रामायण आधुनिक शास्त्राचे भांडार
*रामायण आधुनिक शास्त्राचे भांडार*
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
आपल्याला सर्वांना रामायणातील कथा माहितीच आहे त्या बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. माता कैकायीच्या आग्रहास्तव दशरथ राजाने वचन स्तव श्रीरामाला १४ वर्ष वनवासात जाण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे श्रीरामाने अतिशय विनम्रपणे वडिलांचे वचन आदेश पाळत वनवासात जाण्याचा निर्णय घेतला(Value Education). आता १४ वर्ष वनवासात राहणे म्हणजे मोठे दिव्यच होते पण पण गुरू वशिष्ठ यांनी गुरुकुलात दिलेल्या ज्ञानाचा खूप फायदा झाला. श्रीराम आपल्या पत्नी आणि भावासोबत वनवासाला निघाले तेव्हापासून ते परत १४ वर्षानी परत अयोध्येला परत आले तिथपर्यंत बरेच असे प्रसंग आले. त्यावेळी श्रीरामांनी अतिशय कुशलतेने आपल्या ज्ञानाचा वापर केला. मित्र निषाद राजा सोबत चे मित्रसंबंध , संघटन कौशल्य तसेच जंगल ज्ञान, सुरक्षा ज्ञान , कुटी बांधण्यासाठी ज्ञान , वनस्पती शास्त्र, जीव शास्त्र , आरोग्यशास्त्र, शेती शास्त्र , हवामानशास्त्र, खगोल शास्त्र ,धातू शास्त्र , रचना शास्त्र , विविध भाषा ज्ञान, प्रादेशिक भाषा ज्ञान, संस्कृत भाषा , संभाषण कौशल्य , शरीर शास्त्र, मानसिक शास्त्र , पंचामहाभूत शास्त्र, युद्ध शास्त्र या ज्ञानाचा वापर करून प्रभू श्रीराम वनवासात राहू लागले . आणि पुढे रावणाने मटा सीतेचे हरण केल्यानंतर प्रभू हनुमंताला आणि सुग्रीव ला भेटले त्यावेळेस त्यांचे राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र , संघटन शास्त्र, रचना शास्त्र या आणि अश्या अनेक विषयांचा अभ्यास असल्याचा अनुभव येतो.
क्रमशः ०१
Comments
Post a Comment