महाराष्ट्रातील सर्वच महाविद्यालयातील
*शिक्षकांना कामामध्ये येणाऱ्या अडचणी व आव्हाने*
(*डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे*)
१)शिक्षकाच्या आर्थिक, मानसिक, शारीरिक सबळतेकरिता खटाटोप, प्रयत्न करण्याची गरज
२) कामाचा ताण, academic सोडून इतर कामांचा आढावा घेण्याची आज गरज
३) शिक्षकाच्या मुलांसाठी शिक्षणासाठी फी मध्ये सवलत मी शिक्षणामध्ये राखीव जागा म्हणत नाही .
३)नोकरीबद्दल l असुरक्षितता भावना
४)विद्यापीठाची मान्यता अडचणी
५) शिक्षक भविध्या निधी असुरक्षितता
६)शिक्षक व त्याचे कुटुंब सुरक्षा निधी ची गरज
७)शिक्षक प्रगती प्रोत्साहन निधी आवश्यक
८)शिक्षक ट्रेनिंग , कॉन्फरनस, workshop, गेस्ट लेक्चर , जर्नल निधी
९)अभ्यास दौरा निधी ,आतंरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासाठी आवश्यक
१०) पेटंट, कॉपीराइट,book writing and पब्लिशिंग , प्रोडक्ट डेव्हलपमेंट , स्टार्ट अप निधी आवश्यक
११) शिक्षकांना बुक्स ,जर्नल, मॅगझिन, newspaper एसेस सहज सुलभ मिळायला हवा.
१२)शैक्षणिक साहित्य सुविधा
१३) योग्य शिक्षक विद्यार्थी रेशो
१४)हवेशीर वर्ग व शिक्षक विद्यार्थी बैठक व्यवस्था
१५)नवीन रिसर्च गाईड होण्यासाठी विद्यापीठाचे प्राध्यापकाला मिळालेले शिक्षक approval ची कमी ,कारण बऱ्याच महाविद्यालयीन प्राध्यापकांचे ॲप्रोवल च झालेले नाही
१६) रिसर्च सेंटर व मार्गदर्शक आणि विद्यापीठाचा कम्युनिकेशन गॅप
१७)नवीन नियमावली माहितीसाठी ट्रेनिंग सेशन किंवा workshop ची उणीव
१८)विद्यापीठातील लिपिक व तत्सम अधिकाऱ्यांची संभ्रमित वर्तणूक
१९) मार्गदर्शक बदल, सेंटर बदल, कालावधी वाढ, गाईड मार्गदर्शन कालावधी वाढ ई. मध्ये येणाऱ्या अडचणी
२०) कोर्स work संदर्भातील नियमावली स्पष्ट करण्याची गरज
२१) रिसर्च सेंटर मध्ये माहितीची किंवा equipment ची असुविधा
२२) संशोधन मार्गदर्शकाचे मानधन
२३) रिसर्च प्रपोजल टाकण्यासाठी येणाऱ्या अडचणी व जर proposal मान्य झाले तर येणाऱ्या रकमेचा योग्य काळ , वेळ,योग्य माणूस, योग्य मानधन ई. बाबींबाबत साशंकता?
२४)संशोधन करण्यासाठी मार्गदर्शक शिक्षकाचा वेळ ,कालावधी, त्याची उपलब्धता, इतर कामांचा व्याप, academic कामांचा व्याप, सहकारी, सहयोगी मंडळीची कमतरता
२५)योग्य रिसर्च जर्नल, मॅगझिन, conference, पेटंट, copyright, स्टार्टअप, preincubation,incubation सेंटर, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट , ट्रेनिंग ई बाबींच्या ज्ञानाचा अभाव किंवा अपूर्णता नाहीतर योग्य नियमावली नाही
२६) वाड.मय चौर्य , plagirisum चेकिंग करीता लागणारे योग्य सॉफ्टवेअर बद्दल ची माहिती अपूर्ण किंवा अज्ञान
२७)परीक्षक नेमणूक करताना अडचणी
२८) परिक्षकाचे अवेळी मानधन
२९) Examination ची नियमावली व मानधन याबाबत संभ्रम
३०) संशोधन केंद्र मान्यता व अद्यावत ठेवण्यासाठी येणाऱ्या अनंत अडचणी व पिळले गेलेले शिक्षक
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
महाविद्यालयीन स्तरावर , विद्यापीठ स्तरावर व राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र *teacher's problem redressal cell* म्हणजे *शिक्षक समस्या निवारण कक्ष* व *शिक्षक प्रगती आयोग* स्थापन करण्याची गरज.
शिक्षक प्रगती आयोगाचे कार्य हे शिक्षकाची आर्थिक, मानसिक, शारीरिक प्रगतीचे देखरेख व मूल्यांकन करणे हे असेल.
माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*
*माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव* लेखक - डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे (PhD) संध्याकाळची वेळ होती कुंभमेळ्याच्या बातम्या बघत होतो. आणि मनात एक विचार आला की आपण महाकुंभ प्रयाग राज येथे जायला पाहिजे आणि माझी कित्येक वर्षाची इच्छा पण होती की कुंभमेळा बघायला पाहिजे. तिथे साधू संत महात्मे यांचे दर्शन घ्यायला पाहिजे. ठरलं!! कुंभ मेळयाला जायचे . आता तीन पर्याय होते , बस ,रेल्वे, आणि विमान . पण बस आणि रेल्वे ने दोन दिवस जायला व दोन दिवस यायला म्हणजे चार दिवस गेले असते. मग मी मित्रांना व आमच्या घरच्यांना विचारले पण काहीतरी अडचणी समोर आल्या आणी त्यांचे रद्द झाले .मग मी ठरविले की विमानाने जायचे व यायचे आणि त्याप्रमाणे मी आखणी केली की पुणे ते काशी व काशी ते प्रयाग राज आणि प्रयाग राज ते पुणे असा मार्ग होता. पण डायरेक्ट फ्लाईट नव्हती. म्हणून कनेक्टिंग फ्लाईट बुक केली. पुणे ते हैद्राबाद व हैद्राबाद ते काशी असा प्रवास झाला. काशी वाराणाशी विमानतळावरून आय आय टी बी एच यू मध्ये आमच्या मित्रांनी गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सोय केली होती. त्याप्रमाणे मी तिथे पोहोचलो अतिशय भव्य द...
Comments
Post a Comment