लोकेशन हे ग्रामीण भारतात असेल की शहरी भागात त्या दृष्टीने सवलत व सुविधा देण्यासाठी प्रयोजन.
१३)गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सवलत
१४)परदेशी विद्यापीठ आल्यानंतर भारतीय विद्यापीठा वर होणार परिणाम.
१५)भारतीय विद्यापीठातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आर्थिक सक्षमतेकडे पलायन .
१६)आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या
विद्यार्थ्याचे परदेशी विद्यापीठ मध्ये प्रवेश.
१७)आर्थिक सक्षम आणि दुर्बल गट तयार होण्याची शक्यता.
१८)भारतीय विद्यापीठांची परदेशी विद्यापीठांशी गुणवत्ता आधारित तुलना.
१९)राजकीय आर्थिक सांस्कृतिक, हस्तक्षेप.
२०)भारतीय शिक्षा नीती मध्ये सांगितल्या प्रमाणे अकॅडमिक केंदित विद्यापीठ की संशोधन केंद्रित विद्यापीठ असेल याबद्दल खुलासा
आता आपण संधी चा विचार करू
१) जागतिक पातळीवर असलेले उच्च तंत्रज्ञान शिक्षण मिळेल
२) जागतिक पातळीवर असलेले शिक्षण , शिक्षक , विद्यार्थी यांचे ज्ञान , संशोधन बुद्धिमत्ता देवाण घेवाण करण्याची संधी असेल
३) जागतिक पातळीवर स्पर्धा ही समाज उपयोगी असेल
४) देशाचा आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक वैचारिक विकास होईल
५) ग्रामीण ,शहरी भागातील सामान्य मुलांना आतंरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल
६) शैक्षणिक , शेतीविषयक , आरोग्यविषयक, किंबहुना सर्वच सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक स्तरावरील समस्यांच समाधान होऊ शकेल
७)वैचारिक पातळी उंचावेल
८)संशोधन वातावरण तयार होईल
९) संशोधनातील सवलती ,ज्ञान, गुणवत्ता स्तर उंचावेल
१०) शिक्षणाचा ,ज्ञानाचा ,संशोधनाचा फायदा होईल.
११) आर्थिक , मानसिक वैचारिक ,सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक बळकटी मिळेल.
१२) निरक्षरता प्रमाण कमी होईल
१३) संगणक साक्षरता वाढेल
१४) अभियांत्रिकी ,मेडिकल, फार्मसी या व इतर व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा सुधारेल
१५) पर्यावरण , पृथ्वी , हवा, अग्नी आकाश पाणी म्हणजेच पंचमहाभूते यांच्यावर सर्वमान्य शिक्षण व संशोधन जेणे करून जी भविष्यातील समस्या उदा. भूकंप,वादळ, पुर, महामारी ई. यावर उपाय करता येईल. तसेच यांचे
शास्त्रीय दृष्ट्या, तंत्रज्ञान युक्त शिक्षण करता येईल.
धन्यवाद .
Comments
Post a Comment