( महत्त्वाचे- *सर्व सुज्ञ ,सुजाण व जागरूक पालकांनी हे एकदा तरी वाचलेच पाहिजे*)


*क्लासेस खेळ मुलांच्या जीवावर*


 *शाळेची मस्ती,पालकांची सुस्ती,मुलमुली कष्टी*


*लेखक* 

*डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे*

(सदरहू लेख ही सत्य परिस्थिती असून हे कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था, किंवा कोण्या एका क्लासेस वर आधारित नसून हे सार्वजनिक स्वरूपाचे स्वतः चे मत व्यक्त केलेले आहे. यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. याचा विपरीत अर्थ लावू नये .फक्त यामागे एकच उद्देश आहे की मुलं आणि पालक यांच्यामध्ये प्रबोधन व्हावे व मुलाचे आयुष्य, भविष्य सुखरूप आनंदी दायक तसेच उज्ज्वल व्हावे. हे पथ दर्शनाचे कार्य आहे) 


एक आटपाट नगर होतं त्या नगरात श्याम नावाचं अतिशय होतकरू मुलगा आपल्या आई वडीलांसोबत राहत होता.

श्याम दहावी पास झाला होता .आता श्यामच्या आई वडीलाना त्याच्या पुढील शिक्षणाची चिंता होती की ११वी ला प्रवेश कोणत्या शाळेत घ्यायचा? कोणती शाळा चांगली आहे ? . जेईई , सी ई टी चे क्लास कुठे लावायचे ? मग पालकांचा विचार चांगल्यात चांगले एकदम भारी क्लासेस लावायचे म्हणजे आपल्या मुलाचा नंबर चांगल्या ठिकाणी लागेल व त्याच भविष्य सुखरूप होईल. बरोबर च आहे प्रत्येक पालकाला हेच वाटतं की कितीही पैसा लागला तरी चालेल , कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल पण मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं. मग श्यामच्या पालकांची भागदौड़ सुरू झाली. शहरातल्या प्रत्येक मोठ्या नावाजलेल्या क्लासेस मध्ये चौकशी साठी जाऊ लागले आणि ट्युशन फी एकूण हृदयाचा ठोका चुकवत होते पण निर्धार पक्का श्यामला उत्तम शिक्षण द्यायचं.

सगळ्या शाळा बघून झाल्या . सगळे सी ई टी चे क्लासेस बघून झाले . कुठ प्रवेश घ्यायचा? ते अजूनही संभ्रमात होते. मग श्यामच्या वडिलांनी निर्णय घेतला की आपण शहरातील सर्वोच्च महागड्या आणि प्रसिद्ध असलेल्या क्लास मध्ये प्रवेश घ्यायचा व त्यांना जोडून असलेल्या शाळेत प्रवेश घ्यायचा.

झालं पक्क ठरले . आता उद्या सकाळी प्रवेश घ्यायचं. आता श्यामच्या पालकांना थोडस मोकळं वाटत होते की पैसा लागला चालेल पण मुलाला चांगल्या ठिकाणी प्रवेश घेऊ. 

संध्याकाळची वेळ होती आणि श्यामचा मामे भाऊ व मामा हे श्यामच्या घरी आले. श्यामचा मामेभाऊ हा पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तो ह्या सर्व परिस्थितीतून गेला होता. त्याच्या मामाला पण ह्या सर्व परिस्थितीची माहिती जाणीव होती. घरामध्ये श्यामच्या प्रवेशाचा विषय निघाला आणि श्यामचे आई बडील अभिमानाने सांगू लागले की श्यामला आम्ही कर्ज काढून कष्ट करून जमविलेल्या पैश्याने आम्ही सर्वोच्च क्लासेस मध्ये प्रवेश घेत आहेत. 

तेव्हा मग श्यामचां मामा अतिशय गंभीर झाला आणि अतिशय जबाबदारी पूर्वक बोलू लागला ते बघून श्याम व त्याचे आई वडील त्याच्या जवळ येऊन मामाचा शब्द न शब्द ऐकू लागले. श्यामच्या मामांनी बोलायला सुरुवात केली.

🎉 आय आय टि, एन आय टि च्या स्पर्धा परीक्षेत आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता न बघता मोठ मोठ्या क्लासेसला भरगच्च फी भरून प्रवेश घेतात आणि मनासारखे यश न प्राप्त झाले तर आपले व मुलाचे खाच्चिकरण करून घेतात. ही प्रक्रिया काही नवी नाही . दरवर्षी अश्या प्रकारचा खेळ खंडोबा होत असतो. दरवर्षी पालक आशेने गलेलठ्ठ फी भरत असतात. आणि मुलांकडून अपेक्षा करीत असतात.

पण विचार करा🙏 आय आय टी, एन आय टी च्या सीट्स किती असतात? आणि किती विद्यार्थी JEE चा क्लास लावून परीक्षा देतात? तर त्याचे प्रमाण अतिशय कमी असते, म्हणजे ०.०१% . 

हे झालं पूर्ण भारताचे प्रमाण . आता मोठ्या शहरांचा विचार करा म्हणजे याचे प्रमाण अजून कमी. मग असे चित्र असेल तर हाच अट्टाहास का? आणि याचमुळे कोटा राजस्थान येथे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.याला जबाबदार कोण? 

