*हिंदुत्व*


@डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे


हो मी हिंदूच आहे. माझा जन्म ही हिंदूच्या घरात झाला . आणि मृत्यू ही हिंदूच्या घरात होईल . मला मी हिंदू आहे हे कोणाला सांगायची गरज नाही . किंवा हिंदू आहे हे सिद्ध करण्याची गरज नाही . माझ्या रक्तात हिंदुत्व  आहे. हिंदू संस्कृतीत मी जगतो. जात , धर्म ,वर्ण,भाषा मी मानत नाही. जन्माने कोणी श्रेष्ठ होत नाही तर कर्माने होतो. भागवत गीता ज्ञान जगण्याची कला शिकविते. हिंदु संस्कृतीत जगणे म्हणजे काय, तर, देवाचं अस्तित्व मानणे . 


हिंदू धर्मातील वेद, पुराणे, उपनिषद्, गीता, ग्रंथ, इतिहास (रामायण, महाभारत), पूजा, यज्ञ, किंवा हिंदू धर्मातील असलेल्या प्रत्येक देवतेचे अस्तित्व व त्यांचे निसर्गाशी असलेले नात किंवा त्यासंदर्भात असलेले विज्ञान यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे हिंदुत्व होय.


मी कोणत्याही राजकीय ,सामजिक, धार्मिक , आध्यात्मिक पक्षाशी संबंधित नाही. पण माझा प्रचंड विश्वास आहे. हिंदू धर्मात असलेले विज्ञान,ज्ञान आणि पंचमहाभूते यांचे विज्ञान आधारित अभ्यास हे माझे कर्तव्य. योग प्राणायाम ,आयुर्वेद, ,वनस्पती , निसर्ग यांचे मानवाचे अस्तित्व,आरोग्य ,आयुष्य यांच्याशी संबंध. 


यज्ञामागचा शास्त्रीय आधार. अंधश्रद्धा , आडंब, थोतांड हे कीड आहे. 


जन्म देवता ब्रम्हा , पालनकर्ता श्री विष्णू, संहार कर्ता श्री शंकर ही मान्यता विश्वास आहे. जन्माचे सर्व ज्ञान ,विज्ञान , तंत्रज्ञान हे सर्व ब्रह्मदेवाजवळ आहे. 


जन्म झाल्यापासून ते मृत्यू पर्यंत चे पालन पोषण ज्ञान हे श्री विष्णू भगवान जवळ आहे. आणि मृत्यू व त्यानंतरचे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान हे भगवान शंकरांना आहे. हे झालं पृथ्वीवर जन्म घेतल्यांकरिता  . 


पण धर्मात याच्या पलीकडे ही सांगितले आहे. स्वर्ग मृत्यु ,पातळ. पृथ्वी म्हणजे  मृत्यू लोक.  


त्याच्या व्यतिरिक्त सात स्वर्ग, सात पातळ लोक. त्यामध्ये असंख्य तारे , ग्रह, नक्षत्र हे एक ब्रम्हांड. आणी या ब्रम्हांडात असंख्य सूर्य चंद्र तारे ग्रह नक्षत्र . आणि असंख्य ब्रम्हांड या सर्वांचा कर्ता करविता हा ईश्वर  ही आमची मान्यता आहे. आणि या सर्वावर असलेला देवाचं कंट्रोल व त्याकरिता लागणार ज्ञान व आवागमन साठी यंत्रणा.

हिंदू धर्मात सोळा संस्काराचे वर्णन आहे. गर्भाधान ते अंत्यसंस्कार या मध्ये  असलेल्या विविध प्रकारच्या टप्प्यांवर केलेले संस्कार. हे शास्त्रोक्त आहे. याला आता शास्त्रीय आधार आहे. यातील मंत्र उच्चार हे काही स्त्री पुरुष किंवा एखाद्या समाजातील लोकांनी करायला पाहिजे असे नाही . तर शास्त्रात सांगितले आहे की मंत्र उच्चार हे स्पष्ट शब्दात उच्चारायला पाहिजे. व उच्चारणारे स्त्री पुरुष हे शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम हवेत . तसेच सात्विक आहार , विचार , कार्य असायला पाहिजे . म्हणजे शब्दांच्या माध्यमातून जे लहरी निर्माण होतील जी ऊर्जा निर्माण होईल ती वातावरण पोषक असेल. मंत्र उच्चारा मूळे निर्माण झालेल्या लहरी त्यांचे उतार चढाव ,ह्रस्व ,दीर्घ  स्वर यामुळे वातवणात एक जाज्वल्य ऊर्जा आनंद निर्माण होत असतो . यज्ञ सायन्स हे ऋषी मुनी यांनी समाजाला दिलेले देणगीच आहे. यज्ञ करताना त्यात दिलेली आहुती , तूप याचे वातावरणावर होणारे शुभ परिणाम हे सगळे आता शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले आहे. म्हणजे पंचमहाभूतांची शुद्धता होत असते.  

शास्त्रात सांगितलेली पूजा, अर्चना, मंत्र, साधना, नामस्मरण, आरती, भजन, योग , प्राणायाम, प्रत्याहार धारणा ध्यान साधना किंबहुना शास्त्रात सांगितलेली प्रत्येक कृती याचे शास्त्रीय आधार आणि महत्व आहे. अंधश्रध्दा मुळीच नाही .पण काही लोकांनी याचा अर्थ चुकीचा लावून लोकांची दिशा भुल केली. व थोतांड निर्माण केले. जादू टोणा भूत प्रेत अश्या अनेक प्रकारचे थोतांड निर्माण केले. आणि धर्माची हानी केली. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सोयीप्रमाणे, स्वार्थ साधण्यासाठी धर्माला वळण दिले.  त्याचे वाईट परिणाम आपल्या बांधवांना सोसावे लागले. आणि जातीपातीचे वर्णाश्रम चे  राजकारण सुरू झाले.


क्रमश

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*