*संशोधनाची कथा*
लेखक:
डॉ. जितेंद्र आत्माराम होले, पुणे
( लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून मनोरंजनातून संशोधन माहिती या संकल्पनेवर आधारित कथा स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा विपरीत अर्थ लावू नये)
महाविद्यालयाचे प्रसन्न वातावरण होते. उन्हाळा संपून नुकतीच पावसाळ्याला सुरवात झाली होती. मंद मंद ओल्या मातीचा सुगंध येत होता. त्यात प्राध्यापक श्याम महोदय आपले व्याख्यान संपवून कॉलेज कॅन्टीन मध्ये चहा घ्यायला गेले तिथेच काही मुलांचा घोळका सरांना बघून सरांजवळ जमा झाला . सरांनी त्यांना बसविले व चहा नाष्टाची ऑर्डर दिली. मुले अतिशय आनंदात खुशीत होते. त्यातील काही मुले अतिशय उत्साही होते .त्यांनी पेपरमध्ये संशोधनावर असलेली बातमी वाचली. आणि मुलांमध्ये प्रश्न निर्माण झाला की संशोधन म्हणजे काय?
झाले काही मुलांनी श्याम सरांना विचारूनच टाकले सर संशोधन म्हणजे काय?
ते कोण , कसे , कशाकरीता करतात?
प्रा श्याम सरांनी चहाचा स्वाद घेत मुलांकडे बघितले व त्यांनी बोलायला सुरवात केली.
संशोधनाची व्याख्या नवीन ज्ञानाची निर्मिती आणि/किंवा विद्यमान म्हणजे असलेल्या ज्ञानाचा नवीन आणि सर्जनशील मार्गाने वापर करणे म्हणजे नवीन संकल्पना, पद्धती आणि समज निर्माण करणे. यामध्ये मागील संशोधनाचे संश्लेषण आणि विश्लेषणाचा समावेश असू शकतो ज्या प्रमाणात ते नवीन आणि सर्जनशील परिणामांना कारणीभूत ठरते. हि झाली संशोधनाची व्याख्या .
बरं का मुलांनो।।
आता संशोधन कोण करतो ? संशोधन कोणीही करू शकतो अगदी अगदी लहान मूलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत . फक्त त्याला त्याची रचना , मांडणी, कल्पना मांडता आली पाहिजे . लगेच एका मुलांनी प्रश्न केला की संशोधन कश्यासाठी करायचे? तेव्हा अतिशय मिश्किलपणे सरांनी उत्तर दिले की आपल्या स्वतसाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या समाजाला पर्यायाने सर्वांसाठी।। सर्वांसाठी उपयोगी पडेल ते नवीन सर्वकाही . आता परत नवीन प्रश्न संशोधन कसे करायचे?
आता मात्र अतिशय जबाबदारीने सरांनी बोलायला सुरवात केली .
मुलांनो अतिशय काळजीपूर्वक ऐका!!
सर्वप्रथम कोणत्या विषयामध्ये संशोधन करणार आहे याचा आढावा घेऊन ठरवून टाकायचे, नंतर त्याविषयातील सूक्ष्म विषय निवडायचा आहे . आता टॉपिक निवड हा सर्वात महत्वाचं भाग असतो . तर तो कसा निवडायचा ?
तर त्या करिता जगामध्ये ह्या विषयावर झालेले कार्य आणि त्यातून समजणारे विविध प्रॉब्लेम आणि त्याचे स्टेटमेंट व त्याबरोबर विविध संशोधकांनी केलेल्या कामाची पद्धत ,रचना ,मांडणी, कल्पना , निरीक्षण आणि सारांश व नंतर भविष्यातील त्यासंदर्भातील कार्य अश्या विविध प्रकारच्या बाबीचा अभ्यास करून आपल्याला आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या आधारे टॉपिकचे / विषयाचे चयन करायचे असते.
टॉपिक निवड झाल्यावर अब्स्त्रॅक्ट हा महत्वाचा घटक असतो याचा अर्थ आपण ह्या संशोधनामध्ये काय करणार आहे याची सूक्ष्म रूपरेखा.
यानंतर किवर्ड्स म्हणजे काही महत्वाचे शब्द.
त्याच्यानंतर त्या टॉपिकची मूलभूत माहिती त्यानंतर वर सांगितल्या प्रमाणे literature survey त्यानंतर निरीक्षण व त्याचे विश्लेषण
आपण ज्या संशोधनचा सेटअप केला आहे त्याचे रीडिंग/ निरीक्षण , घेवून त्याचा आलेख व विश्लेषण , discussion व चर्चा .
बरे का मुलांनो इथपर्यंत झाला तुमचा संशोधनाचा पूर्वार्ध याच्या नंतर उत्तरार्धा मध्ये रिझल्ट , डिस्कशन आणि शेवटी केलेल्या कामाचे सारांश म्हणजे conclusion अश्या प्रकारे संशोधन मांडण्याची पद्धत असते. आणि सरते शेवटी भविष्यातील कार्य संशोधन व references हा शेवटचा महत्वाचा टप्पा असतो.
संशोधन झाल्यानंतर नवीन निर्मिती , कल्पना असली तर त्याचे पेटंट , copyright करायचे त्याची पद्धत समजावून घेणे अतिशय महत्वाचे असते. भारतीय पेटंट ऑफिस मध्ये पेटंट नोंदणी कशी करतात त्या करीता काय कागदपत्र लागतात याची माहिती घेणे अतिशय महत्वाचे असते. त्यानंतर त्याला एका विशिष्ठ साच्या मध्ये मांडून अर्ज करून पब्लिश , grant झाल्यावर त्या प्रॉडक्ट ला संकल्पनेला बाजारात आणले जाते किंवा स्वतचे नवीन स्टार्टअप सुरू करता येते. स्टार्ट अप साठी लागणारी सर्व माहिती इंटनेटवर मिळू शकते. अश्या पद्धतीने आपण स्वतः ची पर्यायाने समाजाची देशाची प्रगती करू शकतो.
थोड्या वेळानं वीज. चकाकली ,ढग गडगडले आणि श्याम आणि मुले भानावर आली. तेव्हा मग सरानी मुलांचा हसत हसत निरोप घेतला.
Comments
Post a Comment