आणि बरे का श्याम , 

मोठ मोठे क्लासेस हे संबंधित महाविद्यालयांशी टाय-अप करतात आणि मग विद्यार्थी फक्त नावाला शाळेत प्रवेश घेतात. लेक्चर ,प्रॅक्टिकल नाही. फक्त फी भरायची आणि परीक्षेला जायचे. परीक्षेचे पण मूल्यांकन नाही. अश्या सावळ्या गोंधळात मुलाच्या भविष्याशी खेळले जात असते. आणि वस्तू स्थिती अशी की क्लासेस मध्ये २०० ते ३०० विद्यार्थी आणि शाळेत झीरो. 

आता विचार करा २०० विद्यार्थी आणि एक शिक्षक ,"प्रत्यक्ष सरस्वती माता" जरी शिकवायला आली तरी तिला एवढ्या विद्यार्थ्यांना शिकविणे जमणार नाही. आणि हे एक विक्रम विर शिक्षक २००+ विद्यार्थ्यांना शिकवितो. मुले पण बसतात .वेळ काढून नेतात . निव्वळ वेळेचा पैश्याचा दुरुपयोग. आणि हा हा म्हणता ११ वी निघून जाते आणि ही मंडळी १२ वी चा अभ्यासक्रम सुरू करतात .आणि इकडे शाळेचे शिक्षण शून्य !! बेसिक माहिती अपूर्ण आणि १२ वी चा अभ्यास सुरू 😭 मग काही विद्यार्थ्यांना खूप ताण पडतो आणि मग ते विविध मार्गांच्या आहारी जातात किंवा ते क्लासेस बुडवितात . आणि इकडे तिकडे बाहेर फिरतात पण ह्या लोकांना याचे काहीही घेणे देणे नसते. ते काही हुशार मुलांची वेगळी बॅच व सामन्यांची वेगळी बॅच करून टाकतात. मग इथेच तुलना केली जाते आणि हुशार विद्यार्थी हे मुळातच जाणीव असल्यामुळे स्वयं अभ्यास करतात आणि बाकीच्यांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा होतो. आणि मग याच हुशार मुलांच्या नावावर जाहिरात प्रसिद्ध केली जाते आणि प्रवेश केले जातात. 

हे ठीक आहे पण बाकीच्या मुलांचे काय ? 

आणि बरे का ताई आणि जिजाजी ,

त्यांचे धड जे ई ई पण नाही, १२ वी पण नाही आणि सी ई टी पण नाही . 😭

 मग तो आणि त्याचे पालक गोंधळले जातात आणि पालक आणि विद्यार्थी भविष्याच्या काळजीने अत्यंत दुखावले जातात पण पर्याय नसतो. वेळ गेलेली असते .रडण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. 😂

खरे बघितले तर ११ व १२ वी चा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक असतो कारण परीक्षा ही सब्जेक्टीव आसते म्हणजे त्यामध्ये खूप लिहावे लागते. लिहिण्याची सवय पाहिजे असते आणि ह्या मुलांना शाळा नसल्यामुळे क्लासेस मध्ये फक्त पर्याय वाचक प्रश्न शिकविले जातात त्यामुळे विद्यार्थी हे लिहायला असमर्थ असतात. आणि

 सी. ई टी मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात ते साधे बेसिक कॉन्सेप्ट आधारित असतात म्हणजे काय जे ई ई चे प्रश्न न्युमेरिकल बेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आणि १२ वी चे सब्जेक्टिव प्रश्न अश्या तीन गोंधळमध्ये मुले आणि पालक जातात आणि शेवटी संभ्रमात पडून दुःखी होतात . काही सेन्सिटिव्ह मुले अतिशय टोकाची भूमिका घेतात. 

अश्याप्रकरचा जीव घेणा खेळ कधी थांबेल काय? स्पर्धेच्या ह्या जीवघेण्या खेळ निरागस मुलांचं आयुष्य कोणी वाचवेल का? भविष्यातील स्वप्नांना पंख लावून उडविणाऱ्या त्या निरागस मुलांचा छळ कोणी थांबवेल का? 

पिडीत निरागस मुलांचे आई वडील आणि बालक आपल्यासारख्या शिक्षण तज्ञ व समाजाकडे अतिशय आतुरतेने आणि आशेने बघत आहे . कोण कोण श्रीकृष्ण येणार आणि मुलामुलींचे रक्षण करणार? 

का कोणीही नाही ह्या भारत भूमीवर की माझ्या मुलांना न्याय देऊ शकेल? अश्या आशेने पालक वाट बघत असतात. असो🙏🙏

प्रत्येक पालक ,शिक्षक ,शिक्षणतज्ज्ञ मंडळींनी विचार करावा . अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. मग याला पर्याय काय? याच्यावर उत्तर काय?


एवढं बोलून श्यामच्या मामांनी आपले मत अतिशय भावनिक व जबाबदारी पूर्वक सांगितले . 🙏 सगळी कडे एकदम शांतता ,स्तब्धता ,चिंतातुर वातावरण . श्याम व त्याचे आई वडील भानावर आले आणि श्यामची आई बोलली," दादा तू होतास म्हणून आमचे डोळे उघडले नाहीतर आम्ही पण ह्या षडयंत्रात अडकलो असतो.वरे पैश्याचा जाऊ दे पण श्याम चा वेळ , शैक्षणिक नुकसान आणि मनावर झालेला परिणाम ह्या सर्व दृष्ट चक्रातून आम्हांला तू वाचविले . तू आज खरंच कृष्णा सारखा धाऊन आला. आणि आपल्या बहिणीची लाज राखली. तू आज भाऊ बहिणीची मायेची लाज राखली. एवढे बोलून श्यामची आई म्हणाली चला , सगळे आपण जेवण करू या! आणि मग सर्व जण जेवणाच्या धुंदीत मग्न झाले.

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*