*कौटुंबिक स्वास्थ्य - एक सामाजिक बांधीलकी*

डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे


 माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे.

समाजाच्या, देशाच्या विकासासाठी आयुष्यभर सर्व स्थरावर काम करत असताना वेळ काळ केव्हा असा निघून जातो ते समजतच नाही आणि मग लक्षात येते की आपली मुलं मोठी झाली कमवायला लागली, आता त्यांचे लग्न करायला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कर्म करण्यासाठी मनाची तयारी करायला पाहिजे . मग चिंता वाटते की कसे करायचे? ,काय करायचे?. लग्नाच्या बाबतीत असंख्य असे प्रश्न चिंता डोळ्यासमोर येतात. आणि काळजीचे मनात घर निर्माण होते. 


आजच्या दिवशी आपणास काही विनंती वजा सूचना करावयास वाटतात 

१) लग्न जोडी ही ब्रम्ह गाठ आधीच ठरलेली असते फक्त आपण माध्यम असतो हेच निरंतर सत्य आहे याची जाणीव ठेवावी.

२) वर वधू निवडताना निर्व्यसनी, सुशिक्षित ,सुयोग्य असा जोडीदार निवडावा.

३) आर्थिक परिस्थिती सोबत कर्तव्यदक्ष, आज्ञाधारक, प्रामाणिक, नम्र, संयमी, आनंदी ,हसतमुख जोडीदार निवडावा.

३) माता पित्यानी अतिशय गरज असल्यास आपली मते मांडवी . मुलांच्या संसारात ढवळाढवळ करू नये

४) हुंडा समाजाला लागलेली कीड आहे . दुसऱ्याचा फुकटच पैसा घेणे हे आपल्या धर्मात पाप आहे आणि त्यासाठी आपल्या पुराणात अतिशय घोर नरक यातना सांगितल्या आहेत. तरी आपणास नम्र विनंती आहे की कृपया हुंडा देऊ- घेऊ नये.

५) तसेच आपल्या हिंदू धर्मात लग्न म्हणजे सात जन्माचे साथीदार . आपण अग्नी समोर प्रतिज्ञा घेतो . आणि फारकत विभक्त होणे म्हणजे हे केवढे पाप. आणि प्रतिज्ञा मोडण्याची काय शिक्षा असते ते आपण आपल्या धर्म शास्त्रात बघून घ्या.म्हणून प्रत्येकाने सामोपचाराने राहून आपापले प्रश्न चिंता,समस्या ,भांडण सोडविणे हेच हितावह असते.

६) लग्नात जास्त खर्च करू नये. पैश्याचा, श्रीमंतीचा दिखावा हा भयप्रद असू शकतो. काही लोक कर्ज घेऊन लग्न करतात . तर अश्या बांधवांची मदत करायला पाहिजे.

७) लग्नामध्ये गलिच्छ नाच, नृत्य करू नये

८) लग्नासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू, साहित्य, किंवा इतर सर्व काम ठेका हा फक्त आपल्याच समाज बांधवांलाच द्यावा.

९) समाजाला शरम / लाज वाटेल असे कोणतेच कृत्य करू नये.

१०) आपण पवित्र कार्य करीत असतो ,तिथे अपवित्र कोणत्याच गोष्टी करू नये .उदा. दारू, जुगार, इतर व्यसन , मांसाहार इत्यादी.

११) लग्नामध्ये सर्वांनी इथिकल activities कराव्या.म्हणजे मानापमान बाजूला सारून एकमेकांना मदत आधार देऊन कार्य पूर्णत्वास न्यावे.

१२) लग्न उत्सव हा समाजासाठी आदर्श निर्माण करणारा असावा

१३) हिंदू धर्मातील सोळा संस्कार चा अवलंब करावा

१४) वैदिक पद्धतीनेच लग्न करावे

१५) मुला मुलीं मध्ये फरक करू नये. मुलगा मुलगी समान अधिकारास पात्र आहेत. पूर्वीच्या काळी मुलींना योग्य शिक्षण मान सन्मान मिळत असे म्हणूनच पूर्वी स्त्रिया ह्या राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत अधिकार पदावर होत्या. 

१६) लग्न करताना दुसऱ्याला त्रास ,नुकसान होईल असे कोणतेच काम करू नये.


या १६ सूत्रांचा अथवा सूचनांचा समावेश केला तर आपले कार्य हे सुखा समाधानाचे आनंद पूर्वक होईल .

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*