*मतदान - एक पूण्यकर्म
*मतदान - एक पूण्यकर्म*
*चुकीचा निर्णय भविष्याशी खेळ*
*डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे*
( सदरहू लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून याचा विपरीत अर्थ लावू नये यामागे फक्तं एकच हेतू उद्देश आहे की सर्वांनी योग्य व्यक्तीला मतदान करावं व भविष्य सुखरूप सुरक्षित आनंदित उज्वल करावं )
संध्याकाळची वेळ होती प्रसन्न वातावरण होते. श्याम व राम हे दोघे मित्र गप्पा मारत होते. श्याम म्हणत होता, मी कोणालाच मतदान करणार नाही कारण सर्वच राजकारणी सारखेच आहेत. फक्त स्वतः चा स्वार्थ बघतात . खुर्चीची हाव असते. खुर्चीसाठी ते काहीही करायला तयार असतात. लोकांची , समाजाची देशाची सेवा करायच्या नावाखाली राजकारण करत असंतोष पसरवत असतात. आणि जातीच्या, धर्माच्या, महागाई च्या नावाखाली आपसात भांडण करीत असतात .
तेव्हा राम बोलू लागला अरे मित्रा श्याम तू अगदी बरोबर बोलतोस . सगळीकडे गोंधळ मांडलाय. सर्व पातळीवर राजकारण करत आपली स्वतः ची पोट भरताय . मग आपण मत कोणाला द्यायचं? का द्यायचाच नाही?
राम अतिशय गंभीर होऊन बोलू लागला जर आपण मतच केले नाही तर काय होईल? आपल एक मत गेले तर काय असं मोठ वादळ निर्माण होणार आहे ? जाऊ द्या आपण मस्त दोन दिवस सुटी आहे फिरायला बाहेर निघून जाऊ. मजा करू म्हणजे आपली सुटी कामा तरी येईल.
दोघांचे बोलणे शेजारी बसलेले गुरुजी ऐकत होते . गुरुजींना त्याचा प्रत्येक शब्द न शब्द ऐकू येत होता. गुरुजी लगेच त्या दोघांशी बोलू लागले. गुरुजींच्या चेहऱ्यावर तणाव ,चिंता दिसत होती. गुरुजी म्हणाले अरे बाळांनो मी तुमचे दोघांचे बोलणे ऐकत होतो. तुम्ही मतदान न करण्याचा निर्णय घेतला. पण बाळांनो तुमच्या लक्षात येतंय की तुम्ही काय करताय? आणि केवढी मोठी चूक करताय? केवढ मोठ संकट ओढवताय?
राम,श्याम नी मोठे डोळे करून गुरूजींकडे बघितलं. गुरुजी बोलू लागले , आज आपण ज्या स्थिती- परिस्थिती मध्ये आहोत त्याला सरकारची कार्यप्रणाली जबाबदार असते. आपलयाला माहिती आहे की मूलभूत गरजा ह्या अन्न,सुरक्षा, वस्त्र, निवारा आरोग्य, सुख,शांतता आनंद ह्या आहेत.
तसेच पंचमहाभुत म्हणजे पृथ्वी ,जल, अग्नि ,वायू, आकाश ह्या सर्वांचं आपल्या जिवनातील अनन्यसाधारण महत्त्व. ह्या सर्वांच झालेले प्रदूषण . ह्याच मूळे आपल्याला अस्तित्व असतं. मग तुम्ही म्हणाल याचा आणि मतदानाचा काय संबंध? पण बाळांनो तेच सांगतो .
पृथ्वी प्रदूषण म्हणजे जमिनीची नासाडी ,नापिकता, ही जमिनीत रासायनिक पाणी किंवा रासायनिक द्रव्यामुळे होते. ,
जल प्रदूषण हे नदीच्या पाण्यात दूषित पाणी, दूषित द्रव्य सोडल्यामुळे होते, अग्नि , वायू, आकाश प्रदूषण म्हणजे हवेची दूषितता, तापमानाची प्रचंड वाढ ही , हवेत विविध प्रकारचे वायू सोडल्यामुळे व झाडी वने निर्मुलनामुळे होते. आणि याचमुळे भूकंप, त्सुनामी ,महापूर, वादळ होत असते .
