जबाबदार कोण? आपण स्वतः का सरकार?

*जबाबदार कोण? आपण स्वतः का सरकार* विचार करा लेखक डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे संध्याकाळची वेळ होती काही विद्यार्थी महाविद्यालयीन अभ्यास संबंधित ॲक्टिव्हिटी संबंधी चर्चा व माहिती घेण्याकरिता आले त्यावेळेस सरांची आणि मुलाची चर्चा अतिशय रंगत पूर्वक झाली. सरांनी अतिशय विचारपूर्वक आणि गंभीर पण सांगितले , देशामध्ये ,समाजामध्ये, मानवी जीवनातील प्रत्येक घटनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध हा सरकारशी असतो? मुलांनी प्रश्न केला , सर तुम्ही असे कसे म्हणता की प्रत्येक घटनांचा संबंध सरकारशी असतो . सर , भूकंप, पुर , वादळ, पाऊस , अपघात, भुक-मारी, बलत्कार किंवा नैसर्गिक आपत्ती या सगळ्यांचा राजधानीत बसल्याचा काय संबंध? मुले हसू लागली आणि विविध प्रश्न सराना विचारू लागली. तेव्हा मग सरांनी शांतपणे सर्वांचे एकूण घेतले आणि प्रत्येकाच्या प्रश्नांचे समर्पक उत्तर देत बोलू लागले . मुलांनो ऐका! भूकंप, वादळ वारा, पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती याचा सरळ संबंध हा पर्यावरणाशी संबंधित आहे. म्हणजे भूमी प्रधूषण, जल प्रधुषण, वायू प्रदूषण, आकाश प्रदूषण ई. म्हणजे मानवाने केलेल्या प्रदूषणाचा परिणाम हा निसर्गावर होत असतो आणि विकृत परिस्थिती निर्माण होत असते. मग याचा सरकारशी संबंध कसा? तर मुलांनो, पर्यावरण संबंधातील नियम आणि कायदे याचे योग्य अवलंबन होत नाही. आणि हे सर्व जर व्यवस्थित ,सुरळीत , नियमाने होणे ही सर्व जबाबदारी ही सरकारची असते. जर त्यांनी योग्य अवलंबन केले तर प्रदूषणावर नियंत्रण येईल. व नैसर्गिक चक्रात बदल होणार नाही आणि पर्यायाने आपत्ती निवारण होऊ शकते. आता मला वरील प्रदुषणाबद्द्दल जास्त सांगण्याची आवश्यकता भासत नाही. प्रत्येकाला माहिती आहे . मुलांनी विचारले सर, अपघात ? तेव्हा ते बोलू लागले की योग्य सुरक्षित ,सुरक्षा साधनांनी रक्षित. तसेच वाहन आणि वाहक परवानगी अतिशय जबाबदारी पूर्वक. म्हणजे सांगण्याचा उद्देश सरकारमधून वाहतूक विभागातील प्रत्येक व्यक्ती हा ह्या सर्व घटना जबाबदार असतो . योग्य जबदरिपूर्वक कार्य हेच सरकारच कर्तव्य असते पण याचे योग्य अवलंबन होत नाही म्हणुन आपत्ती येत असते म्हणजे याचा सरळ संबंध हा सरकारशी असतो. भूकमारी म्हणजे रोटी ,कपडा ,मकान बेसिक गरजा ह्या सरकार उपलब्ध करू शकले नाही कारण यांची निती असफल ठरली कारण लोकांना योग्य रोजगार उपलब्ध करून देण्यात असफल झाले. तसेच बलात्कार व इतर आपत्ती या सगळ्यांचा संबंध कायदा व सुव्यवस्थेची संबंधित आहे. जर योग्य प्रमाणात वापर केला गेला तर या घटना घडणार नाही. मुलांनो मानवी जीवनातील प्रत्येक घटना ह्या सरकारशी संबधित आहे. जन्म, जीवन, मृत्यू ह्याच संबंध सुद्धा सरकारी नियम व कायदे यांच्याशी अप्रत्यक्षपणे असतो. म्हणून सरकारची निवड करताना अतिशय विचारपूर्वक आणि जबाबदारी पूरक केली पाहिजे. नाही तर सर्व असुरक्षित आणि असाध्य . विचार करा आणि आवडले तर पुढे पाठवा. ( सूचना - वरील विचार हे माझे वैयक्तिक आहे याचा विपर्यास करू नये)

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*