*वृद्धाश्रम - समाजातील मानसिकतेची काळिमा*
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
आज सोमवार महादेव शंकराचा दिवस मी सकाळी लवकरच उठलो दैनंदिन क्रिया व योग प्राणायाम करून सकाळी आठ वाजता मी कॉलेजला जायला निघालो. चार तास थिओरी लेक्चर घेतल्यावर जेवण केले नंतर लगेच प्राचार्यांनी मीटिंग करता बोलावले .त्यानंतर NBA ची मीटिंग नंतर रिसर्च scholar ची मीटिंग संपवून संध्याकाळी ६ वा घरी जाण्यास निघालो. घरी पोहचलो तोच वडिलांचे रक्ताचे रिपोर्ट घायचे आहे. मी आधी घरात आलो आणि आंघोळ करून वडिलांचे रिपोर्ट आणि काही आवश्यक सामान विकत आणला.🎉 घरात आलो आणि बघतो तर आमच्या घरी पुरणपोळ्या आणि उडीद वडेचा बेत होता. खूपच भूक लागली होती यथेच्छ जेवण केले तृप्त झालो. आणि थोडा शांत बसू तोच मिसेस म्हणाली अहो ! चला बाहेर फिरून येऊ. खूप जेवण केलेय , थोडे चला . झालं माझी इच्छा नसतानाही मी आणि मिसेस चालायला निघालो. फिरून आल्यावर मला आमच्या ओळखीचे काका भेटले . काकाचे वय ७५ वर्ष. पांढरे स्वच्छ कपडे घातलेले धोतर पण पांढरे स्वच्छ . मी त्यांना नमस्कार केला त्यांनीं माझ्याकडे बघितले व माझ्याशी बोलायला थांबले. मी त्यांच्या हातातील पिशवी बघून त्यांना सहज विचारले की काका कुठे चाललात. ते हरबळले व बोलू लागले की मोठ्या मुलाने वृद्धाश्रमात टाकले . मला समजले नाही मी पुनः विचारले काय ? त्यांनी सांगितलं की मोठ्या मुलाने वृद्धाश्रमात टाकले.खूप मोठा बंगला आहे त्यात महिन्याला पैसे देऊन आम्हाला तिथे ठेवले. बोलताना काकांचा डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. भावूक झाले बोलू शकत नव्हते एवढेच बोलले येतो🙏 तेथील मुलगा घ्यायला आहे. प्रचंड दुखः वेदना , भावनांचा मनात सागर घेऊन त्या लाटा मध्ये घुरफळून ते अंधारात निघून गेले. मी तिथेच जागेवरच खिळून उभा होतो. माझ्या डोळ्यांसमोर काकांचे जीवन उभे राहिले . लातूर जवळील खेडे गावात संपूर्ण आयुष्य घालवून रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करून आपल्या दोन मुलांना त्यांनी शिकविले . स्वतः च्य्या पायावर उभे केले. दोन्ही मुलं पुण्याला नोकरी निमित्ताने आले . मोठा मुलगा कंपनीत नोकरीला लागला . लहान मुलगा हा हुशार चतुर असल्यामुळे त्याने स्वतःची कंपनी काढली . आता काका म्हातारपणात आपल्या मुलांकडे राहायला आले. सुरवातीला पाच सहा वर्ष काहीच प्रॉब्लेम नव्हता. सगळं अगदी मजेत चाललं होतं. काक सकाळ संध्याकाळी फिरायला जायचं. लहान मुलं, मोठी माणसं यांच्याशी अगदी आनंदाने बोलायचे . चौकशी करायचे . काका आणि काकू मजेत आमच्या शेजारील बिल्डिंग मध्ये त्यांच्या लहान मुलाच्या राहायचे . सगळ्या विभागातील छोट्या मोठ्या कार्यक्रम ला हजर राहायचे. आगदी आनंद उत्साहात मला नेहमी दिसायचे. आणि आज त्याची ती दुःखी प्रतिक्रिया आणि पतीत चेहरा पाहून मला प्रचंड दुःख झाले . बायकोने मला धक्का दिला. अहो चला! मी भानावर, शुद्धीवर आलो. आणि चालायला लागलो . खर तर वृद्धाश्रम म्हणजे मानवतेला लागलेला कलंक ! वृद्धाश्रम ची गरज काय ? वृद्धाश्रम म्हणजे समाजाला लोकांना संस्कार ,शिक्षणाचा अभाव. ज्या समाजात संस्कार शिक्षणाचा अभाव असतो त्याठिकाणी प्रचंड मोठी हानी होते. आणि त्याला सावरायला कोणीही शिल्लक नसतं. अशा प्रकारे विचार करीत घरी पोहचलो . आणि विचार केला की आपण ही घटना लिहायला पाहिजे की जेणेकरून लोकांना समाजातील उच्च संस्कृती तील असभ्य लोकाची कर्तुत्व.
आज आम्ही काकांना वृद्धाश्रमात का पाठविले याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला असे निदर्शनात आले की दोन्ही सुनांचा हेवा दावा तर आहेच. पण लहान सून पण घरात काहीही कारण नसताना ,मुद्दाम खोटं नाट सांगत भांडण उकरून काढायची. काकांवर खोटे आड घ्यायची. घरात काकांना अतिशय गलिच्छ शब्दात बोलायची . त्यांचा मुलगा पण वायकोशी सहभागी व्हायचं. काकांना स्वतची कामे स्वतः करावी लागायची. आणि शेवटी शेवटी तर एक पोळी पण करणे त्या महामायेच्या जीवावर यायचे. प्रचंड असा मानसिक छळ चालत होता.
अश्या परिस्थिती ला काय म्हणायचे?
आई वडील यांनी केलेल्या कष्टाचं हेच का फळ? बायको तिच्या आई वडिलांना देव मानते पण सासू सासऱ्याना दानव का? ही मानसिकता का? का त्या बाई ला तिच्या आई वडिलांनी संस्कारच केले नाही.
Comments
Post a Comment