तेव्हा ना राहवून परत राम श्याम म्हणले अहो गुरुजी आता ह्याच इथे काय संबंध ? तेव्हा गुरुजी म्हणले या सर्वांचा इथेच संबंध आहे . हे सर्वकाही बदल होतात हे सर्व सरकारच्या निती वर अवलंबून असतात . सरकारचे नियम दूरदृष्टी , कठोर निर्णय, जबाबदारी आणि देशासाठी लोकांसाठी कार्य करण्याची आत्मीयता ,तळमळ. शासनाचा प्रत्येक निर्णय हा अतिशय मोलाची , महत्वाची भुमिका निभावत असतो. प्रत्येक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, का, न करणे हे सर्व सरकारच्या अधिकारी आणि सत्तेत बसलेल्या सर्व प्रमुख व्यक्ती वर अवलंबून असते. म्हणून ह्या वरील सर्व बाबीचे मुळ हे सत्ता म्हणजे सरकार आहे. आणि हे सरकार आपल्या सर्वांचं आहे .आपल्या मतदानातून हे सरकार निर्माण होणार आहे . विचार करा मुलांनो आपण भाजी पाला घेतो तर त्याला व्यवस्थित बघून घेतो . त्याला कीड किंवा खराब तर नाही. त्याला सर्व बाजूंनी बघून चाचपून घेतो.
तर बाळांनो हे एवढं मोठं सरकार, की ज्यामुळे आपल व आपल्या पुढील पिढीच आयुष्य सुरक्षित , आनंदित होणार आहे त्याला आपण अशी पाठ फिरवयाची . हे योग्य आहे काय? नाही बाळांनो विचार करा. जर तुमच्या सारखा विचार बरेच तरुण तरुणी करीत असतात पण ते आपल्या स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेत असतात.
बरे का? राम श्याम , तुझे मत तुझ्या घरच्यांची मत ,तुझ्या नातेवाइकांचे ,शेजाऱ्यांच्या ,गावातील लोकांचे मत हे अतिशय महत्वाचे आहे आणि यावरूनच आपलं भविष्य ठरणार आहे.
तुम्ही म्हणता हा चांगला , हा वाईट . पण लक्षात ठेवा महाभारताच्या युद्धामध्येही भगवान श्रीकष्णांनी एका पक्षाकडे राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पक्षांमध्ये कमी अधिक बाजू होती. हाच विचार करून आपण आपला मतदानाचा निर्णय घ्यावा व सुयोग्य व्यक्तीला मतदान करावे. . सुयोग्य म्हणजे कोण? ज्याला वरील बाबींची सर्वसाधारण माहिती असेल व जबाबदारी ,कर्तव्याची जाणीव असेल त्याचं व्यक्तीला मतदान करावं व निवडून आणावं.
आता मतदान न करणं म्हणजे अप्रत्यक्षरीत्या चुकीच्या व्यक्तीला समर्थन ,किंवा निवडून येण्यास मदत करणे आणि ह्या सर्व गोष्टींशी अप्रत्यक्षरीत्या घडवून आणणे व चुकीचे कर्म करून प्रचंड मोठा पापाचा घडा भरून ठेवण्यासारखे होईल . आणि कर्म सिद्धांत नुसार कर्म फळ नक्कीच मिळणार . बरे असो बाळांनो आता निर्णय तुम्हाला घ्यायचाय की आपण काय करायचं? असे बोलून गुरुजी निघून गेले.
स्तब्ध , शांत पणे ऐकत असलेले राम श्याम भानावर आले आणि आपली चूक मान्य करीत स्वतः मतदान करू व सभोवतालच्या लोकांना सुद्धा प्रेरित करू असा संकल्प करून आपापल्या घराच्या दिशेने निघून गेले.
Comments
Post a Comment